गायींमधील फऱ्या रोग निदान आणि उपचार

फऱ्या रोग उर्फ ब्लॅक कॉर्टर हा गाई-गुरांचा एक तीव्र स्वरुपात होणारा संसर्गजन्य रोग असून तो मेंढयामध्ये आणि क्वचित म्हशी मध्ये दिसून येतो त्यात शरिरातील स्नायूंमध्ये वायु मिश्रीत सूज निर्माण होउन स्नायु पेशीचा नाश आणि विषार झाल्यामुळे मृत्युहि ओढावु शकतो.

रोग निर्मीतीची कारणे

विशेषतः जवान पिळदार स्नायु युक्त निरोगी जनावरे हया रोगाला जास्त करुन बळी पडतात. शेळया आणि इतर जनावरांमध्ये हा रोग क्वचित दिसतो.

रोगाचा प्रसार

हा एक काळया मातीतुन प्रसार होणाऱ्या जंतुमळे होणारा जंतुजन्य रोग आहे. जनावरांच्या शरिरा वरील जखमांद्वारे व इंनजेक्शनच्या सुई मार्फत अथवा तोडावाटे (विशेषताः जेव्हा जनावरांच्या तोंडात जखमा असतात तेव्हा) हया रोग जंतु संसर्ग होतो. खर तर हे जंतु जमिनीत खोलवर असतात जेव्हा शेतजमिनीची नांगरणी होते त्यानंतर हया रोगसाथीचा प्रादुर्भाव दिसुन येतो.

रोगाची प्रत्यक्ष लक्षणे

प्रथम तीव्र तापमान वाढ लगंडेपणा आणि त्यामुळे येणारी तीव्र मरगळ ही त्या रोगाची लक्षणे दिसतात. जनावरे चरणे/खाणे थांबवतात. त्याच प्रमाणे रवंथ प्रकिया ही थांबवतात. करकर आवाज करणारी जनावरांच्या मागील पायाच्या पुठयाच्या भागांची आणि खांद्याच्या भागाची सुज व त्यामुळे तो भाग अत्यंत गरम लागणे ही ल़क्षणे मुख्यताः दिसतात. तर जनावरांचा ताबडतोब इलाज केला नाही तर १२ ते ३६ तासातच मृत्यु होऊ शकतो.

शवविच्छेदनातील निरिक्षणे:

जनावरांच्या कातडी वरील सुज काळसर दिसते व त्यामधुन काळपट रंगाचा अत्यंत वाईट दर्पयुक्त वास असलेला द्राव बाहेर पडतो. करकर असा आवाज करणाऱ्या ह्या सुजलेल्या भागाला जर चाकूने छेद दिला तर त्यातुन काळपट तांबडे, बुडबुडे युक्त, खवट वास असलेला द्रव बाहेर पडतो. दुषित स्नायु जर हाताने चाचपडले तर ते स्पंज सारखा स्पर्श निर्देशित करतात. त्यावरुन जनावराला मृतपेशी युक्त (नेक्रोटायझींग) रक्त स्त्राव युक्त (हेमरेजिक) स्नायुदाह (मायोसायटीस) झाला आहे असे निर्देशित होते. (विषारामुळे- टॉक्सिनमुळे) सर्वसाधारणपणे जनावरांची प्लिहा मोठी होते आणि त्यातुन रक्तस्त्राव होतो.

फऱ्यारोगाचे निदान

  1. लक्षण वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे रोगनिदान सोपे आहे.
  2. फरा व पुठयाच्या स्त्रावाची काचेवर स्मिअर घेतली तर ते रंगवुन (स्टेन करुन) सुक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिले तर चिरुटा (सिगार) च्या आकाराचे जंतु दिसतात.

प्रयोगशाळेत निदानासाठी लागणाऱ्या गोष्टी:

  1. चरचर आवाज करणाऱ्या स्नायुतील काळसर स्त्राव एका निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरुन बर्फावरुन प्रयोग शाळेत नेऊन कलचर आणि जंतुचे प्रकार तपासणे.
  2. त्या द्रवाच्या काचा रंगवुन सुक्ष्मदर्शकाखाली तपासणे.
  3. खराब झालेल्या स्नायु चा तुकडा बर्फावरुन प्रयोग शाळेला पाठवणे.

प्रयोगशालेय निदान:-

  1. द्रवाच्या नमुन्याच्या काचेवरील स्मिअर ची तपासणी
  2. गिनीपिग हया प्रयोगिक प्राण्यामधील परिक्षण.

फऱ्या रोगाचा उपचार:-

  1. दुषित भागाचे ड्रेसिंग करणे (पेनिसिलिन इनजेंक्शन) चा स्थानिक उपयोग करणे.
  2. मोठया डोसच्या स्वरुपात पेनिसिलिन आणि ऑक्सिटेट्रासायक्लीन प्रतिजैविकाचा उपयोग करणे ही सध्या मानलेली योग्य ट्रीटमेंट आहे. तिसऱ्या पिढीतील सेफॅलोस्पोरीन हे प्रतिजैविकही टोचले तर उत्तम.
  3. उशिराने चालु केलेल्या रक्त प्रवाहात दुषण प्रासारित झालेल्या स्थितीत अँटिबायोटिक हे उपयोगी पडत नाही.
  4. प्रत्यक्ष लक्षणे दिसु लागल्या पासुन 12 तासांच्या आत चालु केलेला प्रतिजैविकाचा उपचार उपयोगी पडतो.

रोगाचे रोप्रतिबंधन आणि रोगाला रोखणेः-

  1. ज्या भागात हा रोग दर वर्षी येतो त्या भागातील सहा महिन्यांच्या पुढच्या वयाच्या सर्व जनावरांना पावसाळयापुर्वी लसीकरण करावे.
  2. लस उत्पादकांच्या सुचना बरहुकूमच लसीकरण करावे.
  3. पावसाळयापूर्वी जमिनीच्सा प्रष्ठभागावरील वाळलेल्या पिकांच्या बुडूखांचा आणि काडयांचा वापर करून जाळ करून रोग जंतुच्या स्पोअर्सचा नाश करावा.
  4. दुषित जनावराला मृत्यूनंतर जमिनींत गाडतांना त्यावर चुनकळी किंवा इतर जंतुनाशकांची फवारणी करावी.

लेखक

डॉव्हिएमभुक्तर
माजी अध्यक्ष डीसीप्लिनरी कमिटी, भारतीय पशु चिकित्सा परिषद, नवी दिल्ली
ईमेल आयडी: vmbhuktar55@gmail.com

अनुवादक

डॉ. एस. व्ही. पंडित
एम.व्ही.एस.सी. (बॅक्टेरिऑलॉजी, पॅथॉलॉजी, पॅरासायटॉलॉजी), पि.जी. (डेन्मार्क)
जेष्‍ठ शास्त्रज्ञ, निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे