गायींच्या आरोग्यासाठी उष्माघात टाळणे महत्वाचे

एप्रिल महिन्यापासून भारतातील बहुसंख्य भागात उन्हाळा तीव्र व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अनेक जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागतात. तथापि, या नित्यनेमाने होणाऱ्या व्याधीबद्दलही अनेक पारंपारिक गैरसमज रूढ आहेत. ते दूर करण्यासाठी या लेखातील माहिती उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे.

c

गायींबैलांना अनुकूल असलेल्या तापमानाची मर्यादा :

अनेक संशोधनांतून असे सिद्ध झाले आहे, की केवळ तापमान नव्हे, तर त्यासोबत आर्द्रतेच्या मर्यादेनुसार जनावरांच्या शरीरक्रियांवर परिणाम होत असतात. बदल घडत असतात.

जनावरांना अनुकूल असणाऱ्या वातावरणाच्या बाबतीत विशेषत: समशीतोष्ण भागांतील जनावरांच्या बाबतीत उष्मार्द्र्ता दर्शकसूचीचा (टेम्परेचर-ह्युमिडी इंडेक्स) विचार केला जातो. एखाद्या तापमानात सापेक्ष आर्द्रता किती असावी आणि त्यांनुसार शरीरक्रियांत होणारे बदल कसे अनुकूल किंवा प्रतिकूल होवू शकतात, याचा त्याद्वारे अंदाज घेतला जावू शकतो. मात्र, या पद्धतीत सौर उत्सर्जन (सौर तापमान), वाऱ्याची (हवेची) गती, आणि बाष्पांक हे वातावरणाचे घटक विचारात घेतले जात नाहीत. तथापि, या दर्शकसूचीमुळे काही प्रमाणात तापमान व आर्द्रता यांचा विचार केल्यास नियोजनाच्या आखणीसाठी फायदा होवू शकतो. त्यामुळे समशीतोष्ण भागात उष्मार्द्र्ता दर्शकसूची विचारात घेतली जाते. मात्र, ध्रुवीय भागातील जनावरे व प्राणी यांच्या बाबतीत ज्या दोन निकषांचा विचार केला जातो, ते म्हणजे तापभार दर्शकसूची (हिट लोड इंडेक्स) आणि समानांकित तापमान दर्शकसूची (Equivalent Temperature Index), त्यांत वातावरणातील इतर घटक लक्षात घेतले जातात. त्यांनुसार गायीबैलांतील या दर्शकसूचीच्या मर्यादा खालीलप्रमाणे असतात.

समानांकित तापमान दर्शकसूची

(इक्विव्हेलंट टेम्परेचर इंडेक्स)

 तापभार दर्शकसूची

(हिट लोड इंडेक्स)

धोकासूचक ३० – ३४ ८९ – ९२
काळजीप्रद ३४ – ३५ ९२ – ९५
धोकादायक ३५ हून अधिक

९५ हून अधिक

जनावरांतील उष्माघाताचे परिणाम / लक्षणे :

  • श्वासोच्छ्वासात लक्षणीय वाढ
  • पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ
  • घाम सुटण्याच्या प्रमाणात वाढ
  • आहारात घट
  • दुग्ग्धोत्पाद्नात घट
  • दुधाच्या दर्जात – विशेषत: मेद व प्रथिनांच्या प्रमाणात – घट
  • रक्तातील संप्रेरकांच्या प्रमाणात बदल (उदा. : प्रोलॅक्टिन मध्ये वाढ)

त्याचप्रमाणे, उष्माघातामुळे उत्पादनात २५ – ३० टक्के एवढी लक्षणीय घट होवू शकते. जनावरांची प्रजनन क्षमताही खालावते. त्याचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी हे लक्षात घ्यावे की – पाच गायींपासून दररोज ७५ लिटर एवढे दूध उत्पादन होत असेल, तर उष्माघातामुळे होणाऱ्या परिणामामुळे उन्हाळ्यात साधारणपणे ४२ हजार रुपयांचे नुकसान होवू शकते. शिवाय, वाढीव दुभत्या काळातील दररोजचा घसारा लक्षात घेता दररोज १०० रुपये, याप्रमाणे गृहीत धरले , तर एकूण ४५ हजारांचे नुकसान होवू शकते. शिवाय, संकरित जनावरांच्या क्षमतांवरील परिणाम तर दीर्घकालीन किंवा कायमही असू शकतात. हे लक्षात घेता, एवढे मोठे नुकसान वाचवण्याकरिता व दीर्घकालीन फायद्यांसाठी २० – २५ हजारांची गुंतवणूक करणे व्यावहारिकदृष्ट्या निश्चितच शहाणपणाचे ठरते. यास्तव, आपल्या भागातील वातावरण, तापमानाची वाढ व तीव्रता लक्षात घेवून जनावरांच्या संख्येनुसार त्यांना सुरक्षित, शीतल निवारा, भरपूर सावली पुरवण्याचे नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.

