दुग्ध व्यवसायातील यश – युवराज हाणमंत खोपटे

युवराज खोपटे यांना गोठा हा पूर्वी पासून वडीलोपार्जीत गोठ्याची 2005 मध्ये बंधिस्त गोठा पण ते प्रयोग शिल वृत्तीमुळे व अनेक ठिकाणी जाऊन अभ्यास करून व डॉ. शीताराम गायकवाड सर, गोविंद डेअरीचे GM यांच्या भेट झाली आणि मुक्तसंचार गोठा नवनवीन तंत्रज्ञानी सुरूवात 20 फेब्रुवारी 2016 ला भव्य मुक्तसंचार गोठ्याच स्वप्न पूर्ण झाले आणि आज सध्यस्थितीला त्यांच्याकडे 44 गायी व 350 लिटर दुध दर दिवसाला मिळतो व त्यांनी त्यांच्या गोठ्यात कालवडी व्यवस्थापणाचे चांगल्या प्रकारे सुरू आहे.

आज स्वत:च्या बळावर त्यांनी ह्या गाय गोठ्यामूळे जमीन व ट्रॅक्टर व बरेच काही मिळवले आहे. त्यांना त्यांच्या पत्नी गोठ्यात खुप मदत करतात. एक विशेष म्हणजे, 44 गायींचा गोठा ते घरच्या घरी काम करून सांभाळतात व त्यांच्या वडीलांचे पण खुप मोलाचे योगदान मिळाले आहे. आगदी कष्टातून त्यांनी परिस्थिवर मात करूण ते आता एक उत्तम व प्रगतशिल दुधउत्पादन म्हणून त्यांची सासवड पंचक्रासीत ख्याती आहे. हारहूनरी व कर्तव्यगार म्हणून ओळख आहे.

तसेच त्यांनी चारा व्यवस्थापणासाठी मुरघास पद्धती व वेगवेगळी चारा पिके घेवून उचादन खर्च कसा कमी करता येतो हे इतर दुध उत्पादकांना दाखवून दिले आहे. सर्व सामान्य शेतकऱ्या प्रमाणे  दुधाला दर नाही म्हणून गोठ्यात प्रयोग करून त्यांनी त्यांच्या गोठ्यातील प्रतिलिटर उत्पादन खर्च 14 रुपये इतका आहे. त्यांना पशुव्यवस्थापण, चाराव्यवस्थापण याचा उत्तम ज्ञान आहे. आणि हा जो भव्य गोठ्याच स्वप्न आहोरात्र कष्ट करून उभारले आहेत.

गोठ्यांचे वैशिष्ट्ये :-

  1. भव्य मुक्तसंचार गोठा
  2. हार्बल गार्डन
  3. कालवडी संगोपण
  4. मुरघास तंत्रज्ञान
  5. शेणखत प्रक्रिया
  6. अंश विरहीत दूध
  7. Fodder Planning
  8. Record

युवराज हाणमंत खोपटे

रा. टाकूबाईचीवाडी, सासवड (झणझणे)
ता. फलटण, जि. सातार