दुग्धज्वर पीडित पशुंना तर्कनिष्ठ उपचारांची आवश्यकता

गाई-म्हशींमधील “दुग्धज्वर” म्हणजे काय?

“दुग्धज्वर” (मिल्क फीव्हर) हा विशेषत: गाई-म्हशींच्या विण्याशी संबंधित आहे. तो कॅल्शिअम कमतरतेने होत नसून गाय वा म्हैस व्यायल्यावर प्रथमच येणाऱ्या दुधांतील चिक निर्मिती (संश्लेषण) साठी त्यांच्या शरिरांतील कॅल्शिअम ची जमवाजमव (हलवाहलव) निसर्गत:न झाल्यामुळे तात्पुर्ती कमतरता पडल्यामुळे होतो. त्यामुळे रक्तजलांतिल (सीरममधील) कॅल्शिअम ची पातळी त्वरने कमी होते आणि म्हणून जनावर विशिष्ठ लक्षणे दाखवू लागते. सर्वसाधारणत: नियमाप्रमाणे 75% निदानित केसेस (क्लिनिकल केसेस) अधिकतरपणे गायी प्रसूत झाल्यापासून पहिल्या 3 दिवसांतच दिसून येतात (कांही वेळा तर प्रसवण्याआधी 24 ते 48 तास अगोदरच दिसतात.) आणि 10 ते 15 टक्के केसेस साधारणत: 4 ते 7 दिवस व्यायल्यानंतर दिसतात तर 5 टक्के केसेस 8 ते 15 दिवसांनंतर दिसतात. क्वचितपणेच खऱ्याखुऱ्या शास्त्रीय व्याख्येनुसारित (क्लासिक) केसेस 15 दिवसांनंतर दिसू शकतात. प्रसूतीच्या काळानंतरच ही लक्षणे दिसणे हाच निदानाचा महत्वाचा पुरावा आहे.  भारतात दुग्धज्वर गाईंपेक्षा म्हशींमध्येच जास्तकरून होतो.

दुग्धज्वरांचे निदान : दुग्धज्वराची लक्षणे ठळक असल्यामुळे त्याचे निदान करणे कठीण नाही. हृया रोगाचे “तीन टप्पे” वर्णन करता येतील.  पहिल्या टप्प्यांत स्नायूची “खिचाई” किंवा “चमकणे” दिसून येते. हृया टप्प्यांत गुद्दूद्वारांतील तापमान थोडेसे वाढते. “दुसऱ्या” टप्प्यांत जनावर उभे राहूं शकत नाही आणि म्हणून बसुनच रहाते. स्नायूंमधील चमका अजूनही ही चालूच रहातात, परंतु गुद्दूद्वाराचे तापमान कमी होते. हृदयातून बाहेर पडणारे रक्ताचे प्रमाण (कार्डीयाक आऊटपुट) कमी झाल्यामुळे कान आणि पाय हे शरिराचे टोकाचे अवयव “गार” पडतात. स्टेथॉस्कोप ने तपासल्यास हृदयाचे ठोके मंद पडल्याचे लक्षात येते. तिसऱ्या टप्प्यांत जनावर आपल्या एका बाजूला कलांडून पडते. शरिराचे तापमान नेहमींच्या पेक्षा कमी होते. हृदयाचे ठोके मंद क्षीण होतात. जनावराला गिळता येत नाही आणि त्यामुळे फेसाळ लाळ तोंडातून गळत राहते.

बद्ध कोष्ट झाल्यामुळे चेहरा टणक होतो. सर्वसाधारणपणे ही सर्व लक्षणे स्तन दुधाने पूर्ण भरल्यावर किंवा पहिले दूध काढून झाल्यावर दिसू लागतात. ज्या गाईंमध्ये प्रसूतीच्या अगोदरच चिकाच्या दुधाची निर्मिती (संश्लेषण) चालू हेाते किंवा स्तनांमध्ये दूध तुडूंब भरते त्या गाईंना “कल्काचे न्यूनत्व” (हायपो कॅलशेमिया) ची लक्षणे दिसू लागतात. त्यापैकी एक लक्षण म्हणजे गर्भाशयाचे जडत्व म्हणजेच (गर्भाशयाचे आंकुचन न होणे हे होय)

दुग्धज्वरावरील उपचार:

उपचारांतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वेग! दुग्धज्वर हा आपात्काल (emergency) आहे असे समजून उपचार ताबडतोब सुरू करावेत. जर त्यांत हयगय होऊन वेळ घालविला गेला तर जनावर पडूनच रहाते आणि मग उशीरा कॅल्शिअम दिल्यामुळे स्नायू/मज्जातंतूना इजा पोहोचल्यामूळे पुन्हा उठू शकत नाही. त्यामुळे पुष्कळवेळा त्याचे पर्यवसन “डाऊनर्स सिंड्रोम” ह्या व्याधींत होते. (यात पायाचे स्नायू व नसा संपूर्ण इजा होऊन स्नायुक्षय होऊन दौरबल्य येऊन पाय निकामी होतात.) अशावेळी उपचार करणे अशक्य होते. “आदर्श” म्हणजे एका तासाच्या आंत उपचार चालू करणे आवश्यक आहे. शिरेंतून “इंजेक्शन कॅल्शिअम” (सॅनकॅलव्हेट) सारखे इंजेक्शन फार्मरने स्वत: देणे उपयुक्त ठरेल. इतर गुंतागुंतीची लक्षणे नसतील तर “कॅल्शिअम बोरोग्लूकोनेट” (Calcium Borogluconate) होते. मानेच्या शिरेतून देणे हा उपाय सर्वोत्त्म आहे. सर्वसामान्यपणे याची “आर्धी” मात्रा (डोस) देवून झाली की जनावर उठून उभे रहाते आणि चारा खाऊ लागते.

कॅल्शिअम किती वेळा टोचावे आणि त्याचा डोस किती असावा हे प्रश्न विवाद्य आहेत.

माझ्या स्वत:च्या अनुभवावर बरहुकूम “कॅल्शिअम बोरोग्लुकोनेट 300” उपयुक्त आहे.  हळू-हळू टोचल्यामुळे हृदयाच्या गुंतागुंतीची (हार्ट कॉप्लिकेशन्स) विकंपन (कार्डीयाक फिब्रीलेशन) जोरजोरात होते. यासाठी “मॅग्नेशियम सल्फेट” हा एक उतारा (ऍंटीडोस) आहे.

जर जनावराने अर्धवट कॅल्शिअम च्या डोस टोचल्यानंतर (शिरेवाटे टोचल्यावर) सकारात्मक प्रतिक्रिया दाखविली तर मी तिथेच शिरेतील डोस थांबवितो आणि उरलेला डोस मी त्वचेखाली (सबक्युटेनियस) टोचतो. कॅल्शिअम शिरेवाटे दिल्यावर त्यांतील बहुतेक सर्व मुत्रावाटे बाहेर टाकले जाते. असे रिपोर्ट आहेत की कॅल्शिअम इंजेक्शन शिरेवाटे दिल्याबरोबर ताबडतोब सीरममधील कॅल्शिअम चे प्रमाण वाढत नाही. परंतु इंजेक्शनमुळे कॅल्शिअम च्या हालवाहलव (mobilization) प्रक्रियेस चालना मिळते (उत्तेजन मिळते) त्वचेखाली टोचलेल्या इंजेक्शनमुळे जास्तकाळ पर्यंत रक्तांत कॅल्शिअम चे शोषण (ॲबसॉरप्शन) होत रहाते. त्यामुळे लक्षणे उलटण्याची शक्यता कमी होते. बाजारांत कॅल्शिअम फॉस्फोरस मॅग्नेशियम आणि ग्लूकोज यांच्या “संयोगा”चे एक औषध (काँबिनेशन ड्रग) उपलब्ध आहे. ते कधी वापरणे योग्य आहे हे या रोगाच्या टप्प्यावर (स्टेज) अवलंबून आहे.

जेंव्हा जनावर तिसऱ्या टप्प्यावर असते म्हणजे जमिनीवर आडवे पडलेले असते (बाह्य उत्तेजनाला प्रतिसाद न देण्याच्या स्थितीत असते) आणि स्नायूंच्या चमका अजून चालू असतात. कमी कॅल्शिअम, मॅग्नेशियम व फॉस्फरसयुक्त इंजेक्शन अधिक पसंत करतो (अर्धा डोस शिरेवाटे व आर्धा डोस त्वचेखाली). जर जनावर कॅल्शिअम बोरोग्युकोनेटला चांगला प्रतिसाद देत असेल परंतु 12 ते 24 तासांनंतर लक्षणे पुन्हा उलटली तर मी काँबिनेशन ड्रग (संयोगीक औषधी) जास्त पसंत करतो. मी नेहमी पाठपुराव्यासाठी (फॉलोअप) डायकॅटॅनिक किंवा कोलायडल कॅल्शिअम इंजेक्शन टिकून रहाणाऱ्या (परसिस्टंट) कॅल्शिअम  उत्तेजक परिणामासाठी वापरतो की जेणे करून कॅल्शिअमची सतत हलवाहलव (mobilization) होत राहील. कॅल्शिअम ची इंजेक्शने ती एक प्रकारे नासाडीच आहे.

कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण केस दुसऱ्या दुग्धज्वरात (रिफ्रॅक्टिव) केसेसमध्ये मला जिवनसत्व ड-3 (व्हिटॅमीन डी-3) इंजेक्शनचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रसूत होणाऱ्या कल्क-न्यूनत्वच्या (हायपोकॅलसेमिक) केसेसमध्ये कॅल्शिअम दिल्यानंतर ताबडतोब गर्भाशयाची आंकुचने (कॉन्ट्रॅक्शनस) चालू होतात.

गाईंमध्ये चुकीच्या पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन्समध्ये कॅल्शिअम इंजेक्शन्सचा समावेश होतो. कॅल्शिअम इंजेक्शन म्हणजे “दुध वाढविणारे इंजेक्शन” न्वहे म्हणजे दुधवाढीसाठी किंवा गाईला “पान्हा फोडण्या”साठी त्यांचा उपयोग करू नये. ते इंजेक्शन फक्त “विशिष्ठ उपयोगा”साठीच वापरावे.

गाईंमध्ये दुग्धज्वराचा प्रतिबंध कसा करावा?

“दुग्धज्वर प्रतिबंधा” च्या संदर्भात असे निरिक्षण आहे की, “एकदा दुग्धज्वर” गाईला दिसला की पुढील वेतांमध्ये ही तो दिसून येतो. मोठ्या जनावरांच्या कळपांमध्ये दरवर्षी 2 टक्के जनावरांत दुग्धज्वर दिसतो. त्यासाठी प्रतिबंधक उपाय योजणे जरूरी आहे. त्यासाठी सध्याची शिफारस अशी आहे की जनावरांच्या दुग्धहीन कोरड्या काळांत (dry period) गाई म्हशींना वेगवेगळ्या प्रकारची “खनिज-मिश्रणे” की ज्यांत कमी धनभारित (Cations) आणि ज्यास्त ऋणभारित (Anions) विद्युत ऋणभारित कण आहेत,

याउलट प्रसूतीनंतरच्या काळांत जादा धनभारित आणि कमी ऋणभारित कण असलेली खनिज मिश्रणे (mineral mixtures) द्यावीत. मार्केटमध्ये सध्या बायोक्लोर (Biochlor) नावाचा प्रॉडक्ट आहे. त्याच्या वापरामुळे “दुग्धज्वरा”चा प्रादुर्भाव (Incidence) कमी होतो असे दिसून आले आहे तसेच इतरही संक्रमण संबंधित चयापचयाचे (मेटाबॉलिक) विकारही कमी होतात असे दिसून येते.

परंतु एक गोष्ट पक्की थंबरूल म्हणून लक्षांत ठेवा की दुग्ध उत्पादन काळातील देण्याचे खनिज मिश्रण शुष्क काळांत (dry period) आणि “ड्राय पिरियड” मध्ये देण्याचे खनिज मिश्रण दुग्धोत्पादन काळात कधीही देवू नका.

 


लेखक : डॉ. अब्दुल समद,

एम.व्ही.एस.सी., पि.एच.डी.(कॅनडा)
डेअरी कन्सलटंट

अनुवादक : डॉ. शरदकुमार विष्णू पंडित

बि.व्ही.एस.सी. (ऑनेर्स)
एम.व्ही.एस.सी. (मायक्रोबायॉलॉजी पॅथॉलॉजी पॅरासायटॉलॉजी)
पि.जी. (डेन्मार्क), जेष्ठ पशुवैज्ञानिक,
निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे