गाईंचे आराम क्षेत्र म्हणजे काय?

गाईंच्या आराम क्षेत्राची सरळ साधी व्याख्या अशी करता येईल की गाईंच्या गोठ्याच्या वा निवासस्थानाच्या परिसरातील अशी भौतिक परिस्थिती की जेथे त्या गायी उत्पादक आणि पुनरुत्पादक अशी दोन्ही कार्य पार पाडतात.

Cow Comfort

गाई आणि म्हशीच्या गोठ्यामध्ये आरामदायी सुविधा पुरविणे खालील कारणासाठी अत्यंत आवश्यक आहे:

  1. त्या त्या जातीच्या प्रकाराप्रमाणे जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळणे आणि दूध उत्पादक जनावरापासून आरोग्यपूर्ण स्वच्छ दूध मिळणे.
  2. रासायनिक रचनेच्या संदर्भात उच्च प्रतीचे आणि आरोग्यपूर्ण गुणांनी युक्त म्हणजेच कमी जंतू संख्या (count) असलेले दूध मिळणे.
  3. जास्तीत जास्त प्रजोत्पादक क्षमता असणे की जी दोन वासराच्या जन्म कालांमध्ये कमीत कमी अंतर, जास्तीत जास्त मोकळा वेळ, निरोगी प्रजा निपजणे, जास्तीत जास्त प्रजोत्पादक आणि दूध उत्पादक कामगिरी यावर अजमावली जाते.
  4. रोगविरहित आणि स्वच्छ असा जनावरांचा कळप असणे.

वर उल्लेखलेले गुणधर्म साध्य करण्यासाठी जनावरांना जास्तीत जास्त आराम त्यांच्या विश्रांतीच्या जागी दूध काढण्याच्या जागी, चारणाच्या आणि पाणी पाजण्याच्या जागेवर बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत संबंध वर्षभर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांसाठी ‘अल्प खर्चात गाय निवारा’ स्पर्धा

कृपया स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि मित्रांनाही त्यांसाठी उत्तेजित करा.

Low-Cost Cow-Comfort Housing - Indiancattle.com

लेखक

डॉ. आय. एम. बेग
माजी विभागप्रमुख
एलपीएम मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय

अनुवादक

डॉ. एस. व्ही. पंडित
एम.व्ही.एस.सी. (बॅक्टेरिऑलॉजी, पॅथॉलॉजी, पॅरासायटॉलॉजी), पि.जी. (डेन्मार्क)
जेष्‍ठ शास्त्रज्ञ, निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे