बोवाइन व्हायरल डायरिया (बीव्हीडी) चे निदान, उपचार आणि नियंत्रण
बोवाइन व्हायरल डायरिया (गुरांमधील विषाणुजण्य हागवण) म्युकोजल डिसीज हा रोग भारतात अंजठा रोग या नावाने ओळखला जातो. हा गाई आणि म्हशीचा अंत्यत संसर्गजन्य रोग असुन त्याचा प्रादुर्भाव जगभर दिसुन येतो.
रोगाचे कारण :-
बोवाइन व्हायरल डायरिया व्हायरस हया नावाचा विषाणु हे हया रोगाचे कारण असुन तो विषाणु रिंडरपेस्ट (बुळकांडी) विषाणुसदृश आहे.
रोगाचा जनावरांतील प्रादुर्भावः-
गाई आणि इतर रवंथ करणारी जनावरे आणि वाढत्या वयाची जनावरे जास्त करुन बळी पडतात.
रोगाचा प्रसारः-
हा रोग जनावरांमधील प्रत्यक्ष संसर्गामुळे आणि त्याच प्रमाणे अप्रत्यक्ष पणे सांसर्गित गोठयात काम करणाऱ्या माणसांच्या संसर्गामुळे प्रसारित होतो. त्याच प्रमाणे रोगग्रस्त जनावरांच्या विष्ठेने, मुत्राने वा नाकातील स्त्राव यांनी प्रदुषित झालेले खादय खाल्यामुळे हया रोगाचा प्रसार होतो.
रोग विषाणुचा उद्भवनआवधि (इनक्युबेशन पिरियड):
हया रोगाच्या विषाणुचा रोग निर्मितीस लागणारा उद्भवन अवधी एक ते दोन आठवडे इतका आहे.
रोगाची दृश्य लक्षणेः-
- जनावरांची रोग प्रतिकार क्षमता रोगाच्या संसर्गाशी आलेला प्रत्यक्ष संर्पक आणि रोगाविषाणुची संसर्ग क्षमता यावर प्रत्यक्ष लक्षणे किती दिसतात हे अवलंबून आहे.
- तीव्र रोग लक्षणांत काहि दिवसांचा मध्यम स्वरुपाचा ताप येणे, ढाळ लागणारी हागवण आणि त्यामुळे होणारा शारीरिक शुष्क पणा व शोथ तोंडाताल अंतरत्वचेला दाह होवुन उथळ छाले पडणे आणि तोंड आल्याप्रमाणे लाल होणे. शरीराच्या कातडीवर व्रण निर्मीती होणे, शरीर क्षीण होणे, भुक नष्ठ होणे आणि त्यानंतर ७ ते १0 दिवसात मृत्यु येणे अशी लक्षणे दिसतात.
- जुनाट रोगाच्या लक्षणात भुक मरणे, कमी (तुरळक) आणि मऊ विष्ठा, मधुन मधुन पोट फुगणे, आणि शरिरावरील बरे नहोणारे व्रण (हे व्रण विषेशताः खुरांच्या बेचक्यात होतात)
- वासरामध्ये जन्मतःच त्रुटी दिसतात आणि मेंदुची खुंटलेली वाढ हि दिसुन येते, वासरांचा मृत्युहि होतो. (विशेतः अतिशय आजारी झालेल्या वासरांमध्ये मृत्यु संभावतो).
विभेद निदान (डिफरेनशियल डायग्नोसिस)-
लाळ खरखुत रोग बुळकांडी आणि व्हेसिक्युलर स्टोमॅटायटिस या रोगापासुन करणे आवश्यक.
गुंतांगुंती आणि पर्यवसान: वासरातील जन्मजात त्रुटी, डोळ्यांमधील त्रुटी, स्नायू आणि अस्तिसांगाड्याच्या त्रुटी तथा शरीरावरील केस गळून पडणे.
प्रयोग शालेय अन्वेषणासाठी नमुने: जोड-रक्तजल (paired sira) नमुने
रोग निदान संबधित परिक्षणेः- ए.जी.पी .टेस्ट, कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट आणि पी.सी.आर. टेस्ट.
रोगोपचारः-
कोणतीहि विशिष्ठ उपचार प्रणाली उपलब्ध नाही. फक्त आधार उपचार करावेत. उपचार महागपण पडतात. परंतु एकदा रोग निदान झाले की ते जनावर कळपातुन काढुन टाकावे.
पुर्वी रोग अन्वेषण केंद्र, पुणे डॉ. पंडित व म्युकोजल युनिट आर ए कॉलनी गोरेगाव (डॉ. कुकडे) यांनी या रोगावर उपचारासाठी अँटी सिरम बनवले होते. ते रोगप्रचार म्हणून अत्यंत उपयोगी पडले.
लसीची उपल्बधताः-
काही देशांमध्ये बि.व्ही.डी. लस उपलब्ध आहे पण ती अत्यंत माहागाची आहे. लस मॉडिफाइड जिवंत विषाणु युक्त अथवा किल्ड व्हायरस युक्त मिळु शकते. रोग भारतात अधिकृत पणे नोंदवला गेलेला नाही व म्हणुन लस उपल्बध नाही. (डॉ. एस. व्ही. पंडितांचा ताजा कलमः भारतात 1960 च्या दशकांत हया रोगावर आय.सी.एम.आर. ची शोध स्कीम रोग अन्वेषण केंद्र, पुणे महाराष्ट्र राज्य येथे अस्तित्वात होती) त्यांत हा रोग सापडला नाही. परंतु त्या आधि डॉ. एस. एन. सप्रे, डॉ. पंडित एस. व्ही. आणि डॉ. आपटे व्ही. एच. यानी हया रोगावर अंजठा रोग या नावाने काम केले आहे. आणि त्यांनी पाठविलेल्या मटेरियलच्या आधारे अॅनिमल डिसिज रिसर्च लॅबोरेटरी, वेब्रिज इग्लंड यानी पेअर्ड सिरम सॅमप्लसच्या डबल सीरम जेल डिफ्युजण टेस्टच्या आधारे भारतात म्युकोजल डिसीज आहे. हे सिद्ध केले होते. ह्या रोगावर डॉ. चौधरी पी.जी आणि डॉ. एस. जी कुलकर्णी यानी हि टेस्ट ह्या आधी भारतात डी.आय.एस. पुणे येथे संपन्न केली होती. स्वाईन फिवर विषाणु त्यात बि.व्हि.डी विषाणुच्या अँटीजेन सारखा म्हणुन वापरला होतो.
बि.व्ही.डी. रोगाचे प्रतिबंधन, अवरोध आणि व्यवस्थापन
- फार्मवरकडक बायोसेक्युरिटी उपाय अवलंबावेत.
- कळपातुन सर्व ए.जी.पी. टेस्टला पॉझिटिव्ह आलेली जनावरे काढुन टाकावित.
- फार्मसाठी विकत घेतलेली सर्व नवीन जनावरे दोन आठवडे विलगीकरणात ( क्वारंटाईन ) ठेवावीत.
- जनावरांची रोगप्रतिकार क्षमता आबाधित राहण्यासाठी त्यांना संतुलित आहार नियमित दयावा.
- शक्य असल्यास सर्व जनावराना बी.व्ही.डी. लस दयावी.
लेखक
डॉ. व्हि. एम. भुक्तर |
अनुवादक
डॉ. एस. व्ही. पंडित |