दुग्ध व्यवसायातील यश – सुखदेव अरविंद कदम

सुखदेव कदम हें अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, साधी राहणी उच्च विचार या उभतीप्रमाणे शिक्षण सर्वसाधारण १० वी पास पूर्वी एका सहकारी सोसायटीत अत्यंत कमी पगारात नोकरी आणि क्षेत्र पण कमीच होत. काही तरी करायच म्हणण्यात वर्ष संपला पण व्यवसाय करायची खुप तीव्र इच्छा होती पण भांडवल जवळ नव्हती पण नवनिर्मिती व काहीतरी वेगळ करून एक समाजाला आदर्श दाखवण्याची संधी शोधली आणि अगदी चार गायी त्यातही दोन देशी गायी व दोन संक्रीत गायी पासून दुग्ध व्यवसायची सुरुवात केली व २०१५ ला मुक्तसंचार गोठा तयार केला आणि गोविंद डेअरीच्या सहकार्याने हळू हळु त्यांनी देशी गायी व म्हशी गोठ्यात वाढल्या आणि त्यातून खरी यशाची सुरुवात झाली.

पण त्याचे बंधू सुरेश कदम हे अत्यंत कुशाग्र, बुद्धिवंत आणि नवनिर्माण करण्याची वृत्ती सुरू हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती दूध व्यवसायाच्या सोबतच शेंद्रीय शेतीकडे झेप घेतली व नवजीवन शेतीसाठी लागणारी बोकासी खत, जीवामृत, गोमूत्र अर्क, दशपर्णी अर्क, ह्युमिक अनेक प्रॉडक्ट देशी गाईच्या शेणखत व गोमूत्रापासून तयार करू लागले. दूध व्यवसाय हा आता नुसता शेणाची व्यवसाय राहिला नसून दुधापेक्षा शेण व गोमूत्र यातून शेतीसाठी उत्तम प्रतीच्या औषधी तयार करू लागली, दरवर्षाला लाखो रुपयांची रासायनिक खत कमी झालं.

आज सध्यस्थितीत एक आदर्श शेतकरी झाले पण पंचक्रोशीत लोक शेंद्रीय शेती व दुधासाठी त्यांची ख्याती आहे. एखाद्या नोकर दाराला लाजवेल असेल त्यांनी कार्य केले आहे. त्यांना एक मुलगा, एक मुलगी, भाऊ त्याचे कुटुंब संयुक्त कुटुंब सुंदर बंगला या वर्षी बांधला आहे व त्याच्या बरोबरी शेतीतील शेंद्रीय पद्धतीने भाजीपाला आणि शेंद्रीय गूळ तयार करता हे सर्व शक्य झाले दूध व्यवसाय व देशी गाई मुळे त्यांच्या असलेले बाय प्रोडक्स:

  1.  साबण
  2. धूप बत्ती:
  3. दंत मंजन
  4. शेंद्रीय गूळ
  5. दशपर्णी अर्क, जीवामृत, घणजीवामृत, ह्युमिक, फिष ओईल, बोकासी खत

 

Farmer

या सर्व गोळी घरच्या घरी बनवून रासायनिक खताचा वापर १०० % कमी केला व गावातील अनेक लोकांना ते मार्गदर्शन करता व त्या गावात एक पाऊळ शेंद्रीय शेतीकडे टाकत आहेत. मठाचीवाडी पंचक्रोशीत त्याची शेंद्रीय शेती व दूध म्हणून ओळख निर्माण झाली आहे. केवळ १०,००० नोकरीच्या मागे न लागता दहावी पास व्यक्ती बरच काय करू शकतो हे समाजाला दाखवून दिला आहे त्यात ते सांगतात की, “गोविंद डेअरीचं मोलाचं योगदान आहे”.

 


सुखदेव अरविंद कदम

रा. मठाचीवाडी ता. फलटण, जि. सातारा
मो. न. 9011921893