दुधाळ जनावरांच्या आहारात ‘कॅल्शियम प्रोपिओनेट’ चे महत्त्व
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने हवेमध्ये आद्रता असण्याचे प्रमाण दिसून येते. पशुपालक आपल्या जनावरांसाठी खाद्य योग्य त्या प्रमाणात घेऊन ठेवतात. पण बहुतेक वेळा या खाद्यामध्ये बुरशी ची वाढ होत असल्याची आपल्याला दिसून येते ज्याला अनेक कारणे असू शकतात. परिणामी त्यात ‘ऍफ्लाटॉक्सिन’ चे प्रमाण वाढते. असे खाद्य जनावरांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच ‘दुग्ध ज्वर’ किंवा ‘मिल्क फिव्हर’ मध्ये जनावरांत कॅल्शियम ची तसेच ऊर्जेची कमतरता जाणवते. ज्यामुळे आपले जनावर दगावू देखील शकते व त्यामुळे उत्पादन कमी होऊन आपला दुग्धव्यवसाय तोट्या मध्ये जायला वेळ लागत नाही. अशा वेळेस कॅल्शियम प्रोपिऑनेट आपल्याला चांगले परिणाम देऊन आपल्याला होणारा तोटा नफ्यामध्ये रूपांतरित करू शकते.
कॅल्शियम प्रोपिओनेट हे प्रोपिओनिक ऍसिड चे कॅल्शियम सॉल्ट आहे. ‘कॅल्शियम हायड्रॉक्साईड’ आणि ‘प्रोपियोनिक ऍसिड’ (आम्ल) ची प्रतिक्रिया झाल्यावर हे सॉल्ट तयार होते. वरील कंपाउंड आपल्याला पावडर, द्रव आणि कॉम्प्रेसज्ड स्वरूपात बाजारात उपलब्ध मिळते.
कॅल्शियम प्रोपिओनेट पावडर :
कॅल्शियम प्रोपिओनेट तयार होण्याची प्रक्रिया :
प्रोपियोनिक ऍसिड कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम प्रोपिओनेट पाणी
कॅल्शियम प्रोपिओनेट चे गुणधर्म :
- हे एक फ्री-फ्लोइंग पावडर आहे, जे खाद्यामध्ये सहजपणे मिसळते
- विशिष्ट असा वास येत नाही
- खाद्याचे शेल्फ-लाइफ वाढवते
कॅल्शियम प्रोपिओनेट चा उपयोग आपण खालील कारणांसाठी करू शकतो :
- जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणाऱ्या बुरशीला आळा घालण्यासाठी तसेच स्पॉरुलेटिंग जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी
- पोषणतत्त्वांचे मूल्य राखण्यासाठी तसेच खाद्याची शेल्फ लाइफ वाढण्यासाठी
- बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थाच्या सुरक्षकतेसाठी
- संक्रमण काळातील गाईंसाठी कॅल्शियम आणि ऊर्जेचा स्त्रोत
- गाईंमध्ये दुधाचा ताप किंवा दुग्धज्वर टाळण्यासाठी
- सायलेज किंवा मुरघास मध्ये बुरशीची वाढ न होण्यासाठी
- जनावरांमधील निगेटिव्ह एनेर्गी बॅलन्स कमी करण्यासाठी ग्लुकॉनिओ जेनिक (ज्या पासून ग्लुकोस निर्माण होते) प्रीकर्सर म्हणून
- वासरांमध्ये कोठीपोट (रूमेन) विकसित होण्यासाठी तसेच वाढीसाठी
कॅल्शियम प्रोपिओनेट कसे कार्य करते ?
- खाद्यामध्ये कॅल्शियम प्रोपिऑनेट सूक्ष्मजंतूंना टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा तयार होऊ देत नाही ज्यामुळे बुरशीची वाढ थांबते.
- जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियम प्रोपिऑनेट गेल्यावर ते Ca2+ आणि प्रोपिऑनेट मध्ये विभाजित होते. परिणामतः रक्तामधील कॅल्शियम चे प्रमाण वाढते. यामुळे आपण कॅल्शियम प्रोपिऑनेट चा उपयोग दुग्ध ज्वर किंवा मिल्क फीव्हर मध्ये देखील करू शकतो.
- शुष्क पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते ज्यामुळे कोठीपोटा (रूमेन) तील ‘व्होलाटाईल फॅटी ऍसिडस्’ च्या प्रमाणात वाढ दिसून येते. प्रोपिऑनेट हे जनावरांमध्ये ग्लुकॉनिओ जेनिक (ज्या पासून ग्लुकोस निर्माण होते) प्रीकर्सर म्हणून काम करते. त्यापासून ग्लुकोस ची निर्मिती होत असल्या कारणाने जनावरांना ऊर्जा मिळते. परिणामतः जनावरांमधील निगेटिव्ह एनेर्गी बॅलन्स चा प्रश्न सुटतो आणि किटोसिस (ग्लुकोस च्या अभावामुळे निर्माण होणारी एक अवस्था) तसेच फॅटी लिव्हर चे प्रमाण कमी होते.
- प्रोपिऑनिक ऍसिड (आम्ल) च्या जिवाणूनाशक (अँटीबॅक्टिरिअल) गुणधर्मांमुळे मुरघासा तील बुरशीचे तसेच अन्य जिवाणूंचे वर्चस्व कमी होते, यामुळे मुरघासा ची किंवा टोटल मिक्स रेशन ची गुणवत्ता अबाधित राहते. परिणामी पोषणमूल्यांचा ऱ्हास होत नाही. पोषणमूल्ये जास्त प्रमाणात उपलब्ध राहिल्यामुळे जनावरांची तब्येत व एकंदरीत दुग्धोत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो.
- वासरांमध्ये कोठीपोटा (रूमेन) मधील एपिथेलियम ची वाढ होण्यासाठी देखील प्रोपिऑनेट हा महत्त्वाचा घटक ठरतो. पोषण मूल्यांचे शोषण शरीरात चांगल्या प्रकारे केले जाते, त्यामुळे वासरांची वाढ चांगली होते.
Read: दुग्ध ज्वर किंवा मिल्क फिव्हर मधील आहाराचे व्यवस्थापन
एम. व्ही. एस. सी. (पशु पोषण व आहार शास्त्र)
फाईन ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई
मोबाईल नंबर 8657580179