पशुपालकांनो सावधान !! कसे कराल? आपले व जनावरांचे विजांपासून संरक्षण…

जून किंवा जुलै महिना म्हटले की सर्वत्र पावसाची धूमधाम सुरू असते. सगळीकडेच काही प्रमाणात पाऊस झालेला असतो किंवा पावसाची सुरुवात होत असते. पावसाळ्यात नेहमीच ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट हा असतोच याच काळात शेतकऱ्यांची शेतामध्ये पेरणीसाठी लगबग सुरू असते. पाऊस तसेच विजांचा अंदाज सांगता येत नाही त्यामुळे आपली तसेच जनावरांची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. कारण शेतात घर किंव्हा आडोसा नसल्याने विजांपासून बचाव कसा करावा याबाबदल फार माहिती नसते त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता य्रेत नाही आजही ग्रामीण भागात वीजांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, अंगावर वीज पडू नये यासाठी अनेकांना खबरदारीचा उपाय माहित नसल्याने दरवर्षी वीज पडून अनेकजण आपले जीव गमावतात, या अचानक निर्माण होणाऱ्या संकटांमुळे संपत्तीचे आतोनात नुकसान होते. त्याचा फटका शेतकरी तसेच पशुपालकांना बसू नये त्यांचे तसेच संपत्तीचे नुकसान होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेणे हि महत्वाची बाब असते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगावॅटची असते असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

जाणून घ्याकाय होतात? विजांचे घातक परिणाम

  • वीज अंगावर पडल्यावर काही लोक मृत्युमुखी पडतात भाजतात, तर काही जखमी होतात. इ.
  • झाडांवर वीज पडल्यास मोठ-मोठे वृक्ष कोलमडतात तर काही जाळून खाक होतात.
  • जमिनीवर विज पडल्यास खूप मोठा खड्डा पडतो.

कोणत्या गोष्टी टाळाव्यात

१) गुरांच्या उघड्या गोठ्यात तसेच पडक्या घरात बसू नये.
२) या काळात धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.
३) लोखंडी वस्तू, कृषी अवजारे, यंत्रे इत्यादी पासून दूर राहावे.
४) मोबाइल बंद करून घरात किंव्हा सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
५) जनावरे तलावात, नदीत पोहत असतील तर त्यांना लगेच बाहेर काढावीत.
६) मुक्त गोठ्यातील जनावरे शक्यतो अश्या परिस्थितीत बांधूनच ठेवावे.
७) विजेचे खांब, टेलिफोनचे व टेलिव्हिजनच्या टॉवर जवळ उभे राहू नये.
८) नळाचे कुठलेही काम करू नये तसेच दारे व खिडक्यांपासून दूर राहावे.
९) विजेवर चालणारी तसेच प्लग जोडलेली सर्व विदुत उपकरणे बंद ठेवावीत.
१०) शेताला पाणी भरत असाल तेंव्हा मोटार पंप त्वरित बंद करून सुरक्षित ठिकाणी पोहचावे.
११) ट्रक, ट्रॅक्टर, दोन चाकी वाहने, सायकल यावर असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहचावे.
१२) वड, पिंपळासारखी मोठ-मोठी वृक्ष, दलदलीची ठिकाणे तथा पाण्याची ठिकाणे यांपासून दूरच राहावे.
१३) ओल्या शेतात रोप लावणीचे काम चालू असेल तर ते बंद करावे आणि तात्काळ कोरड्या जागी   पोहचावे.
१४) शेत, बागबगीचा आणि घराभोवती तारेचे कुंपण घालू नये कारण या गोष्टी विजेला ते सहज आकर्षित करतात.
१५) आकाशाखाली असाल तेव्हा खोलगट ठिकाणी पोहचा उंच जागेवर तसेच झाडावर चढू नये झाडांपासून दुप्पट अंतर दूर राहावे.
१६) शेतात सुरक्षित आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, गोणपाट, प्लास्टिक अश्या वस्तू किंव्हा वाळलेला पालापाचोळा ठेवावा.
१७) एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नये तसेच दोन व्यक्तींमधील साधारण अंतर १५-२० फूट असेल याची काळजी घ्यावी.
१८) वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनातच थांबावे व वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास हातात कोणतेही धातूची वस्तू बाळगू नये.

टीप- पशुपालन व दुग्धव्यवसाय संबंधित आधुनिक माहिती व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन धेनु ॲप डाऊनलोड करा आणि आपला व्यवसाय दुपट्टीने वाढवा.

हेही वाचायला आवडेल तुम्हाला: पशुपालकांनो जरा आपल्याही चुका जाणून घ्या…


नितीन रा. पिसाळ

प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा. लि. भोसरी, पुणे.
मो. नं – 9766678285.
ईमेल-nitinpisal94@gmail.com