जनावरांच्या पैदासीच्या रेकॉर्डस किंवा नोंदी व त्याचे महत्व
जनावरांचे संगोपन करत असतांनी त्यांच्या पैदासीच्या नोंदीला फार महत्व असते. पैदासीच्या नोंदी (Animal breeding records) ठेवण्याकरीता आवश्यक मुद्दे पुढीलप्रमाणे,
- जातीवंत जनावराच्या आनुवंशिकतेबद्दल परिपूर्ण माहिती मिळते.
- जनावरांचे आनुवंशिक दुग्धोत्पादन क्षमता समजते तसेच आनुवंशिक रोगाची माहिती योग्य रित्या आपणास समजते.
- रेकॉर्डस, नोंदणीमुळे पैदासीपासून मृत्यूपर्यंत जनावरांचा संपूर्ण इतिहास आपणास समजतो.
- रेकॉर्ड, संकरित पैदास केलेल्या सिद्ध वळू व गाय यांची वैशिष्टपूर्ण माहिती उपलब्ध होते.
- किफायतशीर दुग्धोत्पादनासाठी प्रत्येक जनावराच्या नोंदणीमुळे पैदास करण्यास सुलभ होते.
- वंशावळ, कार्यक्षमता व दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता समजते.
- दुधाची, जनावरांची खरेदी व निवड करण्यासाठी बाह्य गुणधर्मावरून निवड करणे शक्य नसते, तसेच वंशावळीच्या माहितीच्या आधारे निवड करता येते.
- रेकॉर्डवरून सिद्ध वळूची गुणवत्ता समजण्यास हि मदत मिळते.
- वंशावळ नोंदणीमुळे योग्य पैदासीसाठी जनावरांची लहानपणीच निवड करता येते.
पुढीलप्रमाणे जनावरांच्या पैदासीचे रेकॉर्डस व नोंदणी ठेवल्या जातात
नोंदणी क्रमांक – १
जनावरांचा इतिहास:
नोंदणी क्रमांक – २
विकत घेतलेल्या जनावरांची नोंदवही:
नोंदणी क्रमांक – ३
आरोग्यविषयक नोंदणी:
नोंदणी क्रमांक – ४
वासराची नोंदवही:
नोंदणी क्रमांक – ५
खाद्याविषयी नोंदणी:
नोंदणी क्रमांक – ६
दुग्धोत्पादन नोंदवही:
जनावरांच्या पैदासीच्या रेकॉर्डस किंवा नोंद चे वरील सर्व फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
Read:जनावरांतील लंगडणे – कारणे व प्रथमोपचार
श्री. अजय गवळी
लेखक पशुसंवर्धन तज्ञ असून बर्ग अँड स्मिथ इंडिया प्रा. ली. पुणे
येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत
मोबाइल नंबर: ८००७४४१७०२
मोबाइल नंबर: ८००७४४१७०२