जनावरांच्या पैदासीच्या रेकॉर्डस किंवा नोंदी व त्याचे महत्व

जनावरांचे संगोपन करत असतांनी त्यांच्या पैदासीच्या नोंदीला फार महत्व असते. पैदासीच्या नोंदी (Animal breeding records) ठेवण्याकरीता आवश्यक मुद्दे पुढीलप्रमाणे,

  • जातीवंत जनावराच्या आनुवंशिकतेबद्दल परिपूर्ण माहिती मिळते.
  • जनावरांचे आनुवंशिक दुग्धोत्पादन क्षमता समजते तसेच आनुवंशिक रोगाची माहिती योग्य रित्या आपणास समजते.
  • रेकॉर्डस, नोंदणीमुळे पैदासीपासून मृत्यूपर्यंत जनावरांचा संपूर्ण इतिहास आपणास समजतो.
  • रेकॉर्ड, संकरित पैदास केलेल्या सिद्ध वळू व गाय यांची वैशिष्टपूर्ण माहिती उपलब्ध होते.
  • किफायतशीर दुग्धोत्पादनासाठी प्रत्येक जनावराच्या नोंदणीमुळे पैदास करण्यास सुलभ होते.
  • वंशावळ, कार्यक्षमता व दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता समजते.
  • दुधाची, जनावरांची खरेदी व निवड करण्यासाठी बाह्य गुणधर्मावरून निवड करणे शक्य नसते, तसेच वंशावळीच्या माहितीच्या आधारे निवड करता येते.
  • रेकॉर्डवरून सिद्ध वळूची गुणवत्ता समजण्यास हि मदत मिळते.
  • वंशावळ नोंदणीमुळे योग्य पैदासीसाठी जनावरांची लहानपणीच निवड करता येते.

पुढीलप्रमाणे जनावरांच्या पैदासीचे रेकॉर्डस व नोंदणी ठेवल्या जातात 

नोंदणी क्रमांक – १ 

जनावरांचा इतिहास:

Animal Breeding Records

नोंदणी क्रमांक – २

विकत घेतलेल्या जनावरांची नोंदवही:

Animal Records

नोंदणी क्रमांक – ३

आरोग्यविषयक नोंदणी:

Animal Breeding Records

नोंदणी क्रमांक – ४

वासराची नोंदवही:

Cattle Breeding Record

 

नोंदणी क्रमांक – ५

खाद्याविषयी नोंदणी:

 

Cattle Records

 

नोंदणी क्रमांक – ६

दुग्धोत्पादन नोंदवही:

Milk Production Records

जनावरांच्या पैदासीच्या रेकॉर्डस किंवा नोंद चे वरील सर्व फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Read:जनावरांतील लंगडणे – कारणे व प्रथमोपचार


श्री. अजय गवळी

लेखक पशुसंवर्धन तज्ञ असून बर्ग अँड स्मिथ इंडिया प्रा. ली. पुणे
येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत
मोबाइल नंबर: ८००७४४१७०२