दुग्ध व्यवसायातील यश – विठ्ठल महादेव आगवणे

विठ्ठल आगवणे हे अत्यंत सर्वसामान्य कुंटुबातील व्यक्ती पण स्वतःच्या पायावर आफाट अहोरात्र कष्ट करून व परीस्थीतीशी संघर्ष करून विजय मिळवला. २०१० पासून दूध व्यवसायाची सुरुवात केली. पूर्वी खूप हालाकीची परीस्थिती होती. एक एकर होती त्यातच ते संसाराचा गाडा चालवून त्यात भाजीपाला पिकवत होते पण परीस्थितीत काही सुधारणा झाली नाही. त्याना एक मुलगा व एक छोटी मुलगी आहे त्यात मुलांचं शिक्षण म्हणजे खूप अवघड व्हायचं पण कष्ट करून सर्व काही कुटूबांचं भागायचं नाही. खूप अडचणी यायच्या पण विठ्ठल आगवणे यांनी परीस्थितीशी संघर्ष करत असताना दूध व्यवसाय करण्यासाठी गोविंद डेअरीचे डॉ. शांताराम गायकवाड यांची भेट घेतली व गायकवाड सरांनी गोठा कसा असावा व कमी खर्चात गोठयात  अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून उत्पन्न कसे मिळेल ह्यासाठी खुप मदत केली व मार्गदर्शन केले.

विठ्ठल आगवणे यानी २०१७ ला मुक्तसंचार गोठा गोविंद डेअरीच्या मार्गदर्शनातून उभारला. शेती आणि दुग्ध व्यवसायाची सांगड घालून एक आदर्श दूध उत्पादक म्हणून गिरवी पंचक्रोशीत एक प्रगतशील दुग्ध उत्पादक म्हणून ओळख आहे.

सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या गोठ्यात १५ मोठ्या गायी व १० कालवडी आहेत. विठ्ठल आगवणे यांचं वासराचा विकास (Calf Development) उत्तम काम चालू आहे. गोठ्यात ५० कोंबड्या सोडल्या आहेत, त्या कोंबड्यांचा उपयोग गोठ्यामध्ये गोचीड कमी होण्यास मदत झाली आणि त्यांचा घरखर्च केवळ कोंबड्यापासून मिळणाऱ्या उत्पादनावर भागतो. कोंबड्यांचा तिहेरी उपयोग म्हणजे मुक्तसंचार गोठ्यामध्ये शेण विस्कटण्याचे काम करतात.


विठ्ठल महादेव आगवणे
रा. गिरवी, ता. फलटण, जि. सातारा