योग्य आहाराच्या नियमित पुरवठ्याने गायींतील उष्माघाताचा धोका टाळा

उन्हाळ्यात जनावरांना अधिक उर्जेची गरज भासते. त्यामुळे त्यांच्या आहाराकडे आणि आहारनियोजनाकडे विशेष लक्ष पुरवावे लागते.

heat stress in dairy cow

स्वच्छ पाण्याची उपलब्धता

 पिण्याच्या पाण्याच्या तापमानाच्या बाबतीत गायी आणि म्हशींचे आरोग्य संवेदनशील असते. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या तापमानातील थोड्याशाही वाढीने त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात ते घातक ठरू शकते. त्यासाठी त्यांना ताज्या, स्वच्छ आणि विशेष म्हणजे किमान साधारण थंड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सातत्याने करणे हा आहारातीलच एक घटक आहे. केवळ पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित झाकण्याने व तो थंड जागी निवाऱ्यात ठेवण्यानेही पाण्याचे तापमान कमी राखता येते. पाण्याची भांडी तापमानरोधक असतील तर अधिक उत्तम. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात पाण्याची गरज भागवण्यासाठी ते दिवसभर सतत, कायम सहज उपलब्ध करून ठेवणे महत्वाचे आहे. तेवढ्यानेही पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ होते. शिवाय, आहारात एरवीपेक्षा थोडे अधिक क्षार समाविष्ट करण्यानेही शरीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यास मदत होते.

उर्जेची अतिरिक्त मात्रा

उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य व सामान्य राखण्यासाठी जनावरांना अधिक उर्जा खर्च करावी लागते. तापमानवाढीच्या काळात दुधाचे उत्पादन घटण्याचे ते महत्वाचे कारण आहे. शिवाय, तापमानातील वाढ शुष्क घटकांच्या वापराशी थेट निगडित असल्यामुळेही उर्जेच्या नियोजनाची समस्या त्यांना जाणवते. आहारात अधिक उर्जायुक्त घटकांचे व मिश्रणाचे प्रमाण वाढवण्याचा एक चांगला पर्याय असतो; मात्र, एकतर त्यामुळे इतर काही दुष्परिणाम उद्भवण्याची शक्यता असते – विशेषत: कोठीपोटातील आम्लता त्यामुळे वाढते. शिवाय, आहाराचा खर्चही त्यामुळे वाढतो. आहाराचे महत्वाचे तत्व असे आहे, की आहारात उर्जायुक्त मिश्रणाचे प्रमाण एकूण शुष्क खाद्याच्या ५५ – ६० टक्क्यापेक्षा अधिक वाढवल्यास दुधातील मेदांश कमी होतो. आहार घेण्यासाठी  अनुत्सुकता निर्माण होते, शिवाय इतर व्याधींसह आहारातील घटकांचा विनियोग करण्याचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात आहार घेण्याचे प्रमाण कमी झाल्यास, ऊर्जा निर्मितीसाठी आहारातीलच मेदांश वाढवण्याचाही मार्गही उत्तम आहे. आहारात मेदाचे प्रमाण वाढवल्यास दुधातील मेदांशातही वाढ होते. मात्र, आहारातील अतिरिक्त मेदाचे प्रमाण शुष्क घटकाच्या ५ ते ६ टक्क्यांहून  अधिक होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. सरकी व तत्सम तेलबिया आणि सोयबीनचा वापर करण्याने मेद आणि प्रथिनांची अधिक निर्मिती होते.  तेलकट व मेणसदृश्य खाद्यपदार्थ हे मेदाचे स्रोत असतात. अधिक दूध देत असलेल्या गायींत कोठीपोटातील प्रक्रिया टाळून जाणारे मेदाचे प्रकार कोठीपोटात निष्प्रभ असतात त्यामुळे ते वापरणे योग्य. आहारात मेदाचे किंवा चरबीचे प्रमाण वाढवण्याची गरज भासल्यास अजून एक खात्रीचा व सुरक्षित मार्ग म्हणजे – मेदाची गरज नैसर्गिक आहारघटकांतून एक तृतीयांश, तेलबिया व मेणादी पदार्थांपासून एक तृतीयांश व कोठीपोटातील प्रक्रियेने प्रभावित न होणाऱ्या घटकांपासून एक तृतीयांश असे विविध स्रोतांतून भागवणे.

अशा घटकांची आहारातील मात्रा दूध उत्पादनाच्या गरजेनुसार दररोज ५०- १०० ग्रा. अशा प्रमाणात ठरते.

आहारात प्रथिनांचा समावेश 

आहार व विशेषत: चारा व शुष्क घटकांचे प्रमाण कमी झाल्यास ही कमतरता भरून काढण्यासाठी प्रथिनांचे प्रमाण वाढवणे गरजेचे असते. त्यासाठी चाऱ्यातील प्रमाणाऐवजी एकूण प्रथिनांच्या गरजेचा (किलोमध्ये) विचार करावा. मात्र, प्रथिनांच्या पचनासाठी अधिक ऊर्जा लागत असल्यामुळे, एकूण आहारातील प्रथिनांचे प्रमाण १७ टक्क्यांहून अधिक नसावे. त्यापेक्षा विशेषत: अधिक दूध देणाऱ्या गायींच्या आहारात कोठीपोटातील प्रक्रियेपासून मुक्त असलेल्या प्रथिनांचा वापर केल्यास जनावरांना प्रथिनांची कमतरता भासत नाही. कोठीपोटात विघटन होणाऱ्या आणि कोठीपोटातील विघटनक्रियेपासून मुक्त असलेल्या प्रथिनांच्या परस्पर प्रमाणांचा विचार करणे अत्यंत महत्वाचे ठरते. कोठीपोटातील विघटनप्रक्रियेने पचन होणाऱ्या प्रथिनांची मात्रा ७० टक्के व विघटनप्रक्रियेत पचन न होणारी प्रथिने ३० टक्के, असे प्रमाण योग्य असते. अशी प्रथिने बाजारात उपलब्ध होवू शकतात.

आहारक्षमता वाढवण्यासाठी चारा भिजवण्याची पद्धत   

उन्हाळ्यात व वाढत्या तापमानात जनावरांची कमी झालेली असल्यामुळे आहाराची, चारा भिजवून व वाळवून चाऱ्याची चविष्टता वाढवण्याचा पर्याय सहज वापरता येण्यासारखा आहे. उर्जायुक्त मिश्रणे आहारात व चाऱ्यात मिसळून दिल्यास, तंतुमय घटकांच्या पचनातून अधिक ऊर्जा निर्माण होत असल्यामुळे, जनावरांची सहसा वेचकपणे उर्जायुक्त घटकांचे सेवन अधिक्याने करण्याची प्रवृत्ती असते. ही वेचकता टाळण्यासाठी विविध मार्गांचा वापर करता येतो. चारा व खाद्याचे शक्य तितके एकजीव मिश्रण करणे, अधिक ओलावा असलेल्या घटकांचे मिश्रण आहारात करणे, कोरडा चारा पाणी मारून भिजवून देणे अशा काही प्रक्रियांनी वेचकता टाळून चारा व आहाराचे खाद्यप्रमाण वाढवता येते. आहारक्षमता राखता किंवा वाढवता येते.

ह्या सर्व उपायांचा अधिक खात्रीशीर परिणाम गोठ्यात व थेट सूर्यप्रकाश व उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अन्य थंड जागी वावरणाऱ्या जनावरांच्या बाबतीत अधिक परिणामकारक ठरू शकतो.


गाईच्या दुधाच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी खालील खाद्य पदार्थ नक्की वापरा. 

Platina-DairyGold Bharat Feeds & Extractions Ltd Cow Feed/Buffalo Feed/Cattle Feed Pellet (18 kg)

Dairy Gold Bharat Feed चे फायदे :

  • दूध उत्पादनात वाढ
  • जनावरांच्या आरोग्यात सुधारणा
  • दुधाच्या चरबीयुक्त सामग्रीमध्ये सुधारणा
  • प्रजनन चक्राचे नियमितीकरण आणि नियमित अंतराने उष्णतेवर येणारे प्राणी
  • सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे समाविष्ट आहेत

Dr. Abdul Samad

M.V.Sc., Ph.D.

Herd Medicine Consultant