लंपी स्किन डिसीज: भारत आणि भारतीय उपखंडातील एक नवा उदयोन्मुख गायी-म्हशींचा रोग

लंपी स्किन रोग हा सर्वप्रथम १९२९ साली झांबिया मध्ये दिसून आला. त्यानंतर पुष्कळ आफ्रिकेतील देशामध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसू लागला. काही वर्षांपासून (२०१५ सालापासून) भारतात ही त्या रोगाची नोंद झाल्याचे व त्याचे रोग निदान निश्चित झाल्याचे दिसून येते.

लंपी स्किन रोगाची कारणे

“लंपी स्किन डिसीज व्हायरस (LSDV)” ह्या विषाणू मुळे हा रोग होतो. हा विषाणू पॉक्स व्हायरस कुटुंबातील असून त्याचे शिप व गोट पॉक्स ह्या विषाणूशी खूप साम्य आढळते. हा विषाणू उच्च तापमानाला सुद्धा जिवंत रहात असल्यामुळे खूप कणखर असून ५५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानातच तो दोन तासानंतर निष्क्रिय होतो (नाश पावतो). कातडीवरील गाठी – ८० अंश सेल्सिअस ह्या उणे तापमानात गोठवून ठेवल्यास दहा वर्षे ठेवल्यानंतरही त्यातून हे विषाणू जिवंत स्वरूपात मिळवता येतात आणि संसर्गित ऊती संवर्धित द्रावणांत ४’ तापमानाला (सेल्सिअस) ते सहा महिन्यांपर्यंत सुरक्षित राहू शकतात. हा विषाणू पि. एच. ६.६ ते ८.६ ह्या मर्यादेतील हायड्रोजन आयन काँसंट्रेशन मध्ये सुरक्षित राहू शकतो. हा ईथर ह्या रसायनाच्या २० टक्के द्रावणाने बाधित होतो. तर क्लोरोफॉर्म व फॉरमॅलिन (१ टक्का) आणि फेनॉल (२ टक्के/१५ मिनीटांत) तसेच सोडियम हायपोक्लोराइड (२-३ टक्के) व क्वाटरनरी अमोनिअम (०.५ टक्के) यांनी बाधित होतो. हे विषाणू सुकलेल्या पॉक्स (चेचक) च्या फोडांच्या खूप त्यामध्ये प्रतिरोध करून खूप काळपर्यंत राहू शकतात आणि चिघळलेल्या कातडीवरील गाठींमध्ये एक महिन्याच्या वरही जिवंत राहतात. विषाणू सूर्य प्रकाशांत निष्क्रिय होतो पण जनावरांच्या अंधाऱ्या, प्रकाशहीन चारा साठविण्याच्या खोलीत तो पुष्कळ आठवडे पर्यंत जिवंत राहतो. त्यामुळे एकदा रोगाची साथ सुरु झाली की विषाणूपासून मुक्तता होण्यास कठीण पडते.

ह्या रोगांत विकृतीकरण दर (मॉराबीडीटी रेट) १० ते ५० टक्केपर्यंत आहे तर मृत्यूदर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. जरी हा विषाणू “शिप/गोट पॉक्स” कुटुंबातील असला तरी हा अत्यंत “यजमान विशिष्ट” (होस्ट स्पेसिफिक) आहे म्हणून हा फक्त गाई-बैलांत आणि म्हशींमध्येच रोग निर्मिती करू शकतो. देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरांमध्ये विकृतीकरण दर आणि मर्तुकदर हया रोगांत उच्च आहे. जंगली श्वापदांमध्ये हा रोग अजून दिसून येत नाही. माणसांनाही हा रोग संक्रमित झाल्याचे ऐकिवांत नाही.

हा रोग मुखत्वे संधीपाद (आरथ्रापॉड) किटकांद्वारे, डास, चावणाऱ्या माशा आणि नर गोचीड यांच्या द्वारे प्रसारित होतो. अन्न, पाणी आणि प्रत्यक्ष संक्रमित त्वचेशी संपर्क ह्यामुळे ह्या रोगाचा फारसा प्रसार होत नाही. संक्रमणासाठी विषाणू कातडीमध्ये टोचला जाणे आवश्यक आहे. सुईने टोचण्यामार्फत जनावराला संसर्ग होणे संभवनीय आहे. हा विषाणू त्वचेवरील जखमा (लिजन्स), रक्त, लाळ आणि डोळ्यांतील स्त्राव यांमध्ये भरपूर प्रमाणांत ३५ दिवसंपर्यंत दिसून येतो.  त्याच प्रमाणे दूषित जनावरांच्या वीर्यामध्ये सुद्धा तो मोठ्या प्रमाणांत आढळतो. परंतु ह्याचा हा रोग प्रसारणाशी काही संबंध आहे कां हे माहित नाही. एका रिपोर्ट प्रमाणे ह्या रोगाचा प्रसार गर्भाच्या नाळेद्वारे झाल्याच नमूद आहे. हा विषाणू सुप्ततेचे (लेटन्सी) लक्षण दाखवत नाही. त्याच प्रमाणे त्यानंतरचे पुनरुद्भव (रिक्रूडेसन्स) लक्षण ही दाखवत नाही. ह्या रोगाची लक्षणे “विशिष्टंच असल्यामुळे” रोगनिदान ही काही मोठे आव्हान नाही.

