दुभत्या जनावरांमधील गोचिडींचा प्रादूर्भाव आणि त्यावरील उपाय  

दुभत्या जनावरांच्या शरिरावर अनेक प्रकारचे बाह्य परोपजीवी जीव दिसून येतात. गोचीड हे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या नावावरुनच ते अंगावर चिकटून राहणारे आहेत हे लक्षात येईल आणि ते रक्त शोषण करणारे आहेत हे ही समजेल. त्यावरच त्यांचा निर्वाह होतो. गोचीड मुख्यत: कानाच्या आंत आणि बाहेर, त्याचप्रमाणे जनावरांच्या थानांवर, शेपटांच्या आतील व बाहेरील बाजुंवर, मानेवर आणि खुरांच्या बेचक्यांत चिकटून राहतात. दुभत्या जनावरांमध्ये 106 वेगवेगळ्या गोचीडींच्या प्रजाती दिसुन येतात. त्यामध्ये इक्सोडिस (Ixodes), बुफिलस (Boophilus), हायलोमा (Hyalomma), रिपिसेफॅलस (Rhipicephalus), डरमॅसेंटर (Dermacenter) त्यां वैज्ञानिक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या प्रजातींचा समावेश आहे.

ह्या सर्व गोचिडींचे जीवनचक्र असे असते की, वयस्क आणि आळी (लारव्हा) ह्या दोन्ही ‘अवस्था’ मध्ये त्या जनावरांच्या शरीरावरच चिकटून राहतात. अंडी घालताना मादी गोचिडी मात्र जनावराचे शरीर सोडून देऊन गोठ्यांच्या जमिनी आणि भिंतींवरील खांच खलग्यांत लपून राहून अंडी घालतात. एक मादी गोचीड 500 ते 5000 अंडी एका वेळेस घालते. अंड्यांतून बाहेर पडणारे लारव्हा (आळ्या) आपल्या जगण्यासाठी त्याच किंवा दुसऱ्या जनावराच्या अंगावर जाऊन त्यांना चिकटतात. नर गोचिडी नेहमी जनावराच्या शरिरांवरच चिकटून राहतात. तशा गोचिडी सर्व वर्षभर जनावरांच्या शरिरावरच चिकटून राहतात. परंतु त्याचा प्रादुर्भाव जास्त करून सप्टेंबर ते नोव्हेंबर तसेच फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांमध्ये दिसून येतो.

गोचिडी जनावरांच्या आरोग्यावरील परिणाम आणि लक्षणे :

गोचिडी जनावरांच्या आरोग्यावर दोन प्रकारचे पतिकूल परिणाम घडवतात.

  • प्रत्येक्ष परिणाम आणि
  • अप्रत्येक्ष परिणाम

अ) प्रत्येक्ष परिणाम व लक्षणे

  1. त्या जनावरांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे जनावरांत रक्त कमी होऊन (रक्त क्षय अनेमिया) जनावर हळूहळू अशक्त होत जाते. एक गोचिड दिवसभरांत 0.5 ते 2.00 मि.ली. रक्त जनावरांच्या शरिरातून शोषून घेते.
  2. जनावरांची भूक कमी होऊन ते सुस्त होत जाते.
  3. जनावरांच्या शरिरावर खाज सुटल्यामुळे त्यांच्यात चिडचिड निर्माण होते.
  4. जनावरांची चामडी खराब होत जाते व त्यावरील केस झडू लागतात.
  5. जनावरांचे दुग्धेपादन कमी होते.
  6. गोचिडींचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास जनावरांचे प्रजनन विलंबित होते.
  7. बैलांची कार्यशक्ति व क्षमता कमी होते.

ब) अप्रत्येक्ष परिणाम व लक्षणे 

एका बाजूने गोचिडी जनावरांचे रक्त शोषण करून त्यांची उत्पादक शक्ति कमी करतात तर दुसऱ्या बाजुला अप्रत्येक्ष रित्या अनेक प्रकारचे जिवाणू, विषाणू आणि परोपजिवी जीव (प्रोटोझोवा) निर्मित घातक रोगांचे संक्रमण करतात ज्यांमध्ये थायलेरिओसिस, बॅवोशियोसिस, अ‍ॅनाप्लाज्मोसिस गोचिड ज्वर आणि पक्षाघात हे प्रमुख रोग आहेत.

