५ जनावराांचा गोठा प्रकल्प अहवाल कसा तयार करावा

आपला दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर करणे यासाठी आपण कायमच प्रयत्नशील असतो. त्यासाठी आपण चांगला आहार देतो व चांगले व्यवस्थापन सुद्धा उपलब्ध करतो, परंतु हे करत असताना आपणास आस आपल्या गोठा वाढविण्यासाठी नवीन गाई खरेदी कराव्या लागतात अशी खरेदी करताना एकत्र आपण आपल्या गोठ्यात जनावरांची पैदास करतो किंवा इतर शेतकर्यांकडून विकत घेतो. अशी जनावरे विकत घेताना आपणास बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. बँकेत आपणास आपण कश्याप्रकारे हा व्यवसाय करणार आहोत याबाबत एक प्रकल्प अहवाल द्यावा लागतो. हा जनावराांचा गोठा प्रकल्प अहवाल कसा असावा याबाबत बऱ्याच पशुपालकांना याबाबत माहिती नसते त्यासाठी आपण ५ जनावराांचा गोठा प्रकल्प अहवाल कसा तयार करावयचा हे आपण पाहू. दुग्धव्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून केला जातो परंतु आता बरेच पशुपालक हा मुख्य व्यवसाय करत आहेत. तंत्रशुध्द पद्धतीने दुग्धव्यवस करणे हे आज महत्वाचे आहे. आपण कमी खर्चातील तंत्रज्ञान शेतकऱ्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्री वापरून आपला गोठा तयार करावा व आवश्यक तेथे आपण जास्त पैसा खर्च करणे आवश्यक आहे. यामध्ये चांगल्या वंशावळीची जनावरे यासाठी जास्त खर्च करणे योग्य आहे. कमी दुध देणारी जास्त जनावरे पाळण्यापेक्षा जास्त दुध देणारी कमी जनावरे पाळणे महत्वाचे आहे. आपली दुध काढण्याची क्षमता तपासून आपण त्या गुणवत्तेची जनावरे विकत घेणे आवश्यक आहे.

प्रकल्प अहवाल करताना आपणास ज्या बँकेला द्यावयाचा आहे त्यांची नियमावली माहित करून घेतली पाहिजे. म्हणजे जनावरांची जास्तीत जास्त किंमत, मार्जीन, व्याजाचा दर, कर्जाचा कालावधी, कर्ज वितरणाची पद्धत ई. या गोष्टी आपणास प्रकल्प अहवालासाठी आवश्यक असतात व त्यानुसार प्रकल्प अहवाल केल्यास सदर बँक असा परिपूर्ण अहवाल स्वीकारते अन्यथा त्यामध्ये दुरुस्ती करण्यास पुन्हा पाठविल्यामुळे पशु पालकास नाहक त्रास होऊ शकतो व या मुळे कर्ज वितरणास उशीर होऊ शकतो.

5 जनावराांचा गोठा प्रकल्प अहवाल 

सुरुवातीचा खर्च:- यामध्ये आपण जो capital खर्च असतो त्याचा समावेश होतो. यामध्ये गाय खरेदी, गोठा उभारणी खर्च तसेच त्यासाठी लागणारी उपकरणे यांचा समावेश होतो. या रकमेच्या आधारवर बँक आपणास कर्ज देते.

भांडवली खर्च

  • जनावरे खरेदी :- यामध्ये आपणास जनावरे खरेदी करण्यासाठी आवश्यक रक्कमेचा उल्लेख करावयचा असतो. हि किंमत जनावराचा प्रकार व जातीनुसार नाबार्ड  (NABARD) याची किंमत ठरवत असते व बाजारातील किंमतीनुसार हा किमती बदलत राहतात. यामध्ये जनावराची मूळ किंमत व विम्याचा समावेश असतो. आपणास जनावरे जर लांब अंतरावरून खरेदी क्रव्यची असतील तर प्रवासाचा विमा सुद्धा काढणे पशु पालकास फायदेशीर असते.
  • गोठा उभारणी खर्च :- यामध्ये गोठा उभारणीसाठीच्या खर्चाचा समावेश असतो. यामध्ये आपण एक गोष्ट मात्र वारंवार लक्षात ठेवली पाहिजे कि आपण कर्ज काढून हा व्यवसाय करत आहोत व ते कर्ज आपणास परत करावयाचे आहे त्यामुळे ज्या ठिकाणी आपणास कमीत कमी खर्च करता येईल त्यासाठी कमी खर्च कमी करावा. कारण ज्यावेळेस आपण आपला व्यवसाय चांगला नफ्यात चालवू त्यावेळेस आपण अश्या गोष्ठीवर कितीही खर्च करू शकतो. कारण यावेळी आपणाकडे जो पैसा आहे तो आपलाच असतो व त्यासाठी आपणास व्याज द्यावे लागत नाही. अश्या वेळेस आपण दूरदृष्टीने विआचार करून आपल्या गोठ्याचे नियोजन करू शकतो.  यामध्ये शेडच्या खर्चासह आपणास आपल्या गोठ्याचा प्राथमिक गरजा पूर्ण होण्यसाठी जी साधनसामग्री आवश्यक आहे त्याची साठवणूक करण्यसाठी शेड यांचा  विचार करणे आवश्यक आहे.
  • यामध्ये कुट्टी यंत्र, दुध काढावयाचे यंत्र, धारेची भांडी, मुरघास करण्यासाठी यंत्रणा, चारा वाहण्यासाठी यंत्रणा, चारा साठवणुकीसाठी जागा, पशुखाद्य ठेवण्यासाठी जागा अश्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्या जनावरांच्या संख्येप्रमाणे आपण आर्थिक नियोजन या प्रकल्प अहवालात आपण नमूद करू शकतो
  • ईतर खर्च :- यामध्ये विद्युत पुरवठा व त्याबाबतचा खर्च, पाणी पुरवठा व साठवणुकीचा खर्च याबरोबरच असे काही इतर लहान खर्च आपण यामध्ये टाकू शकतो.

भांडवली खर्च

तांत्रिक भाग 

आपण हा प्रकल्प अहवाल तयार करत असताना आपणास आपल्या जनावरांचे आहार, आरोग्य, दुध उत्पादन, प्रजनन, शेणाचे उत्पादन अश्या गोष्टीचा विचार केला जातो.

  • आहार खर्च :- यामध्ये आपल्या जनावरांना १ वर्षासाठी असे पुढील ५ वर्षाचा त्यांच्या गाभणपणा, दुध उत्पादन व भाकड काळातील सर्वसाधारण कालवधी विचारात घेऊन किती ओला चारा, सुका चारा, पशुखाद्य व इतर खाद्य पुरके लागतील याचा उल्लेख करतो.
  • आरोग्य खर्च :- यामध्ये वरील प्रमाणे ५ वर्षासाठी आपल्या जनावरांना वेळच्या वेळी लसीकरण, जंत निर्मुलन, औषधोपचार, इतर आरोग्यावरील कामकाजासाठी किती खर्च येईल याचा उहापोह केलेला असतो.
  • कालवड प्रथम दुधात येण्याचे वय या प्रकल्पात सर्वसाधारणपणे २.५ वर्ष घेतलेले आहे. तसेच कालवडीचा खर्च या वयापर्यंतचा सर्व व्यवस्थापनाचा खर्च हा ६०% गृहीत धरला असून बाजार मूल्यमापनानुसार त्यांचे प्रती कालवड उत्पन्न ३५००० घेतलेले आहे.
  • आपण ज्या गाई खर्डी करणार आहोत त्या शक्यतो प्रथम किंवा दुसऱ्या वेतातील असतील जेणेकरून त्या जास्त काळ आपल्या गोठ्यात राहतील. त्यांची बाजारमूल्य सद्य परिस्थितीत रु. ८०,०००  विम्यासह घेतलेले आहे.
  • गाईची दुध देण्याची क्षमता म्हणजे एका वेतात गाय किती दुध देते व गाईचे दोन वेतामधील अंतर किती असेल यावरून एका वर्षात किती दुध दिले हे ठरविता येते. या ठिकाणी दोन वेतातील अंतर सर्वसाधारणपणे  एक ते सव्वा वर्ष गृहीत मानलेले असून दुध उत्पादन सरासरी प्रती दिन १० लिटर या प्रमाणे ग्राह्य मानली आहे.
  • दुधाचा दर रु. ३० प्रती लिटर, हिरवा चारा रु. २.५ प्रती किलो , सुका चारा रु. ३.०० प्रती किलो शेण रु. २.०० किलो या प्रमाणे दर ग्राह्य मानलेले आहेत आपण आपल्या परिस्थितीचा दर विचार गृहीत धरून वरील ठरवणे योग्य होईल.

गोठा प्रकल्प अहवाल

एकूण खर्च

प्रत्यक्ष खर्च :- वर आपण भांडवली खर्चाचा उल्लेख केला तर या दुसऱ्या सदरात आपण प्रत्यक्ष गोठा वर्षभर चालविण्यासाठी किती खर्च  येतो याचा समवेश होतो.  यामध्ये आपण चारा, पशुखाद्य, कामगार खर्च, आरोग्यावरील खर्च तसेच घसारा खर्चाचा समावेश आपण करतो. हा खर्चाचे नियोजन हे पुढील ५ वर्षासाठी असते.

Total Costing

उत्पन्न :- यामध्ये आपल्या या दुग्धव्यवसायामध्ये कोणकोणत्या मार्गाने पैसा येणार आहे त्याचे ५ वर्षाचे नियोजन या तक्त्यात केलेले असते.

  • दुध:- यामध्ये सर्वसाधारणपणे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे दुधाचे उत्पन्न हे आहे. वार्षिक सरासरी दर ठरवून त्याप्रमाणे दुधापासून किती उत्पन्न प्राप्त होईल ते पाहिले जाते. आपल्याकडील चांगल्या  सरासरी गाईचे एका वर्षातील दुध या मध्ये घेतलेले असते. एकूण दोन वेतातील अंतर व एका वेतातील दुध उत्पादन यानुसार हे दुध उत्पादन घेतले जाते. अश्या दुधास वर्षाचा सरासरी जो दर असेल त्यानुसार दुधापासून एकूण किती उत्पन्न मिळणार याची माहिती काढली जाते.
  • वासरे संगोपन :- त्यानंतर वासरांचे उत्पन्न बऱ्याच ठिकाणी पशु पालक लहान वासरांचे संगोपन करत नाही व फक्त दुधाचे उत्पन्न घेण्याचे प्रयत्न करतात परंतु आपण हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे कि चांगल्या वंशावळीच्या कालवडीचे आपण संगोपन केले तर आपल्या उत्पन्नात भर पडते.  यामध्ये सर्वसाधारणपणे आपली कालवड अडीच वर्षात दुध देण्यास तयार होते त्यानुसार तिची किंमत जी किमत होईल ती अडीच वर्षासाठी असते तिला आपण २/५ ने भाग दिला तर आपणास आपल्या कालवडीपासून एका वर्षात किती उत्पन्न मिळाले याची माहिती काढता येते.
  • शेणखत:- यानंतर दुसरे उत्पन्नाचे साधन म्हणजे शेणखत कि ज्याकडे पशु पालकांचे फार लक्ष नसते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्तेच्या खताच्या निर्मितीचा समवेश होतो. ज्या शेणखता ची किंमत आपण दहा पटीने वाढवू शकतो. यामध्ये बोकाशी, जीवामृत , जैविक खत , घनामृत ई. व अश्या अनेक प्रकारच्या  गुणवत्तापूर्ण खतांच्या निर्मितीतून आपण आपल्या दुग्ध व्यवसायाच्या उत्पन्नात भर टाकू शकतो. एक चांगली गाई एका दिवसात सर्वसाधारणपणे १२-१८ किलो शेण देत असते त्यानुसार शेणाचे बाजारभावाप्रमाणे मूल्य काढले जाते
  • इतर उत्पन्न:- यामध्ये आपल्या दुग्ध व्यवसायात इतर कोण कोणत्या मार्गाने उत्पन्न येते त्याचा आपण समवेश करू शकतो. पशुखाद्याच्या पिशव्या विकणे ई. प्रकारचे उत्पन्न आपण यात घेऊ शकतो.

5 cows report

कर्जाचा परतावा

यामध्ये जास्त करून बँकेचा विषय असून बँकेने मार्जिन मनी किती नियंत्रित केले आहेत बऱ्याच वेळेस हे प्रमाण १० ते २५% पर्यंत असते. तसेच बँकेचा व्याज दर किती आहे याचाही विचार या ठिकाणी करणे महत्वाचे आहे. त्यानुसार आपणास हप्ता , व्याज किती होईल व त्यावरून बँकेची मुद्दल व व्याज जाऊन आपणास प्रती वर्षी किती नफा शिल्लक राहतो त्याबाबत माहिती या तक्त्यात दिलेली असते. यातील खर्च , गुंतवणूक व नफा यावरून बँक आपणास कर्ज द्यावयाचे किंवा नाही ते ठरवत असते.

गोठा प्रकल्प

हेही वाचायला आवडेल तुम्हाला: १५ गाईंसाठी गोठा प्रकल्प अहवाल


डॉ. शांताराम गायकवाड

सहाय्यक महाव्यवस्थापक
दुग्धव्यवसाय विकास विभाग
गोविंद दुध, फलटण, जि. सातारा