जनावरांमधील बाह्य परजीवींचे नियंत्रण

सध्या बाह्य परजीवींचे नियंत्रण (External parasites in cattle) हा मोठा प्रश्न पशुपालकांनसमोर आहे. गोचीड, गोमाशा, उवा, लिखा, पिसवा इ. बाह्य परजीवीमुळे जनावरांची हानी होते. बाह्य परजीवी आजारी जनावरांकडून स्वस्थ जनावारांकडे रोगाचा पसार करतात. यांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या आरोग्यावर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जनावरांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी परजीवींचे नियंत्रण होणे अत्यंत महत्वाचे आहे.

बाह्य-परजीवी म्हणजे काय ?

जे इतर जनावरांना आपल्या उपजीविकेसाठी लक्ष्य करतात किंवा ज्या परजीवीचे इतर जनावरांवर भरण पोषण होते. अशा जीवाना बाह्य परजीवी असे म्हणतात. बाह्य परजीवी जनावरांच्या पृष्ठ भागावर आढळतात. (आंत्र परजीवी जनावरांच्या आतील भागात राहतात.)

परजीवी दोन प्रकारचे असतात.

  • आंत्र परजीवी : गोलकृमी, चपटेकृमी, पर्णकृमी
  • बाह्य परजीवी : उवा, गोचीड, लिखा, डास

बाह्य परजीवीमुळे होणारे दुष्परिणाम :

External parasites in cattle

  • जनावरांची (वासरे, करडे, कालवडी) वाढ मंदावते.
  • जनावरांमध्ये चयापचय क्रियेचा वेग मंदावतो व अन्नाचे पूर्ण पचन होत नाही.
  • जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
  • दुभत्या जनावरांच्या दुध उत्पादनात घट होते.
  • जनावरांच्या वजनात घट होते.
  • बाह्य परजीवीच्या चाव्यामुळे जनावरांना इजा होऊन रक्तस्त्राव होतो.
  • त्वचेला खाज सुटल्यामुळे जनावर अस्वस्थ होते.
  • काही बाह्य परजीवी रक्त लघवी, गोचीडताप इ. सारखे रोग एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांमध्ये प्रसारित करतात.
  • त्वचा निस्तेज होते. तसेच जनावरांमध्ये केस गळण्याची समस्या उद्भवते.
  • बाह्य परजीवी जनावरांच्या शरिरातील रक्त शोषण करतात त्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येतो.
  • लसीकरणाचा योग्य परिणाम होत नाही.

बाह्य परजीवींचे नियंत्रण कसे करावे ? 

  • जनावरांच्या गोठ्याची व परिसराची नेहमी निगा राखावी.
  • गोठ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • गोठ्यात शेण साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • गोठाच्या भिंती गुळगुळीत ठेवाव्यात.
  • गोठ्यातील खाचखळग्या जाळून घ्याव्यात
  • बाधित जनावरांना दर १५ दिवसांनी अंगावर कीटकनाशकाची फवारणी करावी. कीटकनाशकाची फवारणी केल्यावर जनावर ते चाटणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • गोठ्यात २ ते ३ आठवड्याच्या अंतराने कीटकनाशकांची फवारणी करावी.
  • अंगावर गोचीड कमी प्रमाणात असतील तर ते हाताने काढून टाकावेत.
  • जनावरांना नेहमी खरारा करावा.
  • जनावरांना उत्तम क्षारमिश्रणे द्यावी.

टीप: बाजारात वेगवेगळ्या नावाने गोचीडनाशक/ कीटकनाशक औषधी (डेल्टामेक्टिन (DoramectinDectomax Injection/DeltamethrinKatyayani Deltamethrin 1.25% ULV for Mosquitoes Cockroaches Bed Bugs Flies Flying and Crawling Household Quick Knock Down Insecticide Insects Thermal or Ultra Low Volume Fogging Spray (1 L) Deltamethrinउपलब्ध आहेत. पशुवैद्यकाच्या सल्याने औषधाचा वापर करावा.

बाजारात उपलब्ध उत्पादने:

RIDD Growvit Powder Norbrook 2251053C Ivermectin-Noromectin Injection 1-Percent-500 cc

 

हेही वाचायला आवडेल तुम्हाला : दुभत्या जनावरांमधील गोचिडींचा प्रादूर्भाव आणि त्यावरील उपाय  


      

डॉ. श्रद्धा राऊत

पशुपोषण आहारशास्त्र विभाग,
पशुवैद्यक व पशुविज्ञान महविद्यालय, उदगीर, जि. लातूर
ईमेल आयडी : skraut1996@gmail.com