जनावरांमधील ताण आणि गाई-म्हशींना बांधणे

कोणतेही नैसर्गिक भौतिक आणि वातावरणातील परिस्थितीतील बदल की जे गायी-म्हशिंमधील शारीरिक कार्य आणि उत्पादन कार्य तथा प्रजोत्पादक कार्य यांच्यावर प्रतिकूल परिणाम करतात त्यांना ताण असे म्हणता येईल. जर जनावरांना न बांधता त्यांना मुक्त संचार त्यांच्या गोठ्यात करून दिला तर कोणतीही जनावरे त्यांच्या नैसर्गिक निवाऱ्यात आराम अनुभवू शकतात. ह्या आरामाच्या परिस्थितीत केलेल्या कोणत्याही बदलांमुळे त्यांच्यावर सौम्य वा कडक स्वरूपाचा ताण निर्माण होतो.

चारण्याचे वेळापत्रक आणि व्यवस्थापनाची पद्धत यात आकस्मित बदल या सारख्या छोट्याशा बदलांनाही जास्त उच्च उत्पादक जनावरे फार संवेदनशील असतात. अकस्मात दूध काढण्याची वेळ, दूध काढणारा माणूस आणि दूध काढण्याच्या मशिनच्या कपांमधील बदल यामुळे पडणारा ताण यामुळे जादा दूध देणाऱ्या गाई-म्हशींचे दूध कमी होते. एक विशिष्ट ठराविक जागी जादा उत्पादक जनावरांना खिळवून ठेवल्यामुळे आणि कंठ साखळीने बांधून ठेवल्यामुळे जरी त्यांना शिफारस केलेली भुईजागा दिली तरीही उच्च प्रतीच्या दुधाळ जनावरांना उत्तम प्रतीची “खाद्य गव्हाण” पुरविणेची गरज कमी होत नाही (म्हणजे तिची आवश्यकता वाटतेच).

Animal Stress and Tieing of Cattle and Buffalo

ताण निर्मिती झालेल्या ठराविक बंदिस्त जागेत बांधलेल्या जनावरांवर होणारे प्रतिकूल परिणाम खालील प्रमाणे होतात:

  • रक्तजलातील (Serum) कॉर्टिसॉल पातळीत वाढ होणे. आमच्या मुंबई वेटरनरी कॉलेजमधील प्रयोगांत असे आढळून आले की बंदिस्त म्हशींची रक्तजल कॉर्टिसॉल पातळी ०.५२ ते ०.५४ मायक्रोग्रम/डेसीलिटर आणि मुक्त गोठ्यातील म्हशीची तीच पातळी ०.४१ ते ०.४५ मायक्रोग्राम इतकीच आढळली.
  • दूध उत्पादन १० ते १५ टक्के कमी झालेले आढळले.
  • बांधलेल्या जनावरांचा पुठ्याचा भाग नेहमीच घाण झालेला दिसला आणि त्यांना कांसेचे रोग वाढत्या प्रमाणात होतात असे दिसून आले.
  • बांधलेल्या जनावरांच्या दुधाची रोगजंतूची प्रत नेहमीच हिन दर्जाची दिसली कारण त्यांचे दूध नेहमीच अस्वच्छ जागेत काढले गेले. स्टॅंडर्ड प्लेट काउंट (SPC) आणि इ- कोलाय फॉर्म काउंट, यीस्ट आणि बुरशीचा काउंट इत्यादी दुधातील सूक्ष्मजिवाणूंचे काउन्टस अस्वच्छ दुधात अस्वच्छ परिस्थितीत नेहमीच जास्त येतात.
  • हालचाल कमी झाल्यामुळे आणि व्यायाम होत नसल्यामुळे अशा बंदिस्त पद्धतीत खाद्याची कार्यक्षमता कमीच आढळून येते.
  • कळपाला भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या दृष्टीने ही जनावरे घाणेरडी दिसतात आणि त्यांच्या मांड्यावर गडद रंगाचे डाग तसेच त्यांच्या पुठ्ठ्याच्या भागावरही तसेच डाग दिसतात व त्यामुळे त्यांची बाजारातील किंमतही कमी होते.

महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांसाठी ‘अल्प खर्चात गाय निवारा’ स्पर्धा

कृपया स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि मित्रांनाही त्यांसाठी उत्तेजित करा.

Low-Cost Cow-Comfort Housing - Indiancattle.com

लेखक

डॉ. आय. एम. बेग
माजी विभागप्रमुख
एलपीएम मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय

अनुवादक

डॉ. एस. व्ही. पंडित
एम.व्ही.एस.सी. (बॅक्टेरिऑलॉजी, पॅथॉलॉजी, पॅरासायटॉलॉजी), पि.जी. (डेन्मार्क)
जेष्‍ठ शास्त्रज्ञ, निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे