गाई-म्हशींमधील ब्रुसेल्लोसिसमुळे होणाऱ्या गर्भपाताचे पुढील नुकसान टाळण्यासाठी त्वरित क्षेत्रीय निदान
ब्रुसेल्लोसिस हा ब्रुसेल्ला नामक जीवाणूंमुळे होणारा जीवाणू जन्य रोग आहे. त्याचा प्रादुर्भाव सर्व जगभर दिसून येत असून शेतकऱ्यांच्या मिळकतीवर त्याचा अत्यंत वाईट परिणाम दिसून येतो. ब्रुसेल्लोसिस रोगाचा प्रसार नेहमीच जनावरांच्या वेताच्या वेळी बाहेर पडणाऱ्या वारेच्या आणि प्रवाही द्रवाच्या संसर्गामुळे होत असतो. प्रयोग शाळेत ह्या रोगाचे जंतू कलचर आणि रक्तजल (सीरम) तपासणी केल्यावर ओळखता येतात. ह्या रोगाचे जंतू लघवी (मूत्र) गर्भाशयांतील स्त्राव, दूध आणि क्वचित जनावरांचे वीर्य यांत सापडतात. ब्रुसेल्ला रोगाचा जनावरांच्या कळपांतील किंवा वैयक्तिक जनावरांतील संसर्ग खालील चाचण्या क्षेत्रीय स्तरावर केल्यासच निदर्शनास येतो.
मिल्करिंग चाचणी (एम.आर.टी.)
खालील साहित्य चाचणीसाठी आवश्यक
अ) रंगित अँटिजेन (कलर्ड अँटीजेने) 20 मि.ली. व्हायल्स (हे भारतीय पशुवैद्यक संशोधन संस्थान (IVRI) किंवा पशुवैद्यकीय जैवपदार्थ संस्थान (IVRI / IVBP)
ब) टेस्ट ट्युबस (परिक्षानळ्या), 10 मि.ली. कॅपसिटीच्या.
क) उबवणूक यंत्र (इनक्युबेटर) ते उपलब्ध नसल्यास ही परिक्षा (टेस्ट) प्रयोग शाळेच्या खोलीतील 34 अंश ते 37 अंश सेंटीग्रेड तापमानात भारतात होवू शकते.
-
एम.आर.टी. (एकत्रित पुल्ड सँपल वा कॅन्ड सँपल वरील) चाचणी :
जर पुरेसे अभिकर्मक (रिएजंटस) तुमच्याकडे नसतील तर एकत्रित केलेल्या रक्तद्रव (सीरम) नमुन्यांवर (सँपल्स) किंवा दुधाच्या नमुन्यांवर ही चाचणी करता येते. जर फार्मवरील किंवा गावातील रोग प्रादुर्भाव किती आहे हे माहित नसेल तर 10 पेक्षा अधिक नमूने (सँपल्स) एकत्रित करू नका. जर ही चाचणी प्रथम करीत असाल तर ही चाचणी प्रत्येक जनावरावर वेगळी करावी.
चाचणीची पद्धत : 1 मि.ली. चांगले मिश्रित केलेले सँपल एका परिक्षा नळीत (4 ते 5 मि.ली. क्षमतेच्या) घ्या. त्यात रंगित ॲटिजेनचा एक थेंब टाका. अनेक वेळा ते ढवळून मिश्रित करा (हळूवार पणे). ही मिश्रित परिक्षानळी 37 अंश सें. तापमानाला 1 तास उबवा. प्रत्येक वेळी चाचणी बरोबर (एम.आर.टी. चाचणी), एक पॉझेटिव्ह कंट्रोल व एक नेगेटिव्ह कंट्रोलच्या परिक्षा नळ्याही सोबत उबवणूक करा.
परिक्षेचा निकाल (रिझल्ट) : परिक्षेच्या निकालाचे निरिक्षण भर दिवसा उजेडी किंवा लख्ख दिव्याच्या प्रकाशात करा. जर वरच्या क्रीमच्या थराचा लाल रंग खालच्या दुधाच्या थराच्या रंगापेक्षा गडद असेल तर चाचणी पॉझिटिव्ह (+) आली असे समजले जाते. प्रथम कंट्रोल परिक्षा नळ्यांचा निकाल पाहिला जातो व मगच प्रमुख चाचणीचा निकाल नोंद करतात. त्यामुळे अँटिजेनची प्रत योग्य आहे की नाही हे समजते व तसेच टेस्ट योग्यरित्या झाली की नाही हे ही समजते.
-
ब्रुसेल्लोसिस निदानासाठी प्लेट ॲग्लुटिनेशन चाचणी :
ह्या चाचणीला “रोज बेंगॉल” चाचणी असेही म्हणतात. ह्या चाचणीच्या अँटिजेन सोबत वर्तुळे आखलेल्या कांचेच्या प्लेट्स (स्लाईडस) ही पुरवल्या जातात. त्यामुळे चटकन तुलनात्मक निरिक्षण ही नोंदता येते.
चाचणीसाठी आवश्यक साहित्य :
- ब्रुसेल्ला “रोज बेंगॉल” रंगित ॲटिजेन.
- ब्रुसेल्ला संशयित जनावराचे सीरम (रक्तजल).
- कांचेची प्लेट वा स्लाईड.
चाचणीची रीत वा पद्धत :
- चाचणी संचासोबत पुरवलेल्या तारेच्या “लूप” हँडलच्या “लूप” भरून एक थेंब सीरम व एक “लूप” भरून एक थेंब ब्रुसेल्ला रंगित अँटिजेन (रोज बेंगॉल अँटिजेन) कांचेच्या स्लाईड वरील कोरलेल्या वर्तुळांत किंवा प्लेटवरील चौकोनात ठेवा. त्याच प्रमाणे ज्ञात (+) व ज्ञात (-) ब्रुसेल्ला प्रतिपिंडे (अँटिबॉडी) युक्त सीरम (रक्तजल) चे थेंब आणि ब्रुसेल्ला अँटिजेन शेजारील वर्तुळ/चौकोनात ठेवा.
- लूप हँडलच्या “तारेच्या लूप”ने सर्व वर्तुळांतील/चौकोनातील सीरमचे थेंब व अँटिजेनचे थेंब मिश्रित करा आणि कांच/प्लेट स्वत:भोवती एक बाजुने दुसऱ्या बाजुला (साईड टू साईड) गोलगोल फिरवा म्हणजे थेंबांचे मिश्रण संपूर्ण होईल. त्यानंतर “ॲग्लुटिनेशन” प्रक्रिया झालेली आहे की नाही हे निरिक्षण करा.
परिक्षेचा निकाल (रिझल्ट) :
चाचणीच्या मिश्रित थेंबांमध्ये सूक्ष्म गुठल्या होणे (ॲग्लुटिनेश) हे पॉझिटिव्ह (+) प्रक्रियेचे लक्षण आहे. अशी “प्रक्रिया” दिसल्यास ते सीरम ब्रुसेल्लोसिस रोग झालेल्या जनावराचे आहे असे समजावे. चाचणी निश्चितीसाठी (+) आणि (-) सीरमधील प्रक्रिया पडताळून पहावी.
Read: IVRI की बड़ी उपलब्धि, पशुओं में ब्रूसीलोसिस बीमारी की रोकथाम के लिए विकसित की नई उन्नत वैक्सीन
मराठी अनुवाद
डॉ. एस. व्ही. पंडित
जेष्ठ शास्त्रज्ञ, निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे