गोस्तन-दाह : रोग निदान आणि त्यावरील उपचार – पुरवणी (परिशिष्ट)

प्रस्तावना: १९६१-७० ह्या दशकात “गोस्तन-दाह” ह्या गाईच्या रोगाच्या उपचारासाठी सल्फा औषधे, नेफ्टीन (नायट्रोफ्युरॉन) आणि पेनिसिलीन-स्ट्रेप्टोमायसिन युक्त मलमाच्या ट्यूब गाईच्या आंचळांत सोडण्यासाठी वापरत असत. परंतु १९७१-८० ह्या काळात आणि त्यानंतर २००० सालापर्यंत सुद्धा ह्या औषधांची जागा हळू हळू कोक्झकिलीन, टेट्रासायक्लीन, ऑक्सिटेट्रासायक्लीन ह्या तीन प्रतिजैविकांनी घेतली. परंतु या प्रतिजैविकांची परिणामकारकताही कमी होत असल्याचे दिसून येऊ लागले. स्तन-दाह निर्माण करणाऱ्या जिवाणू मध्ये “प्रतिजैविकांविरोधी प्रतिकारशक्ती” निर्माण होणे हे कारण या प्रश्नाच्या मागे आहे असे दिसून आले. प्रतिजैविकांचा अत्त्याधिक (फाजील) उपयोग या कारणामुळे ही समस्या प्रगतीपथावरील देशांमध्येच नव्हे तर प्रगत देशांतही निर्माण झाली आहे असे लक्षात येते.

त्यामुळे हे नैसर्गिक आहे की संशोधनाचा केंद्रबिंदू आता प्रतिजैविकांच्या ऐवजी त्यांच्या वैकल्पिक उत्पादनाच्या विस्थापनावर (बदलावावर) स्थिर करणे आवश्यक आहे. प्रतिजैविकांना विकल्प “म्हणून” अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचे विकसन आता पुढे येत आहे. प्रतिजैविकां विरोधी प्रतिकाराच्या समस्येवर उपाय म्हणून स्तन-दाह निवारक मलमाच्या ट्यूब मध्ये प्रतिजैविकां ऐवजीविकल्प म्हणून हरित संश्लेषित (ग्रीन सिंथेसाइझड) चांदी/जस्त (सिल्वर/झिंक) अतिसूक्ष्मकणाचा(नॅनो-पार्टिकल्स) वापर आता शक्य झाला आहे. त्याचप्रमाणे चांदी/जस्ताचे सुक्षम कण (नॅनो-पार्टिकल्स) युक्त आणि “हायड्रोजन पेरॉक्साइड” विशोषित (अडझेक्टेड) जंतुनाशकांचा गाईचे दूध काढण्यात गोड मधील जमीन व भिंती निर्जंतुकीकरणसाठी वापर करणेहि उपयुक्त ठरू शकेल. त्यामुळे पूर्वीच्या विषारीजंतुनाशकांपेक्षा ही नवी जंतुनाशके कमी विषारी व सुरक्षित आहेत हे लक्षात आले आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या फेनॉल /quarternary  अमोनिया कंपाऊंड/ पोविडोन आयोडीन युक्त “टिट डीप” सॅनिटायझरच्या एवजी नवीन सिल्वर नॅनो पार्टिकल यांचे वर्णन आपण “सूक्ष्म संपुटित (मायक्रो एनकॅप्सुलटेड) वनौषधी “युक्त” टिट डीप सॅनिटायझर म्हणून करू शकतो. असे “टिट डीप” पूर्वीच्या “टिट डीप” पेक्षा जास्त काळ रोगजंतूनाश करू शकतात. हे रोज दूध काढण्या अगोदर व काढल्या नंतर वापरता येतात. त्यामुळे स्तन-दाह प्रतिबंध होऊ शकतो.

आम्ही निरंजन बायोटेक नांदोशी पुणे येथे गेली दहा वर्षे चांदी/जस्त (सिल्वर / झिंक) अति सुक्ष्म कणांच्या हरित संश्लेषित (ग्रीन सिंथेसिस) च्या नॅनोटेक्नॉलॉजी (अतिसूक्ष्म तंत्रज्ञान) या विषयावर संशोधन आणि विकासाचे (R&D) काम हाती घेतले आहे. त्या आधीन “गोस्तन-दाह” वर प्रतिबंधन आणि उपचार करण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रॉडक्ट्स निर्माण केले आहेत.

उदारणार्थ :

  1.  पेस-मास्ट (PES_Mast) हे सुक्षम संपुटीत (मायक्रो एनकॅप्सुलटेड) वनौषधियुक्त (हरबल एक्स्ट्रॅक्ट युक्त) बहुमिश्रित औषध असून ते स्तनदाहाच्या प्रतिबंधन किंवा प्रत्यक्ष उपचारांसाठी गाईच्या आचलावाटे स्तनांमध्ये सोडण्यासाठी (for mammary injection) मलमाच्या स्वरूपात उपलब्ध केले आहे. हेच द्रव स्वरुपातील औषध “टिट कप” मध्ये ठेवून त्यात रोज दूध काढण्या अगोदर आणि दूध काढून झाल्यावर हि “टिट डीप” म्हणून वापरतात स्तन-दाह प्रतिबंधन होते. हे औषध वापरताना स्वच्छ पाण्यात त्याचे डायलुशन (पातळ करून) वापरतात.
  2. “पेरोसिल” हे सिल्वर नॅनो पार्टिकल्स आणि हायड्रोजन पेरॉक्साइड यांचे सुक्षम संपुटीत मिश्रण युक्त जंतुनाशक (डिसइन्फेक्टन्ट) असून ते दुग्धशाळेत दूध काढण्याआधी जमीन आणि भिंती निर्जंतुकीकरणसाठी वापरल्यास स्तन-दाह समस्या कमी करणे शक्य होते.

 

Read: गो स्तनदाह रोग निदान आणि त्यावरील उपचार


लेखक

डॉ. एस. व्ही. पंडित
जेष्‍ठ शास्त्रज्ञ, निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे