भारतीय वंशांच्या दूधाळ गायी व म्हशींच्या प्रमुख जाती

भारताला दुधाची गंगा संबोधले जाते. गेल्या 20 वर्षात आपला भारत देश हा दुग्धउत्पादनात जगात अग्रस्थानी आहे. आज दुधांच्या कमी जास्त भावावरून सतत आंदोलने होत असतात, शेतकरी आणि पशुपालकांच्या मते दुग्धव्यवसायात काही कस राहीला नाही. डॉ. वरगीस कुरीयन यांनी केलेल्या दुग्धक्रांतीनंतर आपल्या देशात दुधाची खरोखरच लाट आली पण ती क्रॉसब्रीड गायींच्या दुधाचीच. जर शेतकरी बांधवांना आणि पशुपालकांना दुग्धव्यवसायात भरघोस नफा मिळवायचा असेल तर ‘देशी’ उत्पादकतेकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. कारण भारतीय वंशांच्या गायी व म्हशींच्या दुधाची गुणवत्ता क्रॉसब्रीड गायींच्या दुधापेक्षा कैक पटींनी चांगली मिळते आणि पर्यायाने या देशी गायींच्या आणि म्हशींच्या दुधाला सर्वोत्तम भाव मिळतो. म्हशींच्या संख्येत आणि दुग्धउत्पादनात परत आपला भारत देश अग्रस्थानी आहे. क्रॉसब्रीड गायींच्या तुलनेत देश गायी व म्हशींची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्याने त्यांच्यावर होणारा पशुवैद्यकीय खर्च टाळता येतो.

भारतीय वंशांच्या म्हशींच्या प्रमुख प्रजाती :

पंढरपुरी : महाराष्ट्र राज्यातील सांगली, सोलापूर आणि सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात आढळते.
वैशिष्ट्य : लांब व टोकदार शिंगे, काळा रंग, उत्तम फॅट.
दुध उत्पादन : सरासरी 1800 ते 1950 Kg./Lactation, दिवसाला 20 लिटरपर्यंत देवू शकतात.

मुर्हा : (देल्ही, कुंडी, काली) : हरियाणा राज्यातील हिसार, रोहतक, गुडगाव, जिंद या जिल्ह्यांमध्ये आणि दिल्ही.
वैशिष्ट्य : अंगापिंडाने मजबुत, वक्राकार शिंगे
दुध उत्पादन : सरासरी 1700 ते 1900 Kg./Lactation, दिवसाला 20 लिटरपर्यंत देवू शकतात.

जाफ्राबादी (गीर) : गुजरात राज्यातील सौराष्ट्र, गीर जंगल, जाफ्राबाद जिल्हा.
वैशिष्ट्य : मजबुत बांधा, डोळ्यापासून शिंगे, उत्तम फॅट.
दुध उत्पादन : सरासरी 2200 ते 2300 Kg./Lactation, दिवसाला 16 लिटरपर्यंत देवू शकतात.

नागपुरी (बोरारी, गावराणी, वर्हाडी, गौळावी): महाराष्ट्र राज्यातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात.
वैशिष्ट्य : मध्यम बांधा, करडा रंग, टोकदार शिंगे.
दुध उत्पादन : सरासरी 1200 ते 1500 Kg./Lactation, दिवसाला 10 लिटरपर्यंत देवू शकतात.

मराठवाडी (एलीचपुरी आणि दुधणा थडी) : महाराष्ट्र राज्यातील जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात.
वैशिष्ट्य : मध्यम बांधा, सरळ शिंगे, काळा रंग.
दुध उत्पादन : सरासरी 1200 ते 1250 Kg./Lactation, दिवसाला 7 लिटरपर्यंत देवू शकतात.

भारतीय वंशांच्या प्रमुख दूधाळ गायी:

गिर (गुजराती, काठीयावाडी, सुरती): गुजरात राज्यातील अमरेली, भावनगर, जुनागढ आणि राजकोट जिल्ह्यात.
वैशिष्ट्य : लांब कान, मजबुत बांधा, लाल रंग ई.
दुध उत्पादन : सरासरी 1000 ते 3000 Kg./Lactation, दिवसाला 20 लिटरपर्यंत देवू शकतात

साहिवाल (लांबी बाल, मुलतानी): पंजाब राज्यातील फिरोझपुर, अमृतसर आणि राजस्थान राज्यातील गंगानगर जिल्ह्यात.
वैशिष्ट्य : टोकदार शिंगे, लाल रंग, उत्तम फॅट.
दुध उत्पादन : सरासरी 1650 ते 2800 Kg./Lactation, दिवसाला 13 लिटरपर्यंत देवू शकतात.

राठी (राठ) : राजस्थान राज्यातील बिकानेर, गंगानगर आणि जैसलमेर जिल्ह्यात.
वैशिष्ट्य : लांबसडक, कमी मेंटेनन्स.
दुध उत्पादन : सरासरी 1100 ते 2850 Kg./Lactation, दिवसाला 10 लिटरपर्यंत देवू शकतात.

लाल सिंधी (लाल कराची, मालीर आणि सिंधी): सिंध प्रांत.
वैशिष्ट्य : निमुळता तोंड, चांगली दुधाळ.
दुध उत्पादन : सरासरी 1100 ते 2700 Kg./Lactation, दिवसाला 9 ते 11 लिटरपर्यंत देवू शकतात.

गऊळाऊ/गवळाव (आर्वी, गौलगणी): वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू, हेटीकुंडी व नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुका.
वैशिष्ट्य : पांढरा रंग.
दुध उत्पादन : सरासरी 500 ते 800 Kg./Lactation, दिवसाला 3 लिटरपर्यंत देवू शकतात.

थारपारकर (पांढरी सिंधी, ग्रे सिंधी, धारी): गुजरात राज्यातील कच्छ आणि राजस्थान राज्यातील बाडमेर, जैसलमेर, जोधपूर जिल्ह्यात.
वैशिष्ट्य : पांढरा रंग, करडा रंग.
दुध उत्पादन : सरासरी 1000 ते 2300 Kg./Lactation, दिवसाला 8 ते 9 लिटरपर्यंत देवू शकतात.

कांकरेज (नागर, बनाई): राजस्थान राज्यातील बाडमेर, जोधपूर आणि गुजरात राज्यातील मेहसाणा, खेडा, अहमदाबाद, बनासकांठा, साबरकांडा, कच्छ जिल्ह्यांत.
वैशिष्ट्य : गोलाकार शिंगे.
दुध उत्पादन : सरासरी 800 ते 1800 Kg./Lactation, दिवसाला 5 ते 6 लिटरपर्यंत देवू शकतात.

आपला भारत देश हा विविध संस्कृतींचा देश आहे. सध्या कोरोनाच्या वैश्वीक महामारीसारख्या काळात देशी वस्तुंचे महत्त्व अनन्यसाधारण झालेले असल्यामुळे नवीन आणि तरूण शेतकरी बांधवांनी आणि पशुपालकांनी या उन्नत देशी गोपालनाकडे गांभीर्याने पाहायला हवे. कारण याच देशी गायींच्या Waste पासून अनेक पदार्थ बनवून विकू शकतो. सोबतच देशी गायींच्या दुधापासून बननारे सर्व आयुर्वेदीक पदार्थांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

 

Read: दुधाळू जनावरांचे हिवाळ्यातील व्यवस्थापन


डॉ. ओंकार थोरात

एम. व्ही. एस. सी., पशुपोषणशास्त्र.
ई-मेल आयडी: onkarthorat1602@gmail.com

 

बाजारातील संबंधित उत्पादने