लंपी स्किन रोगाची २० दिवसाच्या वयाच्या गायीच्या वासरांतील घटना

विषाणुजन्य गांठीच्या चर्मरोगाचा (लंपी स्किन रोगाची) प्रादुर्भाव २० दिवसाच्या खिलार जातीच्या नर वासरामध्ये आढळुन आलाआहे. हया वासरात ताप, लाळ गळणे, नाक आणि डोळयां मधील स्त्राव, सर्व अंग भर टणक आणि दुखणा-या गाठींउठणे आणि त्यातील काही फुटुन कातडी वर छाले पडणे अशी लक्षणे सुध्दा दिसुन आली. गाठींचा चर्मरोग (लंपी स्किन रोगाची) हा गाई गुरांमधील एक विषाणुजन्य रोग आहे. हया रोगाचे शेळया मेंढ्यांच्या देवी (पॉक्स) हया रोगाशी नाते आहे. हा रोग विशिष्ट प्राण्याशी निगडित (होस्टस्पेसिफिक) असून तो त्यांच्यात दीर्घकाळाची विकृती निर्माण करतो.Lumpy Ski disease in khillar

सर्वसाधारण पणे तरूण जनावरे जास्त गंभीरपणे परिणामिक होतात. हा रोग गरम आणि ओलसर हवामाणात जास्त करूण होतो. हा विषाणु सुकलेल्या देवीच्या जखमंवरील खपल्यांमध्ये ३५ दिवसांपर्यंत आणि हवेत सुकविलेल्या कातडीमध्ये १८ दिवसापर्यंत जिवंत राहतो. हा रोग सुरवातीच्या काळांत आफ्रिका खंडांत दिसुन आला. त्यांनतर तो मध्यपुर्वेत, आशिया, पुर्व युरोप, चीन आणि नंतर भारतात पसरला. भारतात तो प्रथम २०१९ मध्ये दिसून आला.

रोगाचो कारण: लंपी स्किन डिसीज व्हायरस (विषाणु) हा कॅप्री पॉक्स व्हायरस (विषाणु) हया जिनस (Genus) चा असुन पॉक्सीव्हायरिडे हया कुंटुबांमध्ये मोडतो.

रोगाचा प्रसार: लंपी स्किन रोग जनावरांमध्ये चावणा-या डास आणि चावणा-या माशा आणि गोचिडी (Ticks) यांच्यामुळे फैलतो. त्याच प्रमाणे त्याचा प्रसार दूषित जनावरांच्या त्वचेवरील रोगगांठी मधील स्त्राव, लाळ नकातील स्त्राव, दुध आणि वीर्य हयांच्या प्रत्यक्ष संसर्गामुळे होतो.

रोग लक्षणे: ताप, लाळ गळणे, डोळे व नाकांतील स्त्राव, वजन घटणे, दूध निर्मीती कमी होणे, कमी अधिक प्रमाणात घट्ट आणि दूखणा-या गाठी सर्व शरिर भर दिसणे ईत्यादी लक्षणे दिसतात. त्वचे वरील लक्षणे कित्येक दिवस वा महिण्यांपर्यंत टिकतात. शरिरांतील विभागीय लिंफ ग्रंथी सूजतात आणि कांसेभोवती तसेच जांघेतिल भागातही सूज येते. कांही रोगामुळे लंगडेपणा, स्तनदाह, न्युमोनिया (फुफुसदाह), गर्भपात आणि नर व माद्या मधील वंध्यत्व हि दिसून येते.

जैव रसायन शास्त्रीय लक्षणे: पांढ-या रक्‍त पेशी, रक्‍त बिंबिका (Platelets) यांचा क्षय (कमतरता) तांबडया रक्तपेशींची वृध्दी, रक्‍तांतील प्रथिनांची आणि ग्लोब्यूलिन पातळीची वाढ, या उलट अलब्यूमिन व ग्लुकोज पातळीतील घट इत्यादि जैवरासायनिक बदल या रोगग्रस्त जनावरांत दिसुन येतात.

प्रयोगशालेय परिक्षणांसाठी आवश्यक लागणारे नमुने: रक्‍त आणि त्वचेच्या लक्षणांचे (स्किन लीजनस्चे) नमुने गोळा करावेत

रोगनिदानासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशालेय परीक्षा: प्रतिपिंड शोधन परिक्षा (अँण्टीबॉडी डिटेक्शन टेस्ट), विषाणु उदासीकरण (व्हायरस न्युट्र॒लायजेशन) टेस्ट ‘एलायझा (Elisa) परीक्षा, पी.सी. आर. आणि आर.टी.पी.सी.आर टेकनिक्स इत्यादि.

रोग निदान: वैशिष्टय पुर्ण रोगलक्षणे दिसत असल्युमुळे रोग निदान फारसे कठीण नाही. “गो देवी” (ऊर्फ काऊ पॉक्स) हया रोगापासुन लंपी स्किन रोगाची लक्षणे वेगळी सहजपणे दाखविता येतात. कारण काऊ पॉक्स मध्ये त्वचेवरील लक्षणे फक्त कांस आणि आंचळे हयावरील केसहीन त्वचे पुरतीच मर्यादीत असतात. तर त्याविरुध्द लंपी स्किन रोगांत ही लक्षणे सर्व शरीर भर केसाळ कातडी वरही दिसुन येतात.आणि प्रयोग शालेय निदानाच्या साहयाने ते निदान पक्के करता येते.

रोगोपचार:

Lumpy Skin Disease in Khillar Calfहा एक विषाणुजन्य रोग असल्यामुळे हया रोगावर विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. परंतु दुय्यम जीवाणु (बॅक्टेरियल) प्रादुर्भावामुळे होणा-या संसर्गाच्या प्रतिरोधासाठी प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) दाह प्रतिबंधक (Anti inflammatory) साठी हिस्टामिन प्रतिबंधक (Anti histaminic) औषधी दिल्या जातात. २% सोडियम हैड्राकसाईड, ४% सोडियमकार्बोनेट आणि २% फॉरमॅलीन यांचा वापर विषाणु नाशक म्हणुन करून लंपी स्किन रोगाच्या त्वचा लक्षणांच्या जखमावर उपचार केला जातो. १०% अस्कॉर्बिक अँसीड हे लक्षणावर उत्तम उपचार म्हणुन समजले जाते. परंतु त्याचे पाण्यामधील द्रावण (अस्थीर) असल्यामुळे ते प्रत्येकवेळी ताजे बनवावे लागते.

प्रतिबंधक उपाय आणि नियंत्रण:

पुढील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाय योजना कराव्यात:-

  • गोठयांमध्ये आणि त्यांच्या आंगणांत अत्यंत कठोर जैव सुरक्षेचे उपाय योजावेत.
  • नवीन आणलेली जनावरे विलगिकरणात ठेवावित आणि त्यांची कसून त्वचेवरील गांठी आणि इतर “लंपी स्किन” रोग लक्षणासाठी तपासणी करावी.
  •  रोगलक्षणाची लागण झालेली जनावरे निरोगी जनावरांपासून  अलग करून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय आणि उपचारांची सोय वेगळी करावी तसेच चरण्याची सोय हि वेगळी ठेवावी.
  • दुषित भागातील जनावरांची ने-आण बंद करावी.
  • रोगप्रसारक किटक (माशा, डास, चिलटे, गोचिडी) याच्या प्रजनन स्थळांतील प्रसरणाला आळा घालण्यासाठी योग्य किटकनाशकाचा उपयोग करावा.
  • तसेच तेथील किटक प्रजननाचा बंदोबस्त करावा त्यासाठी चांगल्या खत व्यवस्थापनाची आवशकता आहे.
  • लसीकरण:- शीतशुष्क (फ्रीज ड्राडड), सजीव (लाईव), क्षिणित (अँटेन्युएटेड) लंपी स्किन रोगावरील प्रतिबंधक उपलब्ध आहे. त्या लशीमुळे रोगाच्या प्रतिबंधास आणि प्रसारण थांबविण्यास मदत होते. रोगी जनावरे सोडुन इतर सर्व जनावरांना लसीकरण करुन घ्यावे.

ताजा कलम – डॉ. एस. व्हि. पंडित यांच्या कडुन :- लंपी स्किन डिसिज डांस आणि चाव-या माशां आणि गोचिडी मुळे प्रसारित होत असल्यामुळे त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी हरबोमॉस्क हे निरंजन बायोटेकचे कीटकनाशकची (zinc नॅनोपार्टिकलस युक्‍त) हर्बल डांस आणि माशा निवारक फवारणी गोठया बाहेरच्या शेणाच्या ढीगा-यांवर/ खडडयांवर केल्यास प्रसार थांबतो. त्याचबरोबर हरबोमॉस्कची फवारणी दूषित जनावरांच्या सर्व अंगावर करावी.


लेखक

डॉव्हिएमभुक्तर
माजी अध्यक्ष डीसीप्लिनरी कमिटी, भारतीय पशु चिकित्सा परिषद, नवी दिल्ली
ईमेल आयडी: vmbhuktar55@gmail.com

अनुवादक

डॉ. एस. व्ही. पंडित
एम.व्ही.एस.सी. (बॅक्टेरिऑलॉजी, पॅथॉलॉजी, पॅरासायटॉलॉजी), पि.जी. (डेन्मार्क)
जेष्‍ठ शास्त्रज्ञ, निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे