यशस्वी दुग्ध व्यवसाय – एका महिलेची यशस्वी यशोगाथा

दुग्ध व्यवसायाची सुरुवात २००३ पासून केली. पूर्वी ४ गायी व बंदिस्त गोठा पासून सुरुवात केली आणि थोडी फार शेती असं होत. पण २००८ वर्षी मुक्तसंचार गोठ्याची सुरुवात केली, स्वाती पवार ह्या घरसंसार चालून शेती आणि गोठा सांभाळ योग्य रीतीने करतात. आज त्यांच्याकडे लहान मोठ्या २३ गायी आणि मुक्तसंचार गोठा आहे. मुक्तसंचार गोठ्यामुळे कामाचा लोड कमी झाला आणि गायींचा व्यवसाय होऊ लागला तसेच गायींच्या दुधात वाढ झाली व आरोग्य उत्तम राहिले त्यामुळं इतर गोष्टी म्हणजेच चारा उत्पादन, अझोला उत्पादन व जीवामृत ह्या सर्व गोष्टी नियमितपणे करतात.

मुक्‍तसंचार गोठ्यामुळे झालेले फायदे

  • गायींना मुक्त फिरण्याची मोकळीक, बैठक व्यवस्थित झाली आणि रवंथ जास्त करणे शक्‍य झाले.
  • दोन वेळ चारा व गरजेनुसार पाणी पिणे शक्‍य झाले.
  • गोचीड, मस्टायटीज किंवा अन्य आजार होण्यावर प्रतिबंध आला.
  • गायीं फिरत राहिल्याने त्यांच्या नख्यांची वाढ झाली नाही.
  • एकूण व्यवस्थापनामुळे दूध उत्पादनात वाढ झाली.

सध्याच्या परिस्थितीला गोठ्यात १५० लिटर चालू असून चारा व्यवस्थापन व पशुखाद्य हयामुळे फार पैशाची बचत झाली. आजच्या स्थितीला त्यांचा प्रति लिटर १७.२० पैसे उत्पादन खर्च असून त्याना ऑरगॅनिक दुधाला ६ ते ७ रुपये अधिक पैसे मिळतात. चारा व्यस्थापनासाठी त्यांनी नवनवीन प्रयोग करून फॅट आणि डिग्री मध्ये चांगली सुधारणा केली.  गोविंद डेअरीच्या माध्यमातून/ सहकार्यातून २०१९ साली सुपर नेपियर लागवड केली आणि गायींसाठी चारा करून देखील रोपांची विक्री केली त्यांना एका वर्षात ३.५ लाख रुपयांचा फायदा झाला.

त्यांच्या गोठ्यात सर्व काही शेंद्रीय पद्धतीने वापर केला जातो. त्यांना एवढच सांगायचे आहे की दुग्ध व्यवसाय हा फक्त शेणाचा व्यवसाय नसून मनापासून आणि स्मार्ट व्यवसाय केला तर नोकर वर्गाला सुद्धा मागे पाडतील म्हणून व्यवसाय करा पण त्या व्यवसायात जीव ओतून काम केला तर १०० % यश मिळतं व आज महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन यशस्वी दुग्ध व्यवसाय उत्तम रीतीने यशस्वी करू शकतात हे सौ. स्वाती विजय पवार यांचं ताजे उदाहरण आहे.

हेही वाचायला आवडेल तुम्हाला : १५ गाईंसाठी गोठा प्रकल्प अहवाल

महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांसाठी ‘अल्प खर्चात गाय निवारा’ स्पर्धा

कृपया स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि मित्रांनाही त्यांसाठी उत्तेजित करा.

Low-Cost Cow-Comfort Housing - Indiancattle.com

सौ. स्वाती विजय पवार
समवेदना डेअरी फार्म, मुंजवडी, फलटण, महारष्ट्र-415523