गोचिडींचे नियंत्रण :

सर्वसामान्यत: जनावरांमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा (केमिकल इंसेक्टिसाईडसचा) उपयोग गोचिड नियंत्रणसाठी केला जातो. त्यांत जास्त करून सिंथेटिक ऑरगॅनो फॉस्फरस कंपाऊंडसचा समावेश असतो. त्यांच्या उपयोगामुळे जनावरांच्या शरिरावरील जवळजवळ 100 टक्के गोचिडी तर मरतात पण त्यांची अंडी संपूर्णपणे नष्ट होत नाहीत. कारण ही गोठे आणि कोंडवाडा यांच्या भिंती व जमिनीवरील खांचा खळग्यात झांकलेली राहतात. तसेच ही रासायनिक द्रव्ये विषारी असतात. त्यामुळे त्यांचा उपयोग फार काळजीपूर्वक करणे जरूरीचे आहे. त्यांच्या उपयोगामुळे कर्करोग होण्याचीही भीती असते. त्यांच्या अतिवापरामुळे गोचिडींमध्ये ह्या किटकनाशकांप्रती प्रतिकारशक्ती (ड्रग रेसिस्टन्स) ही निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी किटकनाशके गोचिड नियंत्रण करण्यास अक्षम ठरू शकतात.

सामान्यत: वापरल्या जाणाऱ्या गोचिड प्रतिबंधक किटकनाशकांमध्ये (Acaricide) पायरेथ्राईड (सायपरमेथ्रिन व डेल्टामेथ्रिन) व ऑरगॅनोफॉस्फेट (हेवप्राफेन, कोगॅफॉस व फेनवाले रेट) ही प्रमुख आहेत. हे डेल्टामेथ्रीन (deltamethrin) बाजारांत बूटॉम्स या नावाने उपलब्ध आहे. याचा ‘स्प्रे किंवा डिप’च्या स्वरूपात उपयोग केला जातो. ‘बूटॉम्स’ हे औषध 2 मि.ली. घेऊन 1 लिटर पाण्यात मिश्रीत करून जनावरांना त्याची आंघोळ घालणे आवश्यक आहे आणि 5 मि.ली. औषध पाण्यात मिसळून कोंडवाडा वा गोठ्यांच्या भिंतींवर त्याची फवारणी केली पाहिजे, कारण ही सर्व रसायने जनावरांसाठी विषारी आहेत.

जनावरांच्या शरिरावर लावल्यास त्यांची तोंडे फडक्यांनी बांधून ठेवणे आवश्यक आहे, जेणे करून जनावरांना ती चाटता येऊ नयेत. तसेच जनावरांवर फवारणी आधी/आंघोळी आधी त्यांना पाणी पाजावे म्हणजे ती त्यांची ओली शरीरे चाटणार नाहीत. गोचिड नियंत्रणासाठी आयव्हरमेक्टिन (Ivermectin The Products And Techniques Are Natural And Complementary To Veterinary MedicineIvermectin)/डेल्टामेक्टिन (DoramectinDectomax Injection) नामक औषधे इंजेक्शन व टॅब्लेट स्वरूपांत सुध्दा उपलब्ध आहेत. या औषधंची 1 मि.ली. प्रति 50 कि.ग्रॅम वजन या हिशोबांने त्वचेच्या खाली (सबक्युटेनियस) टोंचणी करावी लागते. ‘अमीट्राज’ टेक-टिक हे औषध या नावाने उपलब्ध असून ते 2 मि.ली. प्रतिलिटिर पाण्यात मिसळून अंगाला लावायला पाहिजे. अमीट्राज डेल्टामेथ्रिन (DeltamethrinKatyayani Deltamethrin 1.25% ULV for Mosquitoes Cockroaches Bed Bugs Flies Flying and Crawling Household Quick Knock Down Insecticide Insects Thermal or Ultra Low Volume Fogging Spray (1 L) Deltamethrin) हे मिश्र औषध ही उपलब्ध आहे. तसेच फ्लू मेथ्रिन औषध ही उपलब्ध आहे. या औषधांची वैशिष्ट्ये अशी आहेत की, या औषधांनी जनावराला आंघोळ न घालता ते जनावराच्या कवटीच्या मानेकडील भागापासून शेपटीच्या बेसपर्यंतच्या हडापर्यंत सर्व पाठभर त्या औषधाची रेखा ओढावी लागते. त्या भागाच्या चामडीवर लावलेले औषध त्वचेतून मुरून त्वचेखाली जाते आणि तीन महिन्यांपर्यंत औषधाचा अभाव राहून गोचिडी होत नाहीत.

