दुधाळू गाईंना संरक्षण आणि आराम कसा पुरवावा

दुधाळू गाईंना संरक्षण आणि आराम

दुधाळू गाईंना संरक्षण आणि आराम ह्या दुग्ध व्यवसायाचा पाया आहेत. शेतकऱ्यांसाठी दुधाळू जनावरे जीवनाचा स्रोत आहेत तर ग्राहकांसाठी ती दररोजच्या पोषणचा जीव नावश्यक भाग आहेत. म्हणून ही जनावरे संरक्षित करणे, निरोगी आणि उत्पादनांत राहण्यासाठी अनिवार्य आहे. ह्या जनावरांना पाऊस, हिमवर्षाव, सुर्य प्रकाश, कमी वा उच्च तापमान, जोरदार वारे, अतिवृष्टीचा पाऊस, दव, जादा आर्द्रता, परोपजीवी जीव, जंतू आणि त्यांची कामगिरी व आरोग्य यांना अडथळा आणणारी कोणतीही बाब यापासून संरक्षण देणे आवश्यक आहे. अयोग्य निवाऱ्याची घरे, अपुरे पाण्याचे स्रोत आणि वायुविजन, अयोग्य शय्येचा पेंढा, दाटीवाटीने राहण्याची व्यवस्था आणि अस्वस्थतापूर्ण परिस्थिती इत्यांदीमुळे जंतू संसर्गाला वाढती संवेदनशीलता निर्माण होणे आणि उत्पादन क्षमता घटणे इत्यादी गोष्टी घडतात.

गोठ्याची जमीन (फरशी), जनावरांच्या शय्येचा पेंढा, विश्रांतीची जागा, पिण्याच्या पाण्याचे आणि खाद्याचे कुंडांची जागा, पेंढा साठवण्याची जागा, इत्यादींबद्दल विशेष लक्ष देणे आणि निवारा, व्यवस्थापन व जनावरांचे कल्याण यांचा विचार करतांना जनावरांच्या कळपाची हालचाल (movement) कशी होणार आहे याकडे लक्ष पुरविणे अपेक्षित आहे. जनावरांचे आरोग्य, पोषण आणि आराम त्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.

जनावरांच्या सुरक्षा आणि आरामासाठी अनुकुल अशा काही पद्धतींची माहिती आता आपण पाहुया:

  1. जनावरांना जास्तीत जास्त आराम पुरविणाऱ्या आणि त्यांना चांगले आरोग्य प्रदान करणाऱ्या आणि त्यांचे उत्पादन वाढविणाऱ्या गोष्टी त्यांना पुरविणारी रचना असलेली निवाऱ्याची जागा, कोठ्या (कडबा-धान्ये इत्यादी साठवण्याच्या कोठ्या), निवाऱ्याच्या शेडस्, वासरांचा निवारा-घरे इत्यांदीची सोय असावी.
  2. ज्यावेळी 48° डिग्री सेंटिग्रेड पर्यंत वाढलेले तापमना असते अशा उन्हाळ्याच्या काळात जनावरांना दाट सावली असलेल्या झाडांखाली बनविलेल्या चारी बाजुंनी मोकळ्या असलेल्या शेडमध्ये ठेवावे.
  3. ज्यावेळी 0° डिग्री सेंटिग्रेड किंवा क्वचित त्याहिपेक्षा कमी तापमान असते अशा हिवाळ्याच्या काळात अत्यंत ठंडगार वारे आत शिरू शकणार नाहीत अशा बंदिस्त निवाऱ्याच्या शेडमध्ये वादळ, पाऊस अथवा हिमवर्षावापासून बचाव होईल अशी रचना शेडमध्ये आवश्यक आहे. उबदार आणि कोरडे असे वाळलेले गवत, वाळू, लाकडी भुसा किंवा वाळलेले शेणखत यांपासून बनविलेले बेड वापरल्यास त्यांत जंतू वा बुरशी संसर्ग होणे टळेल. त्या शिवाय अशा गोठ्याच्या खोलीत पुरेसा पाणी आणि चारा-अंबोणाचा साठा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जनावरे तंदुरूस्त व तरतरीत रहातील. ह्या काळात जेंव्हा तापमानात वाढ होईल तेंव्हा जनावरांना फिरण्यासाठी ह्या बंदशेड भोवती (फिरण्यासाठी) मोकळी जागा (बंदिस्त) असणे आवश्यक आहे. यामुळे ती तंदुरूस्त रहातील.
  4. जनावरे विशेषत: जोरदार पाऊस किंवा वादळी वारे वाहत असतांना बंदिस्त जागेत बांधल्यास ती ओली होवून नको असलेल्या रोगराईच्या संसर्गापासून वाचतील.
  5. जनावरे अधिक काळ पर्यंत कोंडून वा बांधून ठेवू नयेत. दररोज जनावरांना 2 ते 4 तास मोकळे सोडणे चांगले असते. त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालींना वाव मिळतो आणि इतर सहकळपातील जनावरांमध्ये मिसळता येते. शारीरिक हालचाली आणि मोकळ्या वातावरणांत फिरल्यामुळे जनावरे तंदुरूस्त (फिट) राहतात तसेच ती ऊर्जायुक्त आणि आनंदी राहण्यास मदत होते.
  6. आरामशीर उभे राहण्यासाठी, जमिनीवर आडवे होण्यासाठी व आजुबाजुंना हालचाल करण्यासाठी, तसेच दोन प्रौढ जनावरे यांच्यामध्ये कमीत कमी चार फुट अंतर राहण्यासाठी जनावरांना बांधण्याचा दोर पुरेसा लांब असणे आवश्यक आहे.
  7. बांधलेल्या जनावरांना दिवसातून 3 ते 6 वेळा पिण्यासाठी ‘पिण्याचे पाणी’ मिळणे आवश्यक आहे. हे पाणी ताजे असणेही आवश्क आहे. हवामाना प्रमाणे पाणी कमी वा जास्त लागू शकते.
  8. समुद्र काठाच्या प्रदेशांमध्ये छत उडण्याची भीती असल्यामुळे वाऱ्याच्या दिशा पाहून जनावरांची शेड उभारावी. ते करताना हवेच्या हालचालींसाठी जागा सोडणे आवश्क आहे. कोरड्या गरम प्रदेशांत नैसर्गिक वायुविजन आणि सुर्य प्रकाशचा उपयोग करूनच शेड बांधणी करावी. समुद्र काठाच्या प्रदेशांत जेथे सरासरी तापमान 30 डिग्री सेंटीग्रेड किंवा जास्त दिवसाच्या 5 तासांपेक्षा पेक्षा जास्त काळ असते, तेथे जर ते पुर्वेपासून पश्चिमेकडे असेल तर शेड उत्तर ते दक्षिण मुखी गोठ्याची रचना असावी.
  9. निवारा आणि गोठ्यांमध्ये भरपूर खेळती हवा आणि उजेड असणे गरजेचे आहे. धुलीकण आणि वायुंची घुसखोरी कमीत कमी पातळीवर अवावी, की जेणे करून जनावरांना त्यांच्या पासून कोणतीही हनी पोहोचू नये.
  10. आजारी जनावरांचा कळप मुख्य निरोगी जनावरांपासून वेगळा ठेवणे हिवावह आहे. त्यामुळे अशी जनावरे वेगळ्या गोठ्यांत ठेवल्यास त्यांच्या पासून संसर्गजन्य रोगांचे प्रसारण होणे टळेल. त्यांना काळजीपूर्वक उपाय योजना करून आणि पुरेसे खाद्य, पाणी व औषधे देवून आणि उपाय योजना करून बरे करावे.
  11. निवारा आणि गोठे उतारापासून लांब सखल भागात बांधावेत.

सारांश: दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्याची ही जबाबदारी आहे की, त्याने दुधाळू जनावरांसाठी आनंदी वातावरण निर्माण होईल असे जनावरांचे आरामदायी, आरोग्यपूर्ण, कोरडे सर्व हवामानांत त्यांचे रक्षण करतील असे निवारा-गोठे बांधावेत त्यांची बांधणी अशी असावी की त्यामुळे जनावरांना मोकळेपणे तर वावरता येईलच पण शिवाय त्यांना कोणताही रोग वा दुखापत होणार नाही.

हेही वाचायला आवडेल तुम्हाला: पशुपालकांनों!! जर असेल तुमचा यांत्रिक गोठा तर मोजा नोटाचं नोटा

 


अनुवाद

डॉ. श. वि. पंडीत
निरंजन, बायोटेक, नांदोशी, पुणे