वासरांच संगोपन नेमकं करायचं तरी कस??

२०२१ या वर्षात आपल्या सर्वांना बऱ्यापैकी दिलासा देणाया गोष्टी घडल्या आहेत वा घडत आहेत. जसे की कोरोना विषाणूची लस आली सर्वांना लसीकरण सुरु झाले आणि शेतकरी बांधवांच्या हितार्थ म्हणजे दुधाच्या भावामध्ये होणारी वाढ नाही म्हणले तरी त्यापैकी आपल्या सर्वांची आर्थिक गाडी आता रुळावर येत आहे. दुग्धव्यवसायात जर खरोखर भरघोस नफा मिळवायचा असेल तर आपल्या गोठयातील गायींनी भरपूर दूध दयायला हवे, आपल्या गोठयातील गायी सदा निरोगी असाव्यात. जर या दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात व्हायच्या असतील तर आपल्याला गोठयातील गायींकडे विशेष  लक्ष  द्यावे लागेल पण सरास शेतकरी बांधव दुधाचा भाव वाढल्यावर जनावरांना  बाजारातुन  गायी विकत घेतात. खरं तरं जनावरांच्या बाजारात विक्रीला येणाऱ्या सगळ्याच गायी निरोगी असतीलच अस नाही म्हणून शेतकरी बांधवांनी आणि पशुपालकांनी आपल्या गोठ्यातच भरपूर दूध देणाऱ्या गायी तयार केल्या तर?

ही गोष्ट निश्चितच शक्य आहे आणि त्यासाठी आपल्याला गोठयातील वासरांच संगोपन करणे गरजेचे आहे. चला तर मग पाहू या वासरांच संगोपन नेमकं करायचं तरी कस??

१) वासरांच्या रोगप्रतिकारकशक्तीसाठी:

  • कोलोस्ट्रम (चीक) हे समीकरण लक्षात घेऊया.
  • जन्मानंतर वजनाच्या एक दशांस एवढे प्रति दिवस
  • कोलोस्ट्रम मध्ये भरपूर प्रमाणात ईम्युनोग्लोब्युलिस, व्हिटॅमिन ए व प्रोटीन्स असतात.

२) वयाच्या दहाव्या दिवशी प्रथम जंतनासकाचा डोस:

मार्केट मध्ये फेमस असलेला – Helmiguard Supreme (४ किलो वजनासाठी – १ मिली) त्यानंतर वयाच्या ३० व्या दिवशी व नंतर १ महिन्याला जंतनिर्मुलन करावे.

३) वासरांना Adlibitum (हवे तेवढे) दुध शक्यतो गायीच्या कासेलाच पिऊ दया.  जेणेकरून गायी पान्हा पण चांगला सोडतील.

४) वासरांच्या सिंगकाळ्या जर वयाच्या १० ते १५ दिवसात जाळल्या तर भविष्यात आपल्याला मुक्तगोठ्यासाठी लागणारी गाय बिना शिंगाची तयार होईल.

५) वासरांच्या वयाचा २९ दिवसानंतर हळू हळू पाणि देण्यास सुरवात करावी.

६) मिल्क रिप्लेसर :

  • दुधाचेच पोषण मूल्य
  • दूध विक्रीकरिता उपलब्ध
  • दुधाच्या एक तृतीयांश किंमतीत वासरांचे संपूर्ण पोषण
  • तांदळाचा कोंडा, भरडलेले मका, मक्यातील ग्लुटन, शेंगदाणा ढेप, सोयाबीन ढेप, स्कीम मिल्क पावडर, बायपास फॅट, मळी, मिनरल मिक्सचर, मीठ, व्हिटॅमिन्स, अँटिबायोटिक व प्रिझर्वेटिव्ह
  • १:८ प्रमाणात पाण्यात विरघळून १ लिटर दुधासोबत पाजावे.
  • हळू हळू दूध कमी करत न्यावे व मिल्क रिप्लेसर वाढवू न्यावे.
  • वासरू १ महिन्याचे होईपर्यंत २ लिटर पर्यंत वाढवा न्यावे

७) काफ सटार्टर:

  • वाढल्या वयासोबत वासरांची अन्नद्रव्यांची गरज वाढते.
  • वासरे चारा खाऊ लागतात पण त्यातील क्रुड फायबर पचवू शकत नाहीत.
  • या वयातही दूध पाजणे सुरू ठेवल्या रुमेनोरेटीक्युलार बंद होऊन दूध सरळ अबोमाझम मध्ये जाते.
  • त्यामुळे रूमेन मध्ये जिवाणूंची वाढ थांबते.
  • यावेळी वासरांना ठोस आहाराची आवश्यकता असते.
  • म्हणून वासरांना ६ ते ७ महिन्याचे होईपर्यंत भरपूर उर्जा व प्रधिनेयुतन काफ स्टार्टर देणे आवश्यक आहे.

८) वासरांना अधून मधून लिव्हर टॉनिक ची मात्रा दयावी.

अशाप्रकारे आपण वासरांच संगोपन करून गोठ्यातच गाई तयार करू शकतो. तेही जातीवंत…

हो की नाही ! ! !

हेही वाचा: भारतीय वंशांच्या दूधाळ गायी व म्हशींच्या प्रमुख जाती


डॉ. ओंकार थोरात

एम. व्ही. एस. सी., पशुपोषणशास्त्र.
ई-मेल आयडी: onkarthorat1602@gmail.com