जनावरांतील उष्माघाताचे निराकरण करण्याचे मार्ग :

सौर उत्सर्जनाच्या थेट प्रभावापासून संरक्षणासाठी उपाययोजना करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी योग्य निवाऱ्यांची व्यवस्था. विशेषत: नैसर्गिक निवारा, आंबा किंवा लिंबासारख्या झाडांची सावली अधिक सुरक्षित मानली जाते. तसेच, गोठे, निवाऱ्यांच्या परिसरात, कुंपणाभोवती लावलेली वृक्षराजी अधिक किफायतशीर. याशिवाय, तात्पुरत्या निवाऱ्यासाठी, परिसरातील सौर तापमानाच्या आवश्यकतेनुसार दाट किंवा विरळ जाळीही वापरता येते. हे उपाय अतिशय कमी गुंतवणुकीचे आहेत.

उष्माघाताची लक्षणे

  • मात्र, उन्हाळ्यात तापलेली हवा जमिनीपासून वर वहात असल्यामुळे अशा प्रकारची जाळी खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी, असलेल्या जाळीची सछिद्रता वाढवली, तर तिचे संरक्षण होवू शकते. (अशा प्रकारची योग्य जाळी पुरवणाऱ्या पुरवठादारांचीही माहिती आपल्याच संकेतस्थळावर उपलब्ध होवू शकते. त्यासाठी जनावरांच्या मुक्त संचार पद्धतीवरील लेखाचे अवलोकन करावे.)
  • भरपूर काड्या-काथ्याचे आच्छादन असलेल्या कुडाच्या छताचे आवरण निवाऱ्याच्या जागेस सहज पुरवता येते. त्यानेही जनावरांना सहज संरक्षण मिळू शकते.
  • मात्र, छतासाठी व निवाऱ्यासाठी एस्बेस्टॉस तसेच धातूचे पत्रे वापरणे असुरक्षित ठरते. कारण, त्यांची दिवसा उष्मा ग्रहण करण्याची व रात्री उत्सर्जन टिकवण्याची क्षमता अधिक असते.
  • शिवाय, ग्रामीण भागात बहुसंख्य ठिकाणी गोठ्यांची, निवाऱ्यांची उंचीही जेमतेम असते. त्यामुळे, ही जनावरांना उष्म्याचा अधिक त्रास अधिक काळ सहन करावा लागतो. त्यासाठी छताची उंची अधिकाधिक ठेवली गेली पाहिजे.
  • उष्म्यापासून सुरक्षेसाठी थंड पाण्याचा पुरवठा सातत्याने उपलब्ध करणे ही एक महत्वाची उपाययोजना आहे. मुक्त संचार निवाऱ्यात कायम उपलब्धतेची सोय करून, बंदिस्त जनावरांना किमान ४ – ५ वेळा पाणी पुरवले पाहिजे. इतकेच नव्हे, तर पाण्याच्या तापमानाचाही विचार केला पाहिजे. उन्हाळ्यात पाणी तसेही तापते. ते रोखण्यासाठी जाड व तापरोधक प्लास्टिक आवरणांनी युक्त असलेली भांडी, घमेली ठेवावीत. छतावरील टाकीही तापरोधक व जाड आवरणाची असावी. अशा पद्धतीच्या सामुग्रीचीही माहिती संकेतस्थळावर आहे.

शीतकरण प्रणालीचा वापर

गायींच्या निवाऱ्यात शीतकरण प्रणालीची सोय केल्यास त्याचे खूप फायदे त्यांच्या आरोग्यासाठी व उत्पादनावरील अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी होवू शकतात, हे अनेक संशोधकांनी सिद्ध केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार साधे पंखे व शक्य झाल्यास थंडावा देणाऱ्या फवाऱ्यांचे नियोजन करता आल्यास अधिक उत्तम. अर्थात निवाऱ्याच्या परिसरातील वाहत्या हवेचे प्रमाण, त्याचप्रमाणे वातावरण शुष्क उष्म्याचे आहे की उष्मार्द्र आहे, या बाबी लक्षात घेवून त्याचा वापर करावा लागेल. त्यासाठी संकेतस्थळावरील संबंधित लेखाचे अवलोकन करावे.


अनुवादक

डॉ. संतोष कुलकर्णी
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर