कोविड रूग्णांना गाईचा चीक (कोलोस्ट्रम) दिल्याचे फायदे
आमच्या वाचकांनी या लेखावर “कोविड रुग्णांच्या श्वसनातील ताण कमी करण्यासाठी गाईचा चीक (कोलोस्ट्रम) परिणामकारक ” विचारलेल्या अनेक प्रश्नांच्या आधारे, मी या विषयावर अतिरिक्त माहिती सादर करीत आहे.
(1) कोलोस्ट्रम उकळलेले पाहिजे?
नाही, कोलोस्ट्रम उकळू नये कारण यामुळे प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) आणि इतर चांगल्या गुणधर्म नष्ट होतील. दुग्धशाळेपासून किंवा पशुपालकांकडून आपण कोलोस्ट्रम चिक मिळवू शकतो. आपल्याकडे जर जास्त गाईचा चीक असेल तर त्याला फ्रीजही करता येते कारण फ्रोझन कोलोस्ट्रम व्यवस्थित ठेवल्यास ६ महिने ते १ वर्षापर्यंत चांगले राहू शकते.
(2) गाय व्यायल्यानांतर किती दिवसाचा चिक वापरला पाहिजे?
साधारणपणे गाय व्यायल्यानांतर दीड दिवसाचा चिक पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेच्या चिकात भरपूर अँटीबॉडीज असतात. मात्र जर आजारपण जास्त असेल तर पहिल्या वेळेचा चिक जास्त उपयोगी पडेल.
(3) क्रॉसब्रेड गायींपेक्षा देसी गाय मधील कोलोस्ट्रम चांगले आहे का?
संशोधनात असे दिसून आले आहे की, देसी गायींमध्ये पिढ्यानपिढ्या असंख्य संसर्ग रोग झाल्याची शक्यता असून त्यांच्या कोलोस्ट्रम मध्ये संरक्षक गुणधर्म उत्तम प्रमाणात असतात. याचा अर्थ असा नाही की भारतातील क्रॉसब्रेड गाय किंवा म्हशीच्या कोलोस्ट्रम कार्यक्षम नाही.
(4) कोलोस्ट्रमची चव कशी आहे? कोलोस्ट्रम जसा आहे तसाच घ्यायला पाहिजे का?
कोलोस्ट्रम चवीला किंचित कडवट असते त्यामुळे एका कप गाईच्या दुधात 50-100 मिली कोलोस्ट्रम मिसळवून घेऊ शकतो.
(5) अमेझॉन किंवा इतर स्रोतांवर उपलब्ध कोलोस्ट्रम पावडर चांगले आहे का?
कोलोस्ट्रम पावडर किंवा कॅप्सूल कोणत्या देशात बनवलेला आहे याची माहिती असणे आवश्यक आहे कारण इतर देशातील गाईचा भारतात असलेले संसर्ग रोग होण्याची शक्यता नसल्यास त्यांचा कोलोस्ट्रम मध्ये ह्या आजाराचे अँटीबॉडीज नसतात. कोलोस्ट्रम म्हणून त्यांची प्रभावी क्षमता ठामपणे सांगता येत नाही. कोलोस्ट्रम पॉवडर कोणत्या प्रक्रियेवर केलेले आहे याची माहिती असणेआवश्यक आहे कारण स्किम्ड मिल्क पावडर सारख्या उच्च तापमानावर जर प्रक्रिया केली असेल तर ३० – ४० % अँटीबॉडीज आणि इतर प्रथिने नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. 0 डिग्री तापमान किंवा माइक्रो-इनकैप्सुलेटेड प्रक्रिया वापरून पावडर केलेला कोलोस्ट्रम उत्तम असतो असे प्रक्रिया केलेले कोलोस्ट्रम पावडरचा डोस दुप्पट केल्यावर ही कमी पूर्ण करता येते पण कोलोस्ट्रम भारतीय गायीपासून काढलेला असणे हे अतिआवश्यक आहे अस वाटत.
सर्व शेतकर्यांना विनंती आहे की मिष्टान्न पदार्थ करण्यासाठी कोलोस्ट्रमचा वापर उकळून केल्यामुळे त्यामधले चांगले प्रथिने नष्ट होत असलयाने कृपया कोलोस्ट्रमचा असा उपयोग करू नये. हे देखील लक्षात असणे आवश्यक आहे कि नवीन जन्मलेल्या वासरारचा कोलोस्ट्रमवर पहिला हक्क आहे म्हणून केवळ जास्तीच्या कोलोस्ट्रमचीच विक्री करणे.
आपण अद्याप हा लेख वाचला नसेल तर वाचा: कोविड रुग्णांच्या श्वसनातील ताण कमी करण्यासाठी गाईचा खरवस परिणामकारक
डॉ. अब्दुल समद
एम.व्ही.एस.सी., पी.एच.डी. (कॅनडा)
माजी डीन, पशुवैद्यकीय विज्ञान विद्याशाखा आणि शिक्षण संचालक, एमएएफएसयू