रोगाची लक्षणे

सुरवातीला जनावराला ४१ अंश सेल्सिअस पर्यंत सणकून ताप येतो. दुधांवरील जनावरांमध्ये दूध खूप कमी होते. जनावर एकदम मलूल पडते, त्याची भूक मंदावते आणि त्वरित वजन कमी होते. काही जनावरांत सर्दी, डोळे सुजून लाल होणे इत्यादी लक्षणे दिसतात. सर्वात वैशिष्ट पूर्ण लक्षणे म्हणजे शरीराच्या तापमानांत वाढ झाल्यानंतर ४८ तासांच्या आंत जनावराच्या कातडीवर (त्वचेवर) २ ते ५ सें.मी. आकाराच्या वैशिष्ट्य पूर्ण गांठी डोके,मान,पाय,थाने, जननेंद्रीय आणि तसेच गुदद्वार व बाह्य जननेंद्रीय यांचे मधील भाग (पेरेनिअम) येथे निर्माण होतात. या गांठी त्वचेखालील आंतल्या भागांत स्पर्शाला गोल घट्ट आकाराच्या आणि उंचावलेल्या (रेजड) अशा असतात. ह्या गाठींमधील पेशींची मर्तुक होऊन त्या पुवाळ होतात आणि कित्येक महिन्यांपर्यंत त्यांचे अस्तित्व टिकून राहते. विशेष करून जर ह्या गांठी जास्त खोलपर्यंत असतील तर देवींच्या फोडांसदृश त्यांचे व्रण खूप काळपर्यंत टिकून राहतात.

काही जनावरांमध्ये मानेखालील पोळी, छातीचा भाग, वृषण, योनीचा भाग, पाय इत्यादी भागांना सूज येऊन त्यांच्या हालचालींत अडथळा निर्माण होतो. जर वाळूंना हा रोग झाला तर ते तात्पुरते किंवा कायमचे “वंध्य” होतात. गर्भार गायी म्हशींनाही तात्पुरते वंध्यत्व येते किंवा त्यांचा गर्भपात होतो. ज्यावेळी ह्या रोगाचा जखमा खूप चिघळतात त्या वेळी जनावर खूप खंगते आणि दुय्यम जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊन स्तनदाह, फुफुसदाह आणि पुवाळळेल्या मृतपेशींचे गड्डे कातडीवर जमा होतात. हा रोग “हरपीस मामिलायटिस” “गो-देवी” डरमॅटोफिलस/ डेमोडेक्टिक खरूज किंवा कीटकांच्या “प्रचंड चाव्यांची” लक्षणे ह्यांच्याशी गोंधळून चुकीचे निदान करू शकतो.

प्रयोग शालेय निदान: रोगनिदान निर्मितीसाठी “पी.सी.आर” चाचणी सर्वोत्तम आहे. त्यासाठी त्वचेवरील गांठी किंवा त्यावरील “खपल्या” लाळ, नाकांतील स्त्राव आणि रक्त ह्यांचे नमुने सुयोग्य आहेत.

रोगावरील उपचार आणि प्रतिबंध:

हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे त्यावर सुनिश्चित उपाय काहीही नाहीत. दुय्यम जिवाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी “नॉन स्टिरॉईडल” (स्टिरॉइड विरहित) दाह विरोधक (अँटी इन फ्लेमेटरी) औषधे वापरता येतात. त्वरित रोग निदान आणि वेगवान लसीकरण ही रोगाची साथ आटोक्यांत आणण्याची “गुरु किल्ली” आहे. हा विषाणू कीटकांच्या चाऱ्यामुळे प्रसारित होत असल्यामुळे कीटकांचा बंदोबस्त करणे हे फार छिद्रान्नेषी (क्रिटिकल) म्हणजेच महत्वाचे आहे. लसीकरणासाठी प्रत्येक जनावरांसाठी वेगळी सुई वापरणं लहानशा गोठ्यांवर शक्य आहे. त्यामुळे एका जनावरांतील सूत्र विषाणू दुसऱ्या जनावरात संक्रमित होणे टळेल.

लसीकरणासाठी “LSDV” विषाणू सदरुष (होमॉलॉगस) विषाणूंची लस वापरली जाते. आपण आधी सुरवातीलाच हे पहिले आहे की शिप व गोट पॉक्स किंवा सदरुष विषाणूंमुळे हा रोग होतो. त्यामुळे त्या विषाणूच्या जवळच्या नात्यांतील “सदुरुष” विषाणू ह्या लसीसाठी वापरतात. फक्त तो लसीचा विषाणू सौम्मीकरण करून (अटेन्यूऐट) वापरतात किंवा “निथलींग” LSDV सुद्धा वापरला जातो. तसेच सजीव हेटेरोलॉगस (सदुरुष नसलेला) शिप पॉक्स लसही ह्या साठी वापरली जाते.

तळ टीप (Foot Note): डॉ. श. वि. पंडितांच्या मते त्यांच्या नांदोशी येथील निरंजन बायोटेक लॅबोरेटरी (पुणे) मध्ये तयार होणारे “PES – FM “/ FMD .SOL ” ह्या मायक्रो एनकॅपसुलेट सिल्व्हर नॅनो टेकनॉलॉजि वापरून केलेल्या प्रॉडक्टने जनावराच्या त्वचेवरील गाठींच्या जखमा ट्रीट केल्यास आणि “PES .MY ” हे औषध १०० मी.ली/एक लिटर ह्या हिशोबाने त्यांच्या सकाळच्या वेळी द्यावयाच्या प्यायच्या पाण्यात ५ दिवस टाकल्यास हा रोग लवकर आटोक्यात येऊ शकेल.


अनुवादक – डॉ. श. वि. पंडित

निरंजन बायोटेक, नांदोशी पुणे