दुधाळ जनावरांसाठी चारा व्यवस्थापन

जनावरांच्या शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी, शरिराची वाढ, तंदूरूस्ती व स्वास्थ्यासाठी खाद्याची गरज असते. म्हणून खाद्यात पुरेशी उर्जा व शरिराला लागणारी प्रथिने, क्षार व आवश्यक असणारी पोषकतत्त्वे यांचा समावेश पाहिजे. तसेच पचनक्रिया सुरळीत ढेवण्यासाठी काही घटकही आहारात असावे लागतात.

जनावरांना देण्याचा चारा हा हिरवा व सुका असावा

Fodder

  • हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. हिरवा चारा जनावरांना चविस्ट लागतो.
  • हिरव्या चाऱ्याद्वारे जनावरांना आवश्यक प्रथिने, जीवनसत्वे मिळतात व त्यांचा परिणाम दुध उत्पादन वाढीवर होतो. तसेच हिरवा चारा पोषण आहार व उत्पादन आहार दोन्हीसाठी फायद्याचा ठरतो.
  • वाळलेल्या किंवा सुक्या चाऱ्याचा उपयोग पोषण आहारासाठी होतो.
  • वाळला साठवणूक केलेला चारा मुख्यत्वे हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या सुरूवातीला वापरण्यात येतो.
  • या वाळलेल्या किंवा सुक्या चाऱ्यांमध्ये पोष्कतत्त्वे कमी प्रमाणत असतात. अश्या चाऱ्याला युरिया, मिठ मिनरल मिक्शचर व गुळ यांची प्रक्रीया करून त्यांचे पोषणमुल्य सुधारले जाऊ शकते. ज्यामुळे जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसेल अशावेळी पुरेसा पौष्टीक चारा मिळेल व चाऱ्याची कमतरता आसणार नाही.
  • सर्वसाधारणपणे 10 लिटर दुध देणाऱ्या गाई/म्हशीस (अंदाजे वजन 400) 6 ते 8 किलो वाळला चारा (2 ते 2.5% वाळलेला चारा, जनावरांच्या वजनाच्या) आणि 25 किलो हिरवा चारा. (वजनाच्या 5 ते 7 % हिरवा चारा).

वाळलेला किंवा सुका चारा प्रक्रिया करून ठेवण्याचे अनेक फायदे आहेत :

पावसाळा संपल्यानंतर जनावरांना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते अशावेळी सुक्या चाऱ्यावरती अवलंबून रहावे लागते, परंतु या चाऱ्यामध्ये जनावरांसाठी आवश्यक पोषकतत्त्वे, प्रथिने, जीवनसत्त्वे हव्या तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत.

  • महाराष्ट्रातील काही भागात अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे बहूवार्षिक चारापीके लावणे शक्य होत नाही. त्यासाठी हिरव्या चाऱ्याचे प्रीजर्वेशन करून ठेवणे फायद्याचे ठरेल.
  • हिरव्या चाऱ्यांचे प्रीजर्वेशन करणे म्हणजे मुरघास बनवणे.
  • मुरघास : मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत किण्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा होय. या पद्धतीत हवा विरहीत अवस्थेमध्ये जगणाऱ्या सुक्ष्म जिवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टीक आम्ल तयार होते. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्यात भरला जातो तेंव्हा वनस्पतीच्या पेशी जीवंत असतात व त्यांचा स्वाच्छोवास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बन डायऑक्साईड तयार होतात. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते व खड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जिवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता खूप काळ टिकून राहू शकतो.
  • हायड्रोपोनीक्स : पोषकद्रव्ये आणि पाणी यांचा वापर करून मातीशिवाय रोपटे वाढविण्याची ही पद्धत आहे. हायड्रोवोनीक्स तंत्राद्वारे उत्पादीत केलेला हिरवा चारा हा पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असतो. चाराटंचाई परिस्थितीत कमी खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे.
  • ॲझोला : ही एक वनस्पती आहे. याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. ॲझोला ही एक बहुगूणी चमत्कारीक वनस्पती आहे. तिचा प्रसार आणि लागवड वाढल्यास ती बहुउपयोगी सिद्ध होवू शकते. अवघे 2 ते 3 सेंमि आकाराची ही वनस्पती प्रचंड वेगाने वाढते. दर दोन दिवसांनी दुप्पट होण्याची क्रिया सतत सुरू असते.

 

हेही वाचा: भारतीय वंशांच्या दूधाळ गायी व म्हशींच्या प्रमुख जाती


डॉ. ओंकार थोरात

एम. व्ही. एस. सी., पशुपोषणशास्त्र.
ई-मेल आयडी: onkarthorat1602@gmail.com