पशुपालनात जीवनसत्त्वांचे महत्व

दुध उत्पादनात भारताचा जगात पहिला नंबर आहे मात्र जनावरापासून सरासरी उत्पादन क्षमता अतिशय मर्यादित आहे.  उच्च दर्जाची उत्पादकता उदाः प्रत्येक जनावराचे दुध उत्पादन जास्तीत जास्त असणे, गाय निरोगी ठेवणे, जनावरांचे व्यवस्थापन म्हणजे चारा, पाणी, पूरक आहार जनावरांची स्वच्छता, गोठ्याची स्वच्छता व निरोगी जनावरे ठेवणे अत्यंत गरजेचे असते. उत्तम आरोग्य राखण्यासाठी जनावरांना प्रथिने, (protein) पिष्टमय पदार्थ (carbohydrates) मेद (FAT) क्षार व जीवनसतत्वे ही पोषणमुल्य योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. त्यामुळे शरीरातील आवश्यक त्या क्रिया केल्या जातात व जनावरांची प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते तसेच योग्य वेळी वयात न येणे व गर्भपात ई. परीणाम दिसून येतात. जनावरांना योग्य प्रमाणात क्षार व जीवनसत्वे पुरवावी लागतात. क्षार व जीवनसत्वामुळे जनावरांची निकोप वाढ होते व शरीर योग्य ते कार्य करत राहते.

जीवनसत्वे

जनावरांना क्षार व जीवनसत्वे वनस्पती पासून मिळणाऱ्या संयुगावर/ आहारावर अवलंबून असतात. शरीराला जीवनसत्वांची अल्पशा प्रमाणात आवशकता असून त्यांच्या अभावी शरीराच्या क्रियेमध्ये बिघाड होऊन अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात तसेच जनावरे कुपोषित होऊन त्याचा उत्पादनावर व पर्यायाने गुणवत्तेवर परीणाम होऊ शकतो. जीवनसत्वे ही मुख्यता अ, ब, क, ड, ई, व के अशा प्रकराच आहेत. जीवनसत्व मध्ये B1, B2,…B12, अथवा थायमीन, रीवोफ्लोवीन नियासीन, कोलीन, पायारोथेनिक असिड, पयराडोकसीन, बायोटीन,फोलेट, सायनोकोबालामाइन इ. अनेक उपप्रकार आहेत ही जीवनसत्वे अत्यंत उपयोगी आहेत तसेच त्यांच्या अभावामुळे अनेक प्रकारचे रोग उदभवू शकतात. जीवनसत्वाची आवशकता ही वयात येणाऱ्या प्राण्यांमध्ये जास्त असते. जीवनसत्व दोन प्रकारची असतात.

  1. पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे
  2. स्निग्धात विरघळणारी जीवनसत्वे

पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे

जीवनसत्व : या जीवनसत्वाच्या अभावामुळे वाढ खुंटणे, बेरीबेरी, अशक्तपणा व अनेमिया इ. आजार होऊ शकतात. जीवनसत्व ब च्या अभावामुळे स्न्यायुची हालचाल न होणे व मज्जातंतू सुजणे इ. लक्षणे आढळून येतात. जीवनसत्व ब हे शरीराची वाढ, चयापचयाचे आजार, रक्त वर्धक व चेता संस्थेच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे. यांच्या अभावामुळे कुपोषणासारख्या समस्या होऊ शकतात. हे जीवनसत्व रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटात तयार होते. हे खाद्याद्वारे व इंजेक्शनद्वारे देता येऊ शकते. सदर जीवनसत्व हे गाजर, लुसर्ण घास, सोयाबीन, ओट बार्ली, दुध, हिरवेगवत तसेच हिरव्या माक्याद्वारे मिळू शकतात.

जीवनसत्व : या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही, वाढ खुटणे, व अशक्तपणा या सारखे आजार होऊ शकतात. जीवनसत्व ‘क’ हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, शरीराची, हाडाची, वाढ व चांगले आरोग्यासाठी उपयोगाचे आहे. हे जीवनसत्व हिरवी वेरण, मका, गाजर, संत्रा, लिबू, चिंच, पेरू,पपइ, इ. द्वारे मिळू शकतात तसेच इंजेक्शनद्वारे सुद्धा दिल्या जाते.

) स्निग्धात विरघळणारी जीवनसत्वे

जीवनसत्व : जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे आंधळेपणा, रातआंधळेपणा, त्वचेचे रोग, उशिरा माजावर येणे,वार न पडणे, मुका माज, स्त्री बीजांड बाहेर पडण्याची क्रिया लांबते, कमजोर वासरांना जन्म देणे, गर्भाशायाचा दाह व प्रजोत्पादन संस्थेतील पेशीची वाढ न होणे इ.लक्षणे आढळून येतात. हे जीवनसत्व त्वचा व डोळे यांच्या आरोग्यासाठी, पचन संस्थेच्या अवयवाचा आतील स्थर चांगला राहण्यासाठी, रोग प्रतिकार शक्ती व प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी आहे. जीवनसत्व अ हे गाजर, लुसर्न घास, हिरवे गवत, सोयाबीन, ओट, हिरवी मका इ. चाऱ्या द्वारे मिळू शकते तसेच नारंगी पिवळा भाजी पाला, टोमॅटो, फळे व तेल बिया द्वारे व सूर्य प्रकाशात सुकवलेल्या चाऱ्यामध्ये सुध्या मिळू शकते.

जीवनसत्व : जीवनसत्व ड च्या अभावामुळे मुडदुस रोग होतो दाताचे विकार व हाडे कमजोर होतात, त्वचेचे रोग तसेच मायंग बाहेर येऊ शकते, गुढग्या मध्ये पोकळी व सांधे दुखी होते, रक्तातील कॅल्शियम व स्फूरद चे योग्य प्रकारे शोषण होऊ शकत नाही. हे जीवनसत्व कॅल्शियम व स्फूरद चे रक्तात रुपांतर करण्यासाठी आवश्यक आहे. यामुळे दाताची व हाडाची तसेच शरीर व जननेंद्रियांची योग्य वाढ होते. जीवनसत्व ड हे सकाळचे सूर्यकिरण, शेंगदाणा, करडी, सरकी, व त्यांची पेंढ या मध्ये पुरेशा प्रमाणात असते त्याच बरोबर फळे, सोयामिल्क, डाळी मध्ये आढळून येते.

जीवनसत्व : या जीवनसत्वाच्या अभावामुळे प्रजनन व वंध्यत्वाचे रोग होतात. जननेंद्रियांची वाढ होत नाही जनावर माजावर येत नाही, उलटण्याचे प्रमाण वाढते व हृदयाच्या स्नायूवर परिणाम होतो. जीवनसत्व ई पुरवठा केल्यास शरीराची निकोप वाढ होते, कातडी निरोगी राहते, नियमित प्रजननासाठी उपयुक्त असून दुधा मध्ये वाढ होते. जीवनसत्व ई व सेलेनियम चा एकत्रित पुरवठा केल्यास वार अडकण्याच्या समस्या टाळता येतात. हे जीवनसत्व मोड आलेली मटकी, गव्हाचे अंकुर, हिरवा चारा, कडधान्याचा कोंडा, सूर्य फुल व सोयाबीन तेल तसेच हिरव्या पालेभाज्यामध्ये आढळून येते.

जीवनसत्व के: जीवनसत्व के च्या आभावामुळे जखमेमधून सतत रक्तस्त्राव होत राहतो. रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही. जीवनसत्व के हे हिरवाचारा पालेभाज्या कोबी व ब्रोकोली मध्ये उपलब्ध असते तसेच काही डाळी मध्ये थोड्या फार प्रमाणात आढळून येते.


 

डॉ. व्हि. एम. भुक्तर

माजी अध्यक्ष डीसीप्लिनरी कमिटी, भारतीय पशु चिकित्सा परिषद, नवी दिल्ली

डॉ. डी. एम. चव्हाण

माजी अतिरिक्त आयुक्त (पशुसंवर्धन), महाराष्ट्र राज्य, पुणे

डॉ. के. आर. शिंगल

पूर्व प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र सरकार
ईमेल आयडी: drkrshingal@gmail.com