दुधामध्ये वाढणारे प्रतिजैविक औषधांचे अवशेष एक जागतिक समस्या

दूध व दुग्धजन्य पदार्थ पोषकत्वांचे चांगले स्रोतअसतात त्यामुळे विविध सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी चांगली माध्यमे म्हणून ते काम करतात.  दूध फाटणे आणि दुधामध्ये मध्ये विषाक्त  पदार्थ तयार होणें  यासाठी सूक्ष्मजीव जबाबदार आहेत. दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या दुध देणारे प्राणी दररोज असंख्य जिवाणूजन्य आजारांनी ग्रस्त होतात या  संक्रमणावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यक व चिकित्सक  नियमितपणे विविध  प्रतिजैविकांचे  मोठे डोस वापरतात.

प्रतिजैविक (अँटीबायोटिक ) पदार्थ हे असे पदार्थ आहेत जे  जीवाणू नष्ट करतात किंवा त्यांची वाढ थांबवतात ,डेअरी व्यवसायातील जनावरांना जे प्रतिजैविके दिली जातात  त्याचे  वर्गीकरण कित्येक मार्गांनी परंतु प्रबळ गटांमध्येकेले जाऊ शकते.

टेट्रासाइक्लिन, फ्लॉरोक्विनलोन्स, एमिनोग्लायकोसाइड्स, पेन्सिलिन, सल्फोनामाइड्स, मॅक्रोलाइड्स, लिनकोसामाईड्स, सेफलोस्पोरिन इ.यातील काही बॅक्टेरियोस्टेटिक  (जिवाणूंची वाढ थांबवणारे)  तर काही बॅक्टरीओसायडल  (जीवाणूनाशक) आहेत.

प्रतिजैविक अवशेष (Antibiotic residues)  काय आहेत?

अवशेष म्हणजे अक्षरशः “जे उरले आहे ” म्हणून परिभाषित केले जाते बाकी. प्रतिजैवकांच्या जनावरांमधील उपचारानंतर / वापरानंतर  त्यामधील काही निश्चित किंवा अल्प प्रमाणातील घटक किंवा त्यांचे चयापचय पदार्थ प्राण्यांच्या उती आणि मॅट्रिक्स मध्ये साठून राहतात, ज्यांच्या पासून मिळणारी उत्पादने आपण मानवी अन्न म्हणून वापरतो. अशा अन्नात विशिष्ट कालावधीसाठी परवानगी पातळीच्या वरती हे पदार्थ आढळून आले तर त्यांना प्रतिजैविक अवशेष म्हणून ओळखले जाते. दूध आणि दुधापासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये प्रतिजैविकांचे अवशेष विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशात खूपच जास्त आहेत. याचे कारण विकसनशिल देशात (उदा भारत) अवशेष शोधण्याच्या प्रणालीच्या अभावामुळे असू शकते तसेच फक्त फॅट आणि एस. एन. एफ. या घटकांकडे जास्त लक्ष दिल्यामुळे आणि नियामक प्राधिकरणाद्वारे ठरवून दिलेल्या जास्तीत जास्त अवशेष मर्यादा (एमआरएल)  मानकांची  काटेकोर अंमलबजावणी  न केल्यामुळे होते .

दुधामध्ये प्रतिजैविक अवशेषांचे  स्रोत कोणते आहेत?

१. आजारी जनावरांवर प्रतिजैविक  वापरल्यावर आणि त्याद्वारे  दुधामध्ये प्रतिजैविक पदार्थांचे स्राव.

२. दुध खराब होण्यापासून रोखण्यासाठी त्याचे संरक्षक म्हणून दुधामध्ये  प्रतिजैविकांचा थेट समावेश केल्यामुळे .

३. शरीर व वजन वाढीसाठी फीड मध्ये प्रतिजैविकांचा वापर.

४. पर्यावरणीय स्त्रोत किंवा अपघाती औषधांना  चाटल्यामुळे.

प्रतिजैविक अवशेष असलेले  दूध उकळल्यावर आणि पाश्चराइज  केल्यावर काय होते ?

प्राण्यांवर उपचार करण्याव्यतिरिक्त, कधीकधी प्रतिजैविक दुधाचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी मुद्दाम वापरले जातात उष्णता प्रक्रिये दरम्यान बरीच प्रतिजैविके रासायनिक दृष्ट्या स्थिर राहतात आणि दूध व दुग्धजन्य पदार्थ त्यांची एकाग्रता व रचना याने प्रभावित होतात. ताज्या  दुधातील प्रतिजैविक अवशेष पीपीएम (पार्टस पर  मिलियन ) या अवशिष्ट स्तरावर नोंदविल्या जातात. दुधामधील प्रतिजैविक अवशेष पाश्चरायझेशनच्या तापमानास ( 63- 71 °©) आणि  (0-10 °©) तापमान  तसेच कमीच्या तापमानास  देखील  तुलनेने स्थिर राहतात. FSSAI च्या मानकांनुसार दुधातील प्रतिजैविक अवशेष मर्यादा  MRL  0.001 mg/ kg याच्या खाली असली पाहिजे आणि क्लोरॅमफेनिकॉल साठी ही मर्यादा 0.0003 mg/ kg च्या खाली असली पाहिजे.

दुधातील प्रतिजैवक अवशेष  निघून जाण्याचा कालावधी किती असतो ?

मस्टायटीस किंवा स्तनदाह हा दुधाळ जनावरांमध्ये  सर्वात  जास्त पसरणारा आजार आहे. यातून वाचण्यासाठी जनावरांना  जिवाणूरोधक  व जंतुनाशक प्रतिजैवक उपचार आवश्यक असतात. उपचारानंतर, प्रत्येक प्रतिजैवकांचा दूधामधून व प्राण्यांच्या शरीरांमधून निघून जाण्याचा विशिष्ट कालावधी असतो ज्या दरम्यान दूध उत्पादन व  सेवन  रोखले पाहिजे  ज्यामध्ये  प्रतिजैविक औषधांचा स्त्राव आहे. त्यानुसार अमेरिकन डेअरी सायन्स असोसिएशन च्या मानकानुसार  (एडीएसए), स्तनदाहासाठी प्रतिजैविक उपचार केलेल्या गायीपासून पुढील ७२ तासात  मानवी वापरासाठी कोणतेही दूध प्राप्त झाले नाही पाहिजे . वेगवेगळ्या  प्रतिजैवक औषधांसाठी  साठी दूध उत्पादन बंद करण्याचा कालावधी  भिन्न आहे . हा कालावधी औषधाचा प्रकार जनावराचा शारीरिक  पिंड आणि  औषधाचा देण्याचा मार्ग यावर अवलंबून असतो.

दूध आणि दुग्धजन्य उत्पादनातील प्रतिजैविक अवशेष यांची आपण कसं चाचणी घेऊ शकतो ?

जनावरांमध्ये (अँटीबायोटिक्सच्या) प्रतिजैविकांच्या अंधाधुंध वापरामुळे  दूध व दुग्ध पदार्थांमध्ये  या अवशेषांची ची पातळी वाढत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी या अवशेषांची स्वीकार्य मर्यादा परिभाषित केल्या आहेत, हे खाद्यपदार्थांमधील अवशेष जलद शोधण्यासाठी आवश्यक संवेदनशील तंत्र अधोरेखित करणे आवश्यक आहे.

पूर्वी प्रतिजैविक अवशेषांच्या चाचणी साठी दुधाचे नमुने (डेलव्होटेस्ट, बीआर टेस्ट, डेलव्होटेस्ट एसपी-एनटी, कोपन चाचणी) आणि वेगवान चाचण्या (पेन्झीम, डेलव्हो-एक्स-प्रेसएम बीएल, बेटास्टार, स्नॅप, मोहिनी II) अशा  विविध मायक्रोबायोलॉजिकल चाचण्या वापरुन केल्या  जात असे. जरी या चाचण्या स्वस्त, वेगवान आणि सुलभ आहेत.  तरी अद्याप विशिष्ट चाचण्या (मायक्रोबियल)  (प्रतिबंध परीक्षा, बायोसेन्सर, इलिसा, एचपीएलसी,एलसी-एमएस,/एमएस,यूपीएलसी-एमएस) अधिक निवडक, अचूक आणि विश्वासार्ह मानले जातात. बेसिलस स्टीअर्थोर्मोफिलस हा सूक्ष्मजीव दूधामधील बी-लैक्टॅम प्रतिजैवक अवशेष शोधण्यासाठी कारणीभूत आहे. याचा अनेक चाचण्यामध्ये  वापर करतात ,बाजारामध्ये  हा बॅसिलस स्टीअर्थोर्मोफिलस डिस्क एसे (बीएसडीए) स्वरूपात उपलब्ध आहे जो पेनिसिलिन जी, अ‍ॅम्पिसिलिन आणि सेफपीरिन या प्रतिजैविकांच्या  दूधामधील अवशेषांना ओळखण्यास सक्षम आहे. अनेक  प्रकारच्या प्रतिजैवक मिश्रित दूध दिवसेंदिवस वाढत आहे,त्यामुळे  त्यामधील अवशेष  अचूक ओळखणारी यंत्रणा  एकल विश्लेषण वापरून किमान खर्चासह विकसित करणे नेहमीच एक आव्हान असेल.

दुधातील  प्रतिजैविक अवशेष जागतिक आव्हान म्हणून कसे कारणीभूत आहेत ?

१.मानवी धोका:

दूध आणि दुधापासून उत्पादने सर्व वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणात वापरतात म्हणून प्रतिजैविक अवशेष मानवांसाठी एक गंभीर धोका आहे. सर्व वयोगटातील आयजीई IgE( एक प्रकारची अँटीबॉडी )अतिसंवेदनशील रूग्णांमध्ये अवशेषयुक्त दूध सेवन केल्यावर  तीव्र ऍलर्जी रिऍक्शनमुळे अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी (अर्टिकेरिया) लाल असतात, खाज सुटतात व त्वचेच्या प्रतिक्रियेमुळे उद्भवतात, अ‍ॅनाफिलॅक्टिक शॉक जीवघेणी ऍलर्जी रिऍक्शनआहे ज्यामुळे तात्काळ मृत्यू देखील होऊ शकतो, आणि एंजियोएडेमा म्हणजे त्वचेच्या सखोल थरांची द्रवपदार्थाच्या वाढीमुळे होणारी सूज आहे . एंजियोएडेमाची लक्षणे शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करतात, परंतु सूज सहसा: डोळ्यांना व ओठांना प्रभावित करते. इत्यादी लक्षणे दिसतात.

  1. पेनिसिलिन, नोव्होबिओसिन इत्यादींच्या अवशेषयुक्त दुधाच्या सेवनामुळे हेमोलिटिक अनेमिया होतो ज्यामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याचा दर नष्ट होण्याच्या दरापेक्षा कमी असतो. थ्रोम्बोसाइटोपेनिया – प्लेटलेट ची संख्या कमी होणे , किडनीच्या उतींमधील सूज , सीरम आजार, रक्तवहिन्यासंबंधीचा एरिथेमा (एरिथेमा एक प्रकारचा त्वचेवर पुरळ आहे जो जखमी  रक्त केशिकामुळे होतो. हे सहसा औषध, रोग किंवा संसर्गाच्या प्रतिक्रिया म्हणून हा उद्भवतो. विषारी एपिडर्मल नेक्रोलिसिस (टीईएन) एक संभाव्य जीवघेणा त्वचारोग  आहे ज्याची वैशिष्ट्यीकृत एरिथेमा, पेशी  समूहाचा काही भाग नष्ट होणे आणि बाह्यत्वचा आणि श्लेष्मल त्वचेच्या अलिप्ततेद्वारे उद्भवते, ज्यामुळे उच्छ्वास आणि सेप्सिस म्हणजे संसर्गाला शरीराचा तीव्र प्रतिसाद आणि / मृत्यू होणे आदी लक्षणच समावेश आहे .
  2. टेट्रासाइक्लिन व ऑक्सीटेट्रासाइक्लिन यांचे अवशेष शरीरातील कॅल्शिअम चा पुरवठा बाधित करतात अशा दुधाच्या सेवनामुळे मुलांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो त्याव्यतिरिक्त दातांमध्ये व हाडांमध्ये विकृती तयार होते .प्रतिजैविकांच्या अवशेषांमुळे जनावरांच्या कोठीपोटातील व मानवाच्या आतड्यांमधील सर्वसाधारणपणे उपयुक्त बॅक्टेरियाच्या संख्येत हस्तक्षेप होऊ शकतो ज्यामुळे पाचनसंबंधी विकार उद्भवू शकतात , व पुढील वेळेस केले गेलेले  प्रतिजैविक उपचार कुचकामी ठरतात. दीर्घकालीन टेट्रासाइक्लिनचे अवशेष असलेल्या दुधाचे सेवनामुळे  प्रतिपिंडांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारशक्ती कमी होत.
  3. दुधामध्ये क्लोरॅमफेनिकॉल प्रतिजैविकांच्या अवशेषांमुळे अप्लास्टिक अनेमिया, ऑप्टिक न्यूरोयटिस, मेंदू मध्ये पाणी भरणे आणि ग्रे बेबी सिंड्रोम. इत्यादी रोग उद्भवतात.
  4. सल्फा औषधे आणि नायट्रोफुरन्सची उपस्थिती दुधामध्ये विषारी प्रभाव आणते त्यांच्यातील कार्सिन सी घटक कर्करोगास आमंत्रित करतो.

२. पर्यावरणीय धोके:

भिन्न प्रतिजैविक औषधांचे प्राण्यांच्या मलमूत्र व विष्ठेद्वारे होणारे उत्सर्जन वातावरण दूषित करण्यास हातभार लावते. टेट्रासाइक्लिन आणि इतर  प्रतिजैविके  जनावरे मलमूत्द्वात्राद्वारे लक्षणीय प्रमाणात उत्सर्जित करतात हे प्रतिजैविक अवशेष पर्यावरणामधे दीर्घ काळासाठी पडून राहतात यामुळे जलीय आणि स्थलीय परिसंस्था दूषित होतात ज्यामुळे पुढे जलचर आणि भूचर जीवनासाठी धोका निर्माण होतो. प्रतिजैविक अवशेषामुळे माती मधील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अनुकूल बॅक्टेरिया देखील मरतात त्यामुळे पिकांवर जीवाणूंजन्य व  बुरशीजन्य रोग मोठ्या प्रमाणात फैलावतात.

३.रोगाणूविरोधी प्रतिरोधक:(Antibiotic Resistance)

दीर्घकाळापर्यंत गरज नसतांना प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे बॅक्टरीया मध्ये औषध प्रतिकार शक्ती विकसित होते, त्यानंतर हे बॅक्टरीया कुठलतच औषधांना जुमानत नाहीत व भयंकर आजार निर्माण करतात. प्रतिजैविक अवशेष असणारी सेंद्रिय खते मातीमध्ये प्रतिरोधक जीवाणू आणि प्रतिरोधक जनुके तयार करतात हे जिवाणूंच्या प्रतिकार शक्ती विकासास कारणीभूत ठरू शकतात. एका अंदाजानुसार दुधामध्ये प्रतिजैविकांच्या अवशेषांमुळे सुमारे 50000 मानवी मृत्यू होतात प्रत्येक या कारणास्तव दूधामधून औषधी घटक अवशेष मुक्त करणे  जागतिक आव्हान आहे .

दुधात प्रतिजैविक अवशेष जागतिक आव्हान म्हणून कसे कारणीभूत आहेत ?

  1. डेअरी उद्योगावर प्रतिजैविक औषध अवशेषांचा परिणाम, प्रतिजैविक अवशेषांची दूधामधील सूक्ष्म प्रमाणातील उपस्थिति देखील स्टार्टर कल्चर चे क्रियाकलाप विलंबीत करते . या अवशेषांमुळे विरजण बिघडते दुधाचे दही आणि त्यानंतरची घट दुग्धजन्य पदार्थांचे नुकसान करते .पेनिसिलिन ची (१ पीपीबीची -पार्टस  पर बिलियन) १ कोटी भागामधील १ भाग उपस्थिति स्टार्टर कल्चर चे  क्रियाकलाप  अनेक तास पुढे ढकलू शकतो .
  2. प्रतिजैविक अवशेषांमुळे विरजणासाठी लागणारे लॅक्टिक आम्लचे प्रमाण कमी होऊ शकते आणि  लोणी/ बटर  उत्पादन. संबंधित चव  बिघडू शकते.
  3. दुधात प्रतिजैविक अवशेषांची उपस्थिती दुधापासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या प्रक्रिये मध्ये अडथळा असल्याने यामधून डेअरी उद्योगाचे चे प्रचंड आर्थिक नुकसान होते.
  4. चीज तयार करताना, दुधामधील प्रतिजैविकांचे अवशेष स्टार्टर कल्चरची वाढ मंदावतात आणि परिणामी असिडिफिकेशनमध्ये हळू  हळू  घट होऊन इतर अवांछित रोगजनक बॅक्टेरिया ची सक्षम वाढ होऊन पदार्थाचे नुकसान होते .
  5. दूध हे एक एक शुद्ध, अबाधित आणि नैसर्गिक उत्पादन आहे परंतु अवशेषयुक्त दुधामुळे दुधाविषयी ग्राहकांच्या धारणा बदलतात  आणि उत्पादनांचा खप कमी होतो .
  6. दुग्ध उद्योगास सर्वात मोठे आव्हान, अवशेषांविषयी असलेल्या अन्न सुरक्षा आंतरराष्ट्रीय मानकाचे पालन न केल्यामुळे जागतिक बाजारपेठेत आपल्या उत्पादनास निर्यातीसाठी  परवानगी मिळत नाही आणि बहुमूल्य परकीय चलनाचा तोटा होतो .

काळाची काय गरज आहे?

  1. भारतात अनेक डेअरी मध्ये प्रतिजैविक अवशेषांची नियमित चाचणी होत नाही शिवाय दूधामधील प्रतिजैविक अवशेषांविषयी  जनजागृतीचा अभाव आहे. यासाठी  दुधाच्या नमुन्यांची  प्रतिजैविकांसाठी शोध चाचणी  नियमित करण्यासाठी सक्रिय पाऊले उचलणे आवश्यक आहे.
  2. प्रतिजैविक अवशेष असलेले दूध सेवन करू नये तसेच त्यात इतर अवशेष विरहित दुधाची सरमिसळ करू नये दर्जेदार दुधासाठी शिफारस केलेली उच्चतम अवशेष मर्यादा ( एमआरएल)  मूल्ये तंतोतंत पाळावी.
  3. कच्च्या दुधामध्ये ( प्रक्रिया/ पाश्चराइजेशन न केलेलं दूध ) प्रतिजैविक अवशेष रोखण्यासाठी HACCP एचएसीसीपी (धोकादायक विश्लेषण गंभीर नियंत्रण बिंदू) प्रक्रिया ची अंमलबजावणी झाली पाहिजे ज्याचा एक भाग  गुणवत्ता हमी कार्यक्रम साठी आहे .
  4. प्रतिजैविकांचा वापर केवळ संसर्गजन्य  रोग नियंत्रण किंवा उपचारांसाठी केला पाहिजे असे करताना, योग्य डोस आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुसरण करणे आवश्यक आहे. (FAO एफएओ) जागतिक अन्न  संघटना ,(OIE ओआयई) इत्यादी संघटनेद्वारे  मान्यताप्राप्त सुमारे 27 भिन्न प्रकारची प्रतिजैविक औषधे प्राण्यांमध्ये रोगप्रतिकारक म्हणून  वापरली  पाहिजेत. तथापि, केवळ 42 देशांमध्ये  पशुधनामधील  प्रतिजैविकांच्या वापरावरील डेटा गोळा करण्यासाठी एक प्रणाली आहे,  म्हणूनच नियमित आणि कडक देखरेख प्रणालीचे अनुसरण करणे आवश्यक आहे
  5. खाद्यामध्ये प्रतिजैविकांचा वापर करतांना पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन घ्या.
  6. लोकांमध्ये अवशेषांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि उत्पादकानीं अवशेषमुक्त दुधासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे व ज्यादा दर देणे .
प्रतिजैवक अवशेषांचे दुष्टचक्र

ग्रामीण भागात पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या कमतरतेमुळे बोगस पदविकाधारक व झोलाछाप लोक ज्यांना मेडिसिन व औषधशास्त्राचे ज्ञान नाही ते जनावरांवर उपचार करतात ज्यामध्ये (अँटिबायोटिक्स) प्रतिजैविकांचा बेसुमार व अंदाधुंद वापर करतात  त्यामुळे त्यांचे अवशेष  दूध व मांस यामध्ये उतरतात. असे दूध आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अवशेषांमुळे निर्यात होत नाही परिणामी स्थानिक बाजारपेठेत दूध जास्त प्रमाणात उत्पादित झाल्यामुळे दुधाचा दर पडतो. त्यामुळे दरवर्षी सरकार कोट्यवधी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देते व हे दुष्टचक्र चालू राहते .

प्रतिजैविक वापरताना घ्यावयाच्या खबरदारी:
  1.  नेहमी तज्ञ व अनुभवी पशुवैद्यकीय डॉक्टर कडूनच जनावरांवर उपचार करून घ्यावेत .
  2. उपचारानंतर किमान ७२ ते ९० तास प्राणिजन्य पदार्थ दूध व मांस चा वापर करू नये .
  3. डेअरी व्यवसाययिकांनी अवशेषमुक्त दुधासाठी चाचाणी अनिवार्य करावी व अवशेषमुक्त दुधास ज्यादा दर द्यावा.
  4. सरकारने प्रतिजैविकांच्या  उपलब्धतेवर आणि वापरावर काटेकोर नियंत्रण ठेवावे .

प्रतिजैविक चांगल्या पात्र व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्याव्यात.

प्रतिजैविक औषधांचा कोर्स  डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण केला पाहिजे.

प्रतिजैविक योग्य प्रमाणातआणि योग्य वेळी घेतले पाहिजे. प्रतिजैविकांचा  चुकीचा डोस औषध अप्रभावी बनवतो. तसेच, औषधांचा जास्त वापर केल्याने शरीरात असलेले उपयुक्त जीवाणू नष्ट होऊ शकतात.

मांस आणि दुधामधून अवशेषयुक्त पदार्थ निघून जाण्याचा कालावधी किती आहे ?

अवशेषयुक्त पदार्थ निघून जाण्याचा कालावधी एखाद्या प्राण्याला दिलेल्या औषधाचे चयापचय करण्यासाठी लागणारा वेळ आणि ऊतींमधील उत्पादनाच्या एकाग्रतेच्या पातळीला सुरक्षित, स्वीकार्य पातळीपर्यंत कमी करण्यासाठी आवश्यक वेळ दर्शवते. प्रत्येक शासनमान्य परवाना कृत मंजूर औषध किंवा प्राणी आरोग्य उत्पादनामध्ये उत्पादन लेबल किंवा पॅकेज इन्सर्टवर अवशेषयुक्त पदार्थ निघून जाण्याचा काढण्याचा कालावधी छापलेला असतो. काही औषधे 0 ते 60 दिवसांपर्यंत मांस मधून निघून जाण्यासाठी कालावधी घेतात. सेफ्टीओफरसह (ceftiofour ) माघार घेण्याच्या कालावधीपासून, विविध पेनिसिलिन उत्पादनांसह 4-15 दिवस, पिर्लीमायसीनसह 28 दिवसा 45 दिवसांच्या माघारीचा कालावधी असलेल्या उत्पादनासह उपचार केलेल्या जनावरांना कमीतकमी 45 दिवस विक्री किंवा कत्तलीपासून रोखले पाहिजे.

सर्व औषधांसाठी अवशेषयुक्त पदार्थ निघून जाण्याचा कालावधी सारखी नसतो . दुधासाठी उदाहरणे: Pirlimycin, 36 तास; क्लोक्सासिलिन, 48 तास, अमोक्सिसिलिन, 60 तास, पेनिसिलिन, 72 तास, आणि सेफापिरिन, 96 तास. त्या काळात उत्पादित होणाऱ्या दुधाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अवशेषमुक्त मांस  काढण्याच्या कालावधीपर्यंत  जनावरांची कत्तल थांबवणे  आवश्यक आहे.

जेव्हा औषधांचे संयोजन वापरले जाते किंवा अतिरिक्त लेबल पद्धतीने औषधे वापरली जातात तेव्हा अवशेषयुक्त पदार्थ निघून जाण्याची  मुदत वाढवली जाऊ शकते. या परिस्थितींमध्ये किंवा कोणत्याही वेळी उत्पादक विशिष्ट औषध काढण्याच्या अवशेषयुक्त पदार्थ निघून जाण्याचा कालावधी  कालावधीबद्दल अनिश्चित असल्यास, पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.


डॉ. धीरज पाटील

MVSC Scholar