डाऊनर काऊ सिंड्रोम (वेतोत्तर गोपात लक्षण) निदान आणि उपचार
डाऊनर काऊ सिंड्रोम उर्फ वेतोत्तर गोपात लक्षण हे लक्षण गाय ज्या वेळेस कॅलशियम (कल्क) उपचारांना दाद देत नाही किंवा ते उपचार करावयास उशीर होतो त्यामुळे होणाऱ्या कॅलशियम न्यूनतेमुळे गाय व्यायल्यानंतर येणाऱ्या झटक्यांत दिसते. गाय व्यायल्यावर जमिनीवर पडते व स्वत:च्या पायांवर उभी राहू शकत नाही असे दिसल्यावरून हे नाव (डाऊनर काऊ सिंड्रोम) या लक्षणांना पडले आहे. ही लक्षणे सर्वसाधारणपणे विदेशी किंवा संकरित गाईंमध्ये गाय व्यायल्यावर दिसतात. कारण ह्या गाई जास्त दूध देणाऱ्या असून, त्यामुळे त्यांना कॅलशियमची न्यूनता होण्याचा संभव जास्त असतो.
रोग होण्याची कारणे खालील प्रमाणे असतात
- पायाच्या स्नायूंना आणि नसांना गाय व्यायल्यावर भार बसून दुखापत होणे.
- गाय वयायल्यानंतर वेतोत्तर कॅलशियम (कल्क) न्यूनता, दुग्धज्वर (milk fever) किंवा “मॅग्नेशियम न्यूनता” इत्यादी गुंतागुंती होणे.
- लांबलेल्या जमीनीवर पतनाच्या अवस्थेमुळे होणाऱ्या स्थानीय रक्तपुरवठा बंद होण्याच्या क्रियेमुळे स्नायूंमधील फ्लाश (पोटॅशियम) चा क्षय होऊन त्यांत तरतरितपणाचा आभाव (मायोटोनिया) निर्माण होणे.
- तीव्र (Acute) गर्भाशय दाह, तीव्र स्तनदाह आणि विषवाधा ह्या सारख्या रोगांची होणारी बाधा.
डाऊनर काऊ सिंड्रोमचे लक्षणे
रोगाची सुरूवात विशेषणे दुग्धजन्य तापासारखी (मिल्क फीव्हर) सारखीच होते. गाय व्यायल्यावर (किंवा काही वेळा विण्याअगोदर ही) गाय स्नायुंमध्ये चमका येणे, स्नायूना कंप भरणे, शरीराचे तापमान कमी होणे हृदयाचे ठोके वाढणे, वगैरे लक्षणे दाखविते आणि त्यापाठोपाठ ती छाती जमिनीवर टेकवून किंवा एका बाजुकडे वळून पडून रहाते. अशी पडून राहिलेली गाय कॅलशियम, मॅग्नेशियम आणि डेक्सट्रोस (ग्युक्रोज) साखरेच्या उपायांना दाद देत नाही. गायीचे खाणे जरी नेहमी प्रमाणेच असले तरीही ती पडूनच रहाते. हल्ली अस दाखवून देण्यात आले आहे की, अशा प्रकारांत (केसमध्ये) तीव्र स्फुरदाची (फॉस्फरसची) कमतरता हे अंतस्थ कारण असून ही रक्तजलांतील (सीरमधील) स्फुरदाची पातळी ही चांगली निदर्शक नसल्यामुळे ते निर्मितीचे कारण म्हणून दुर्लक्षिले जाते. दुसरी गोष्ट अशी की, कॅलाशियम फॉसफिनेट हा क्षार वापरला जात असल्यामुळे ते स्फुरदाचा “उगम” म्हणून उपयोगी पडत नाही. त्यामुळे पूर्वीचे की गाईला स्फुरदाची उपाय योजना केलेली आहे हे ठरते आणि कोणतीही गाय जी व्यायल्यावर उभी राहू शकत नाही. ती म्हणूनच डाऊनर काऊ सिंड्रोम (Downer Cow Syndrome) ची संशयित ठरते.
प्रयोगशालेय निदानासाठी नमुने गोळा करणे :
सोडियम, पोटॅशियम (पालाश) आणि क्लोराईड सारख्या आयनीकृत घटकांचे मोजमापन (एस्टिमेशन) तथा कॅलशियम (कल्क), स्फुद (फॉस्फरस), मॅग्नेशियम यांचे मोजमापन करण्यासाठी सीरम (रक्तजल) हे नमूने गोळा करावेत. रक्तजलांतील अजैविक (इनऑरगॅनिक) स्फुरद हे अचुक (चांगले) निदर्शक नसल्यामुळे संपूर्ण स्फुरदाचे रक्तजलातील मोजमाप करणे ही उत्तम परिक्षा (चाचणी) आहे.
भिन्नता निदर्शक चाचणी :
हाड मोडणे, मज्जातंतू विकृती, मज्जासंस्थेतील एहर्ली कोसिस विकृती. इत्यादींची भिन्नता निदर्शक चाचण्या करून घ्याव्यात.
रोगोपचार आणि व्यवस्थापन :
रोगोपचार शक्य तितक्या लवकर करणे आवश्यक आहे. रोग लक्षणे दिसल्यानंतर ताबडतोब किंवा 24 तासांच्या आत नोंदणीकृत आणि पदवीधर पात्र पशुवैद्यकामार्फत उपाय योजना करावी. जर जनावर व्यायल्यावर फार वेळ पडून राहिले तर मृत्यू होण्याची शक्यता फार असते.
रोगोपचार खालील प्रमाणे करावेत
- कॅलशियम, मॅग्नेशियम आणि डेक्स्ट्रोज (Dextrose) युक्त इंजेक्शन रक्तवाहिनीतून देणे.
- हे इंजेक्शन (कॅलशियम, मॅग्नेशियमचे) देवून झाल्यावर जर गाय ऊठून ऊभी राहिली नाही तर “बफर्ड फॉस्फरस” चे इंजेक्शन रक्त वाहिनींतून द्यावे.
- जनावराला आरामदायी शेज (बेंडींग) आणि संरक्षण पुरवावे. तसेच रूंद तोंडाच्या पात्रांतून खाद्य व पाणी द्यावे. तसेच संतुलित खाद्य सर्वकाळ पुरवावे. उच्च (जादा) प्रथीनयुक्त खाद्य देणे टाळावे.
- स्थनीय रक्त कमतरता (Ischemia) झाल्यामूळे होणारा ऊतीनाश (पेशीनाश) म्हणजेच (Necrosis) टाळण्यासाठी जनावराला एका बाजुकडून दुसऱ्या बाजूला अनेकवेळा वळवावे.
- जनावराला मागील पुठ्ठ्यांच्या भागाकडून (Hind Quarters) उचलून पुढच्या पायांवर उभे करण्याचा प्रयत्न करावा.
- दूध काढून झाल्यावर जनावराची कांस व आंचळे स्वच्छ करून निर्जंतूक करावीत व शक्य असल्यास स्तनदाह होऊ नये म्हणून आंचळांच्या “टीट कॅपस” लावाव्यात.
- बहुतेक सर्व जनावरांमध्ये शरिराचे तापमान सामान्यच असते. परंतु कांही जनावरांत ते कमी होते. अशा जनावराला ऊब पुरवावी.
हेही वाचा: गो स्तनदाह रोग निदान आणि त्यावरील उपचार
लेखक
डॉ. व्हि. एम. भुक्तर |
अनुवादक
डॉ. एस. व्ही. पंडित |