टाकाऊ भाज्यांचा पशुखाद्यासाठी वापर

गायींच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होवू न देता त्यांच्या आहारावरील खर्चात बचत करून स्वस्तातला चारा निर्माण करता येतो. यापूर्वी या संकेतस्थळावर मागील भागात आपण वाया गेलेल्या पिकाचे पशुखाद्यात रुपांतर करण्याविषयी चर्चा केली आहे. वाया गेलेल्या पिकांचा वापर पशुखाद्यासाठी करून अनेक पीकविमा कंपन्यांच्या सहकार्याने त्याचा व्यावसायिक पद्धतीने विनियोग करू शकतो व तशा संधी भारतासारख्या देशातही वाव मिळू शकतो.

Vegetable waste as cow feed

जगात भाजीपाल्याचे उत्पादन निर्माण करण्यात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. असे असले तरी, आपल्याकडील ४० – ५० टक्के (साधारणत: ४४० अब्ज डॉलर्स किमतीचा) भाजीपाला अक्षरश: वाया जातो. भारतीय वाणिज्य कक्ष संघटनेच्या नोंदीनुसार भारतात ६३०० शीतसंकलन गृहे असून त्यातून केवळ ३० लाख टन साठ होवू शकतो. ही सोय एकूण उत्पादनाच्या केवळ ११ टक्के उत्पादनालाच पुरेशी आहे. पुरेश सुरक्षित साठ्याच्या अभावाशिवाय नाशवंत उत्पादनाच्या पर्यायी वापराची कुठलीही खात्रीशीर सोय नसणे ही भारतातील उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय निराशाजनक बाब आहे. विशेषत: देशातील एकूण भाजीपाल्याच्या उत्पादनाचा सर्वाधिक भार उचलणाऱ्या दक्षिण भारतातील राज्यांच्या बाबतीत ही बाब अधिक तीव्रतेने अनुभवायला मिळते. त्यांना त्याचा सर्वाधिक नुकसानीचा फटका बसतो. मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या साठ्यासाठी आवश्यक असलेली मोठमोठी शीतगृहे व संकलनगृहे उभारणेही खर्चिक व अनिश्चित गुंतवणुकीचे असल्यामुळे तो मार्ग दुरापास्त आहे. शिवाय, त्यांच्या वापरासाठी विजेचा खर्चही अवाढव्य आहे. अशा परिस्थितीत भारतात मोठ्या संख्येने असलेल्या पशुधनाच्या खाद्यासाठी त्याचा वापर शक्य आहे, हे सुदैवच. त्यातही भरपूर प्रमाणात निर्माण होत असलेल्या आणि विशेष म्हणजे जनावरांची गरज भागवणार्ऱ्या तंतुमय घटकांनी युक्त असलेल्या मोठ्या पाल्याच्या भाजीचा वापर पशुखाद्यासाठी होवू शकतो ही अजून श्रेयस्कर बाब आहे.

पुरेशी काळजी व दक्षता घेवून शेतीतील टाकाऊ उत्पादनाचा वापर पशुखाद्यासाठी करण्याची प्रथा अनेक देशांत प्रचलित आहेच. भारतातही टाकाऊ भाज्यांचा वापर जनावरांच्या आहारासाठी पूर्वीपासून केला जातो. मात्र, तो केवळ भाजीचे वारेमाप उत्पादन होते अशा ठिकाणी, विशेष मोसमात व भाजीपाल्याचे बाजारभावात मंदी येते तेव्हा केवळ तात्पुरता पर्याय म्हणूनच भाजीपाला जनावरांना केवळ अन्य पर्याय नसल्यामुळे खाऊ घातला जातो. तथापि, हल्ली भाजीपाल्याचा वापर गरजेनुसार विविध आकाराच्या प्लास्टिक पिशव्या अथवा पोत्यांचा वापर करून करण्यात आलेल्या मुरघासाचा उत्पादनातही केला जातो. भाजीपाला पिके दोन प्रकारची असतात. एक पाल्याची, मोठी पाने असलेली ज्यांत तंतुमय घटक अधिक असतात व दुसरी शर्करायुक्त (उदाहरणार्थ – बटाटा, रताळी, गाजर, बीट इ.). शर्करायुक्त भाजीपिके केंद्रीकृत खाद्याला पर्यायी अन्न म्हणून किफायतशीर ठरतात. विशेषत: नवजात व लहान वासरांच्या खाद्याची गरज अशा शर्करायुक्त भाजीपासून बनवलेल्या खाद्यातून भागवली जाऊ शकते.

वास्तविक पाहता, केवळ एका सामान्य शेतकऱ्याला एकट्याच्या बळावर असा वापर करणे अशक्य व त्रासदायक आणि खर्चिक ठरू शकते. मात्र, हा पर्याय सार्वजनिक व सहकार तत्वावर विशेषत: ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना सहकारी व्यवसायाची संधी देवू शकतो. याबाबतीत, संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संस्थेद्वारे याबाबतीत अतिशय उपयुक्त व माहितीपूर्ण असा अहवाल व प्रकल्प तयार केला असून या संकेतस्थळावर त्याची माहिती देण्यात आली आहे. खालील दुव्याचा वापर करून ही माहिती प्राप्त करून घेता येईल.

त्याचा लाभ विशेषत: भारतीय शेतकऱ्यांनी घ्यावा व टाकाऊ भाजीपाल्याचा पशुखाद्यासाठी व पशुआहारासाठी मोठ्या प्रमाणावर संघटित व नियोजनबद्ध वापर करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

FAQ Article on Vegetable Waste

हेही वाचा: आपण गायींना चाऱ्या ऐवजी ऊस देऊ शकतो का ?? किती द्यायला पाहिजे?

 

डॉ. अब्दुल समद
सेवानिवृत्त डीन, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई
अनुवादक

डॉ. संतोष कुलकर्णी
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर


बाजारात उपलब्ध उत्पादनेः

Super Agri Green Sorghum Sudan Grass 200 Organic Seeds Pack