जनावरांमधील गजकर्ण (रिंगवर्म) रोग

गजकर्ण (रिंगवर्म) हा गाई-बैलांना आणि माणसांना होणार बुरशीजन्य रोग आहे. हा एक गुरांना होणारा सर्वसामान्य त्वचा रोग आहे. ह्या बुरशीचे बीज कोश (स्पोअर्स) काही आठवड्यपासून काही वर्षापर्यंत वातावरणात जिवंत राहू शकतात.

रोगाचे कारण: ट्रायकॉफ़ायटन व्हेरोक्रोजम आणि ट्रायकॉफ़ायटन मेन्टॅग्रोफाईट्स ह्या नावांच्या बुरशीपासून हा रोग होतो.

संक्रमणाची पद्धत: निकट स्पर्शामुळे संसर्गित जनावर

सामान्यत: थेट स्पर्शामुळे रोग प्रसारास कारणीभूत होते. दूषित आंथरून (बेडींग), झूल आणि कपडयामुळे रोगाच्या प्रसाराळा मदत होते.

रोगाची लक्षणे: रक्तवर्ण डाग, करडे पांढुरके डाग, राखाडी रंगाच्या पृष्ठभाग असल्या सारखे प्रथम मुंडक्यावर दिसतात. नंतर ते माने भोवती दिसू लागतात व शेवटी सर्व शरीरभर पसरतात. ह्या चकदळांसारख्या डागाचा आकार कमी जास्त होऊ शकतो. त्वचेवरचे बदल केस विरहित होणे (अलोपेशिया), सालपटे निघणे, खपल्या धरणे (क्रस्टिंग) इत्यादी प्रकारचे होतात. कातडीची बुरशी (Dermatophyte) सहसा जास्त जीवित राहू शकत नाही. दाह प्रक्रिया (Inflammatory Reaction) रोग व्रणाच्या मध्यभागी सुरू होऊन बाहय गामी पद्धतीने पसरते व त्यामुळे वर्तुळाच्या बाहय सीमेवर अंगठीच्या गोला सारखा चकदळ व्रण निर्माण होतो. दुसरी लक्षणे म्हणजे खाज निर्मिती, केस झडणे आणि शारीरिक दुबळेपणा होणे.

प्रयोग शालेय निदानासाठी लागणारे नमुने: शस्त्रक्रियेसाठी वापरात असलेल्या चाकूच्या पात्याच्या साहाय्याने गजकर्ण झालेल्या त्वचेचा खरडून काढलेला भुगा आणि तेथील केस यांचा नमुना गोळा करावा (विशेषत: वृनाच्या बाह्य भागाचा नमुना) विशेषत: उपटलेल्या दूषित केसांचा त्यात समावेश असावा. हे नमुने शोषण न करणाऱ्या (non-absorbent) कागदाच्या तुकड्यावर जमा करून ते पाकिटात घालून प्रयोग शाळेला पाठवावेत.

रोग निदान:

  • सूक्ष्म दर्शकाखालील तपासणी-

रोगाच्या वृनावर ७० % अल्कोहल लावून नंतर स्काल्पेल (चाकूचे पाते) ने खोल खरवडून घेतलेल्या भुग्याचा भाग काचेच्या वर ठेवून त्यावर पोटॅशियम हायड्रॉक्साइड किंवा सोडियम हायड्रॉक्साइड (७० % द्रावण) चे दोन-तीन थेंब टाकून त्यावर कवरस्लिप ठेवावी पाच-दहा मिनिटे थांबून मग सुक्षम दर्शकाखाली त्याची तपासणी करावी. तपासणीत असे आढळून येईल की त्यात बुरशीचे धागे, बीजकोश आणि बीजकोश धारक दले यांचा समावेश आहे. पाहणी साठी प्रथम यांचा दर्शकांच्या लो पॉवर आणि नंतर हायपॉवर अक्ष दर्शकांच्या (Eye lense) उपयोग करावा.

२) “Sabaurads अगार” ह्या बुरशीवर्धक माध्यमाचा उपयोग पेट्रीडिशमध्ये ह्या रोगाच्या बुरशीची वाढ करून रोग निदान निश्चित करण्यासाठी करावा.

रोगोपचार: आयोडीन आणि गंधक (Iodine and Sulphur) युक्त औषधे. त्याचप्रमाणे बुरशीनाशक (canasol कुटुंबातील) औषधे किंवा बुरशीनाशक मलमे. बुरशीनाशक औषधे रोगाच्या वृनाच्या खपली खाली घुसून परिणाम करू शकत नाही. त्यासाठी ह्या खपल्या खरडून काढून मग मलमे तेथे चोळावीत. खपल्यांचा भुगा एकत्र जमा करून तो जाळून टाकावा. दूषित भाग जालीम बुरशीनाशक द्रव्याने पुन्हा पुन्हा साफ करावा आणि मग बुरशीनाशक मलम व औषध लावावे.

लसीकरण: काही देशांमध्ये प्रतिबंधक लस उपलब्ध आहे.

रोग प्रतिबंधन आणि रोग निवारण उपचार:

जैवसंरक्षण (बायोसेक्युरिटी) उपाय योजनाच्या वापर करावा. वातावरण (Environment) / गोठा / कंपाउंड यांची सफाई (बेडींग, झुली आणि कापडे यांचे सकट) योग्य पद्धतीने करणे. जनावरांच्या प्रत्येक बॅचच्या दरम्यान ती करणे आवश्यक आहे. जनावरांची गर्दी टाळावी. रोगी जनावरांची हाताळणी करताना हातात हात मोजे घालावेत. जनावरांना रोग प्रतिकारशक्ती मिळण्यासाठी संतुलित आहार द्यावा.


मराठी अनुवाद 

डॉ.एस.व्ही. पंडित
जेष्‍ठ शास्त्रज्ञ, निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे