जनावरांना उष्णतेच्या (ऑक्टोंबर हीट) तानापासून जपा
ऑक्टोंबर महिन्यात वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते व हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील उष्णता शरीर क्रियेचा वेग वाढून शरीराबाहेर टाकावी लागते, त्यामुळे शरीरावर ताण पडतो आणि जनावरांची बरीचशी उर्जा यावर खर्च होते. जनावरे पाणी कमी पितात व चारा किंवा खाद्य कमी प्रमाणात खातात म्हणून ऑक्टोंबर मध्ये आपल्याला जनावरांचे दूध कमी झालेले दिसते. तसेच दुधाला फॅट व एसएनएफ (SNF) न लागणे हे जाणवते.
उष्णतेच्या ताणामुळे जनावरांना होणारा प्रमुख आजार म्हणजे उष्माघात
त्याची लक्षणे खालील प्रमाणे दिसतात:
- जनावरे अस्वस्थ होतात व जनावरांची तहान आणि भूक मंदावते
- जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते
- जनावरांचा श्वासाच्छासाचा दर वाढवून जनावरांना धाप लागते
- जनावरांचे डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी गळते
- जनावरे मोठ्या प्रमाणामध्ये लाळ गाळतात त्यामुळे असिडोसिस होऊन अपचन होते
- जनावरांचा अतिसार होतो
- लघवीचे प्रमाण कमी होते
- जनावरे बसून असतात
- जनावरे गाभ जात नाही किंवा गाभण गाई गाभडण्याचे प्रमाण वाढते
उपचार
- जनावरांना थंड पाण्याने स्वच्छ धुऊन काढावे, झाडाच्या सावलीत अथवा इतर ठिकाणी बांधावे. गोठ्यासाठी सिमेंटच्या पत्र्यांचा वापर केला असल्यास त्यावर पाचट टाकावे किंवा आतील बाजूस चुना मारवा.
- जनावरांना नेहमीत थंड पाणी उपलब्ध असेल याची व्यवस्था करावी आणि सोबत इलेक्ट्रोवेट पावडर 2.5 ग्रॅम प्रति लिटर दररोज द्यावी.
- आहारा मधून वाढीव खनिज मिश्रण द्यावे
- जनावरांना दुपारच्या वेळेस चरण्यासाठी पाठवू नये किंवा खायला टाकू नये
- उष्णतेच्या ताणामुळे माजाचा कालावधी कमी असतो बऱ्याच वेळा जनावरे मुका माज दाखवतात. म्हैशी मध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. त्यासाठी जनावराचे सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा बारकाईने निरीक्षण करून माजाची लक्षणे पहाणे. माजावर आलेली जनावरे दुपारच्या वेळेस न भरता त्याऐवजी ते सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजेच उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर भरावी व अश्या जनावरांच्या आहारात नियमित इलेक्ट्रोवेट पावडर द्यावी.
इलेक्ट्रोवेट नियमित वापरल्याने
उष्णतेच्या तान ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाणावर नियंत्रण ठेवून दूध उत्पादन क्षमता टिकूईट, मिनरल्स, व विटामिन सी युक्त एक झटपट ऊर्जा देणारे सर्वोत्तम उत्पादन
- उष्णतेचा ताण कमी होतो
- जनावरे पाणी जास्त प्रमाणात पितात
- जनावरे चारा जास्त प्रमाणात खातात
- जनावरांचे दूध उत्पादन क्षमता टिकून राहते
- फॅट व एसएनएफ टिकून राहते
- जनावरांना धाप लागत नाही
- जनावरे गाभ जातात
पूर्व प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र सरकार
ईमेल आयडी: drkrshingal@gmail.com