रासायनिक गोचिडनाशकांचा माणसे, पशु व वातावरण यावर विपरित परिणाम होतो. म्हणून त्यांचा वापर फार काळजीपुर्वक केला पाहिजे आणि जनावरांच्या गोठ्यांमध्ये व घरांमध्ये या औषधांना लहान मुलांपर्यंत पोहोचू देता कामा नये.

Tick infection in cattle

गोचिड नियंत्रणासाठी ‘रासायनिक’ पद्धतीच्या वर उल्लेखलेल्या ‘आधुनिक’ औषधीं प्रमाणेच प्रभावी पण स्वस्त अशा काहीं प्राचीन पशुचिकित्सा परंपरांशी निगडित ‘एथनोमेडिकल/व्हेटेरिनरी’ अथवा ‘जडीबुटी’ किंवा ‘हर्बल मेडिसीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधीही उपलब्ध आहेत. ही सर्व औषधे कडूलिंब (नीम), तम्बाकू, सीताफळ, देवदार निलगिरी (युकॅलिप्टस) तेजपत्रा, पुदीना आणि लसूण या वनस्पतींपासून बनविली जातात. याचे प्रयोग केल्याने जनावरे तर निरोगी होतातच पण शिवाय माणसे आणि पशू यांच्या स्वास्थ्यावरही कांही विपरीत परिणाम होत नाही. गोचिडांवर पायरेथ्रम या ‘शेवंती’ची फुले आणि पानांपासून बनविलेल्या ‘होमिओपॅथिक’ औषध (नाशक) म्हणून उपयोग होतो.

जनावरांचे गोचिंडीपासून संरक्षण :

  1. जनावरांच्या गोठ्यांमध्ये घाण होऊ देवू नका. गोचिडी अंधाऱ्या आणि अडगळीच्या जागेत अंडी घालतात त्यासाठी गोशाळेत साफसफाईचे भान राखले पाहिजे. जेथे जनावरे बसतात ती जागा कोरडी ठेवली पाहिजे.
  2. कोंडवाड्यामध्ये खेळती हवा आणि भरपूर उजेड असला पाहिजे.
  3. जनावरांना संतुलित आहार दिला पाहिजे.
  4. बाहेरून विकत आणलेल्या जनावरांना कमित कमी दोन आठवडे वेगळे ठेवले पाहिजे.
  5. जनावरांना घाणेरड्या नाल्यांमध्ये वा डबक्यांमध्ये बसूं देऊ नये.

 

डॉ. के. एम. एल. पाठक

माजी उपसंचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली आणि माजी कुलगुरू, दुवासू, मथुरा

डॉ. के. आर. शिंगल

सेवानिवृत्त विभागीय सह आयुक्त, पशुसंवर्धन
महाराष्ट्र राज्य, भारत सरकार
ईमेल आयडी: drkrshingal@gmail.com

बाजारात उपलब्ध उत्पादने:

RIDD Growvit Powder Norbrook 2251053C Ivermectin-Noromectin Injection 1-Percent-500 cc

हेही वाचा: डाऊनर काऊ सिंड्रोम निदान आणि उपचार