हस्त दुध प्रक्रिया: निरोगी कशी राखावी?
हस्त दुग्ध प्रक्रियेमध्ये हाताने दुध काढणे दुध यंत्राने दुध काढणे या सर्व क्रिया निरोगी असाव्यात. दुध काढण्याची क्रिया अत्यंत काळजीपूर्वक व्हावी पण त्यासाठी काही नियम पाळणे महत्वाचे आहे. जर गाईचे दुध काढण्याची प्रक्रिया पद्धतशीर केली तर गाय सुद्धा नेहमीपेक्षा जास्त दुध देऊ शकते. शुद्ध दुध मिळवण्यासाठी काही महत्वाच्या सूचनांचे पालन करावे.
- दुध काढणारी व्यक्ती (गवळी) अत्यंत स्वच्छ आणि कोणताही आजार नसलेला म्हणजेच निरोगी असावा.
- गाईंचा गोठा अत्यंत स्वच्छ असावा. त्यात कोणत्याही प्रकारची घाण, धूळ किंवा चिखल नसावा. गाईंना वेळोवेळी पाण्यानी अंघोळ घालावी.
- गाईंच्या अंगावरील केस, धूळ हे दूध काढते वेळी दुधात पडणार नाही याची काळजी घ्यावी. दुध काढण्यापूर्वी गाईचे सड स्वच्छ आहे का नाही हे बारकाईने पहावे.
- गाईचे दुध काढण्याची वेळ ठरवून घ्यावी. साधारणतः बारा तासांच्या अंतराने दुध काढवे. शक्यतो दुध काढणारी व्यक्ती एकच असावी.
- नियमानुसार ही प्रक्रिया सुव्यवस्थित रीतीने राबविल्यास कोणताही ताण पडणार नाही. गाईंना ही त्रास होणार नाही असे असल्यास दुधकेंद्र यशस्वी होईल.
- गाईंच्या गोठ्याजवळ कोणताही आवाज गोंधळ होता कामा नये, त्याचा परिणाम गाईचे दूध कमी मिळण्यावर होतो हे लक्षात घ्यावे.
- आपल्या विभागातील कृषिविस्तार अधिकाऱयाचा सल्ला घेऊन गाईचे पहिल्या वेळेला जे दूध काढले जाते त्याची चाचणी करून घ्यावी. ती चाचणी कशी करतात हे समजून घ्यावे.
- गाईंचे मागचे दोन्ही पाय व शेपूट बांधून ठेवल्यास शेपटीची हालचाल होणार नाही याची काळजी घावी.
- सड पाण्याने स्वच्छ करून घ्यावे आणि नंतर एका मिनिटाने दुध काढावे त्यासाठी निर्जंतुक कापडाचा वापर करावा. अस्वच्छ कापड वापरल्यास दुधावर परिणाम होऊ शकतो.
- दुध काढणाऱ्या व्यक्तीने दुध काढण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत, हात ओलसर राहू नाही याची काळजी घ्यावी. त्या व्यक्तीने दुधाच्या भांड्यात हात घालू नये त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
- दुध काढण्याची प्रक्रिया साधरणतः पाच ते सात मिनिटात पूर्ण व्हावी. कारण गाय त्यानंतर दुध देण्याचे थांबवते. काढलेले दुध मोठ्या कंटेनर मध्ये किंवा धातूच्या भांड्यात संकलित करावे. त्यानंतर लगेच झाकण ठेवावे कारण धूळ जाण्याची शक्यता असते.
- कंटेनर किंवा धातूचे मोठे भांडे ज्यात दुध संकलित केले आहे ते फ्रिजमध्ये किंवा थंड जागेवर ठेवावे.
- दुध काढून झाल्यावर गाईंचे वासरू स्तनपान करताना आढळल्यास टीट डीप (teat dip) वापरावेत.
- दुध काढणाऱ्या व्यक्तीने वर्षातून एकदा तरी वैदकीय तपासणी करून घ्यावी.
- दुध काढण्याची यंत्रे भारतात व परदेशातही उपलब्ध आहेत त्याची चौकशी करावी.
डॉ. के. आर. शिंगल
सेवानिवृत्त विभागीय सह आयुक्त, पशुसंवर्धन
महाराष्ट्र राज्य, भारत सरकार